विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिस्मार्क द्वीपसमूह - न्यूगिनीच्या उत्तर व ईशान्येकडील पुष्कळशा बेटांच्या समूहास बिसमार्क द्वीपसमूह हें नांव दिलें आहे. हें बेट महायुध्दापर्यंत जर्मनीच्या ताब्यांत होतें. सर्वात मोठें बेट न्यूपोमेरानिआ असून, न्यूमेकलेनबर्ग, न्यूहानोवर व ह्यांच्या आसपासची बेटें, न्यूअडमिरॅलिटी बेटें व न्यूगिनीच्या किना-याच्या दूरवरच्या बेटांची ओळच्या ओळ असा अर्धवर्तुळाकार द्वीपसमूह आहे. स. १८८४ नंतर या द्वीपसमूहास बिस्मार्क हें नांव देण्यांत आलें. महायुध्दानंतर हा प्रदेश न्यूगिनीबरोबर मँडेटरी होऊन मध्य ऑस्ट्रेलियाच्या ताब्यांत आहे.