विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिमलीपट्टम, त ह शी ल. - मद्रास इलाखा, विजगापट्टम जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ २५५ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) १२७२९८. खेडी ११७. जमीनमहसूल व किरकोळ कर अव्वल आकारणी व करांचें मिळून उत्पन्न १९ हजार रूपये आहे.
गां व - विजगापट्टण जिल्हा. लोकसंख्या ७४९५. येथें १७ व्या शतकांत डच लोकांनीं आपली वसाहत केली होती. १८५४ साली ती मराठयांनीं लुटली. पूर्वी हें एक अगदीं लहान खेडें होतें. सध्या हें एक मोठें बंदर आहे. निर्गतीचा मुख्य माल कमावलेली कातडी, बी, नीळ, हिरडा व आयात माल कापड व सूत हा आहे. १८६६ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली.