विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिसोली - संयुक्तप्रांतांत बुदौन जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ ३६० चौरस मैल. हींत बिसौली, इस्लामनगर व सटासी हे परगणे येतात. लोकसंख्या (१९११) २१०५११ खेडी ३५०. हींत सोत व अरिल या नद्या आहेत. तहशिलीचें मुख्य गांव बिसौली आहे. त्याची लोकसंख्या ५ हजार आहे. १८ व्या शतकांत दुडेखाननामक रोहिला सरदाराच्या अमदानींत या गांवास प्रथम महत्व आलें. १७५० सालीं या सरदारानें येथें एक किल्ला बांधला.