विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेथ्लेहेम- हें लहान शहर पॅलेस्टाईनमध्यें आहे. डेव्हिड व जॉब यांचें रहाण्याचें ठिकाण येथें व होतें. तेथें येशू ख्रिस्ताचा जन्म झाला (मॅथ्यू व ल्यूक.) ख्रिस्त जन्मगुहा खेरीजकरूंन इतर म्हणजे मॅजीची वेदी, युसेबियसचें थडगें, जेरोमीनें ज्या ठिकाणीं बायबलचें भाषांतर केलें ती गुहा, वगैरे ठिकाणें अजून दाखविण्यांत येतात. येथें बरेच मठ व शाळा आहेत.