विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिलाइगड - मध्यप्रांत. ही जमीनदारी बिलासपूर जिल्ह्यांत आहे. हिच्यांत ५० गांवें असून त्याचें क्षेत्रफळ १०९ चौरस मैल आहे. लोकसंख्या सुमारें ७ हजार. मुख्य उत्पन्न धान्याचें आहे. जमीनदार जातीचा गोंड आहे. मुख्य ठिकाण बिलइगड असून या ठिकाणीं भव्य किल्ल्याचें चिन्ह असून पडलेली जुनीं देवालयेंहि दिसतात.