विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बृहस्पति- याची वैदिक माहिती वेदविद्या, पृ. ३३७-३३८ वर दिली आहे. पुराणांतरीं याला सर्वश्रेष्ठ पुरोहित व देवगुरू या नात्यानें मान आहे. यास शुभा व तारा या दोन पत्न्या होत्या. सोमानें तारेला पळवून नेल्यावरून 'तारकामय' नांवाचें युद्ध झालें. बृहस्पतीला बुद्धीचा आगर मानतात. बृहस्पति नांवाचा एक स्मृतिकार होऊन गेला.