प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर  
 
बेल्जम- यूरोपच्या इेशान्येस हा एक छोटासा स्वतंत्र देश आहे. पूर्वीं हा नेदर्लंडचा भाग होता. बेल्जम हें नांव या देशास १८३० सालीं पडलें. या वर्षीं येथें नवीन सनदशीर राज्यव्यवस्था सुरू झालीं.

हा देश बहुतेक सपाट आहे, परंतु म्यूजनदीच्या दक्षिणेकडील व ''सँबर व म्यूजमधील'' प्रदेश व लग्झेबुर्ग हे जवळ जवळ ५०० फूट उंच आहेत. आरडेन्स, फॅग्रेज, व लीज या प्रांतांत फार उत्कृष्ट  असें सृष्टिसौदंर्य सांठविलेलें आहे. या देशांत सरोवरें मुळींच नाहींत, परंतु येथें पाण्याचा पुरवछा मुबलक आहे. शेल्ड, म्यूज आणि सँबर या बेल्जममधील मुख्य नद्या होत. अद्याप बेल्जमच्या प्राचीन कीर्तीचीं स्मारकें व मध्ययुगांतील थोरवीचीं अवशेष चिन्हें जुन्या शहरांतून दृष्टीस पडतात. बर्जेस, अँटवर्प, लोव्हेन, ब्रुसेलस, घेंट, लीज इत्यादि शहरीं प्रवाशी लोकांची गर्दी जमते. या देशाचें हवामान समशीतोष्ण आहे.

कोळसा आणि लोखंड हे या देशांतील महत्त्वाचे खनिज पदार्थ होत. जस्त, शिसे, व तांबें ही सुद्धां येथें बरींच सांपडतात. बेल्जमचे क्षेत्रफळ १९२१ सालीं ११७५२ चौरस मैल होतें व एकंदर लोकसंख्या ७४६५७८२ होती. फ्रेंच, जर्मन आणि फॉमिश या तीन भाषा या देशांत चालतात.

राज्यव्यवस्था:- १८३१ या वर्षीं राष्टीयमंडळानें एकंदर राज्यघटना ठरविली. लिओपोल्ड पहिला याला ब्रुसेल्समध्यें स. १८३१ या वर्षीं राज्याभिषेक झाला. हें राज्य लिओपोल्डच्या वंशांत चालावें व जर कोणी राजा अन्यायानें वागला तर दोन्हीं चेंबरर्सनीं मिळून दुसरा राजा निवडावा असा अधिकार चेंबर्सनां आहे. हें राज्य राजा, सिमेंट व लोकनियुक्त प्रतिनिधीचें चेंबर यांचें बनलेलें आहे. चाळीस वर्षांच्या वर वय असल्याशिवाय कोणालाहि सिमेटसाठीं उभें राहतां येत नाहीं. १८९९ सालीं जातवार प्रतिनिधींचें तत्त्व अमलांत आलें. सिमेंट दर चार वर्षांनीं निवडण्यांत येतें सिमेंटच्या निवडणुकींत मत देणा-याचें वय निदान २१ वर्षांचें असलें पाहिजे. प्रत्येक प्रांतिक कौन्सिलला तीन सिनेटर निवडून देण्याचा हक्क आहे. चेंबर ऑफ रिप्रेझेटेटिव्हची निवडहि मतदारांनींच करावयाची असतें. प्रतिनिधीची संख्या सध्या १८६ आहे. दर चार वर्षांनीं या सभेची निवडणूक होतें.

येथील राजाला नवीन कायद्याबद्दल सूचना आणतां येते. हा हक्क दुसरीकडे नाहीं. या देशांत कॅथोलिक, लिबरल, सोशियालिस्ट व कॅथेलिक- डेमोकॅट असें पक्ष आहेत. या देशाचे एकंदर नऊ प्रांत केलें आहेत. प्रत्येक प्रांतास एक गव्हर्नर असतो. प्रत्येक प्रांताला प्रांतिक स्वायतत्ता देण्यांत आली आहे.

ध र्म:- येथें राष्ट्राचा असा ठरलेला कोणताच धर्म नाहीं. ज्याला त्याला स्वमतानुसार वागण्याची पूर्ण मुभा आहे. परंतु येथें कॅथोलिक पंथाचे लोक पुष्कळ आहेत.

