विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बीड, जि ल्हा.- हैद्राबाद संस्थान, औरंगाबाद विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ४१३२ चौरस मैल. खालसा आणि सरफ-इ-खास जमिनीचें क्षेत्रफळ ३९२६ चौरस मैल असून बाकीची जहगीर आहे. जिल्ह्याचे बालाघाट (उंचवट्याचा प्रदेश) व पाइनघाट (सखल प्रदेश) असें दोन भाग आहेत. मोठी नदी गोदावरी असून ही या जिल्हाची उत्तर सरहद्द आहे. जंगल थोडें आहे. हवामान आरोग्यदायक असून पाऊस सरासरी ३० इंच पडतो.
बीडचें मूळचें नांव दुर्गावती असून नंतर चंपावतीनगर झालें. हें आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यांच्या हातोहात जाऊन शेवटीं दिल्लीच्या मुसुलमान राजांच्या हातीं गेलें. स. १३२६ च्या सुमारास महंमद तुघ्लखनें याचें नांव बीड असें ठेविलें. तुघ्लखानंतर बहामनी, निझामशाही व आदिलशाही यांच्याकडे हें शहर गेलें. १५३५ सालीं मोंगलांनीं हें जिंकलें पुढें हैद्राबाद गादीची स्थापना झाल्यावर त्या राज्यांत याचा समावेश झाला. जोगाईचें आंबें व परळीवैजनाथ हीं या जिल्ह्यांत मोडतात.
लोकसंख्या (१९१३) ६२२५३१ शें. ८७ लोक मराठी बोलतात. रब्बीचीं व खरीपाचीं पिकें होतात. कापुस व जवस फार पिकतो. ज्वारी, गहूं, व इतर धान्यें आणि कडधान्यें. कापूस, जवस, शेळ्या हाडें व काकवी हा निर्गतमाल असून मीठ, अफू, साखर, धातू, रेशीम सूत हा आयात माल होय. शेंकडा ३ लोकांनां लिहितां वाचतां येतें.
ता लु का.- क्षेत्रफळ ६४० चौ. मै व लोकसंख्या सुमारें १२६६०७ आहे. या तालुक्यांत १९९ खेडीं आहेत; त्यांपैकीं १७ जहागिरी आहेत जमीन काळी आहे. मुख्य गांव बीड असून हें बेंदसुरा नदीच्या कांठीं आहे. गांवाची लोकसंख्या (१९११) १६०१०. या गांवाचे किल्ले व इमारती पुराणवस्तूसंशोधनाच्या द्दष्टीनें महत्त्वाच्या आहेत.