विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड (१५६१-१६२६)- सुप्रसिद्ध आंग्ल तत्त्वज्ञानी, मुत्सद्दी व निबंधलेखक. याचें शिक्षण केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजांत झालें. पुढें त्यानें वकिलीचा अभ्यास केला. कॉलेजांत झालें. पुढें त्यानें वकिलीचा अभ्यास केला. कॉलेजांत असल्यापासून व त्याला तत्वज्ञानाची फार आवड असें. अँरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाचा त्यानें खोल अभ्यास केल्यावरून त्याचें तत्त्वज्ञान सदोष आहे असा त्याचा ग्रह झाला होता. त्यामुळें त्याच्या मनांत आपली स्वतःची पद्धति मांडण्याचें विचार होतें त्याप्रमाणें १५८२ सालीं त्यानें 'टेंपोरिस पार्टुस मेंक्झीमुस' हा छोटासा ग्रंथ प्रसिद्ध केला. १५८४-९७ पर्यंत निरनिराळ्या भांगांतर्फें तो पार्लमेंटमध्यें निवडून आला. मेरी क्विन ऑफ स्कॉट्सला देहांत शिक्षा देण्याच्या प्रश्नावरील वादविवादांत यानें प्रामुख्यानें भाग घेतला होता. पुढें त्यानें अनेक अधिकारांच्या जागावर काम केलें. १५९७ सालीं त्यानें आपल्या निबंधाचा पहिला भाग प्रसिद्ध केला. १६०१ सालीं त्याचा मित्र एसेक्स याच्यावर खटला झाला असतांना, मित्रत्वाचें नातें विसरून त्यानें त्याला शिक्षा ठोठावली. १६०५ सालीं 'अँडव्हान्समेंट ऑफ लर्निंग' हा महत्त्वाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. १६०७ सालीं त्याला सॉलिसिटर जनरलची जागा मिळाली. १६०९ सालीं त्यानें 'विजडम ऑफ दि एन्शंट्स' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १६१३ सालीं तो अँटार्नी जनरल झाला. पुढें अनुक्रमें त्याला लॉर्ड कीपर, लॉर्ड चॅन्सेलर, व्हायकौंट सेंट आल्बन्स इत्यादि अनेक मानमरातब मिळाले. १६२० सालीं त्याचा 'नोकुम ऑर्गनुम' हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ बाहेर पडला. पुढें त्याच्यावर लांचलुचपतीचा आरोप शाबीत होऊन त्याला पार्लमेंटमधून हांकलण्यांत आले. त्यानंतर त्यानें आपल्या आवडत्या विषयांचें अध्ययन करण्यांत वेळ घालविला. १६२२ सालीं त्यानें 'हेनरी दि सेवन्थ' व ' इन्साशुरॉटो' हे ग्रंथ लिहिले. १६२३ सालीं 'हिस्टरी ऑफ लाइफ अँड डेथ', 'डे आगमेंटिस सायंटेरोम' (अँडव्हान्समेंट ऑफ लर्निंगचें लॅटिन भाषांतर) व निबंधाची सुधारून वाढविलेली आवृत्ति प्रसिद्ध केली. त्याचा सिल्व्हा सिल्व्होरूम हा ग्रंथ त्याच्या मरणामुळें अपूर्ण राहिला. बेकनची बुद्धिमत्ता फार दांडगी होती; त्याचप्रमाणें त्याची संशोधक बुद्धिहि अत्यंत तीव्र होती; त्याचे निबंध म्हणजे व्यवहारज्ञानाची खाणच असून त्यांची भाषा अत्यंत सुंदर पण सूत्रमय आहे. 'इंडक्टिव्ह' (आगमन) तत्त्वज्ञानपद्धतीचा त्याला मानण्यांत येतें. त्याचें खाजगी वर्तन मात्र अतिशय गर्हणीय होतें.