विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेगुसराई- बिहार- ओरिसा, मोंगीर जिल्ह्यांतील वायव्येकडील पोटविभाग. क्षेत्रफळ ७५१ चौरस मैल. सन १९११ मध्यें लोखसंख्या ६५१७६५ होती. यांत ७२० खेडीं असून शहर एकहि नाहीं; मुख्य ठिकाण बेगुसराई आहे. यांमधील वस्ती फार दाट आहे, म्हणजे प्रत्येक चौरस मैलास ८५७ लोक पडतात. यांत तिहुर्तपासून सुरू झालेंली पुळणाची सुपीक जमीन आहे. निळीची लागवड चालू आहे, परंतु हा धंदा मंदावत आहे.