विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिभीषण - विश्रवा ॠषीचा पुत्र व रावणकुंभकर्णाचा धाकटा भाऊ. सीता पळवून आणून रामाशीं वैर संपादल्याबद्दल यानें रावणास दोष दिला; व रावण जेव्हां त्याचें ऐकेना तेव्हां बिभीषण रामास जाऊन मिहाला. रावणवधानंतर तो लंकेचा राजा झाला. हा चिरंजीवांपैकी एक आहे.