विभाग आठरावा : बडोदें ते मूर  
 
बेलिझ– ब्रिटिश होंजुरसची राजधानी, आणि कॅरिबियन समुद्रावरचें मुख्य बंदर. लोकसंख्या (१९२१) १२६६१. महोगिनी, देवद्वार, पतंगाचें लाकूड, नारळ, साखर, फळें वगैरे पदार्थांची निर्गत होतें. खाण्याचे पदार्थ, कापड व लोखंडी सामान आयात असतें. यांची बॅलिस अथवा बॅलेस नांवाच्या स्कॉटिश चांच्यानें येथें १६६८ सालीं वसाहत केली होती. तिच्यावरून याचें बॅलिस नांव पडलें अशी दतकथा आहे. १८ व्या शतकांत बॅलिस व बॉलिझ ही दोन्हीं नावें चालू होतीं.