शि क्ष ण- येथें सक्तीचें शिक्षण दिलें जातें. ज्याला शिक्षणाप्रीत्यर्थ खर्च सोसण्याचें सामर्थ्य नाहीं, त्याला मोफत शिक्षण देण्यांत येतें. प्राथमिक शिक्षण साधारणपणें वयाच्या १२ वर्षेंपर्यंत दिलें जाते. घेंट व लीज येथें सरकारी युनिव्हर्सिट्या आहेत. ब्रुसेल्स आणि लीज येथील युनिव्हर्सीटीमधून  मोफत शिक्षण दिलें जातें .येथें एकंदर तीन प्रकारचें शिक्षण दिलें जातें. (१) लष्करी, (२) ललितकला व इतर विद्यांगें यांचें व (३) धंदेविषयक, याशिवाय विशिष्ट विषयांचें शिक्षण देणारीं विद्यालयें येथें बरींच आहेत. बेल्जम अँकॅडमी ही प्रसिद्ध संस्था आहे व तींत बक्षिसांकरितां फार चुरशीची चढाओढ लागते.

न्यायखातें:- बाबतींत बेल्जममधील व्यवस्था फार चांगलीं आहे. येथील कायद्याचें पुस्तक नेपोलियनकोडसारख्या पुस्तकांच्या आधारानें लिहिलें असून तें बहुतेक दृष्टींनीं परिपूर्ण आहे. ब्रुसेल्स, लीज आणि घेंट या तीन शहरीं अपिलेट कोर्टें आहेत.

रा ष्ट्री य ज मा ख र्च:- १९२५ सालीं अंदाजी उत्पन्न ४२६८०००४८८ फ्रँक, व खर्च ४२४७०००००० फ्रँक होता.

सै न्य व रा ष्ट्र सं र क्ष ण:- सैन्याचे तीन प्रकार आहेत. (१) खडें सैन्य, (२) कलर्स दरवर्षीं लष्करीं नोकरींत येऊं इच्छिणा-या लोकांचें सैन्य व (३) स्वयंसेवक दल १९२४ सालीं कलर्सच्या प्रकाराचें सैन्य ८७२३९ होतें. आरमारांत १४ टार्पेडो व २२ वेडेट बोटो होत्या. १८९ विमानांची संख्या होती. बेल्जमची पांच ठिकाणच्या तटबंदीवर पूर्ण भिस्त आहे. तीं ठिकाणें म्हणजे (१) अँटवर्प, (२) लीज, (३) नामूर, (४) टरमाँडड व (५) डीस्ट. बेल्जमचें लष्करी शिक्षण चांगलें असतें.

व्या पा र व उ द्यो ग धं दे:- कोळसा, लोंखड, मँगॅनीझ, शिसें, जस्त हीं येथील मुख्य खनिज द्रव्यें होत. पाटीचा दगड, संगमरवरी दगड आणि ग्रानाइट यांबद्दल बेल्जम प्रसिद्ध आहे परंतु या देशांतील बरेच लोक आपला चरितार्थ शेतीवर चालवितात १९२३ सालीं लागवडीखाली असलेली जमान १३४०४१५ हेक्टेकर्स व ११०७९९७ हेक्एकर्स जंगल होतें. १९२३ सालीं ५०२५१९९८६ पौंडांच्या मालाची आयात व ३५५५९१०४३ पौडांच्या मालाची निर्गत झालीं.
 
इतिहास– दक्षिण आणि उत्तर नेदर्लंडची राजकीय दृष्ट्या फाळणी सन १५७९ सालीं झालीं. १५७८ मध्यें पार्माचा राजा हा गव्हर्नरजनरल नेमला गेला. त्यानें प्रथम वॅलून्सचा स्नेह संपादन करूंन यिप्रे, मेच्लीन, घेंट ब्रुसेल्स व शेवटीं अँटवर्प आपल्या हस्तगत करूंन घेतले. फिलीफचा दक्षिण नेदर्लंडमधील हेतु याप्रमाणें सफल होऊन या वेळेपासून बेल्जम कॅथोलिक व स्पॅनिश बनलें. परंतु यामुळें बेल्जमच्या भरभराटीस आणि उत्कर्षास सारखी ओहटी लागली. इन्क्विझिशन (रोमन कॅथोलिक पंथाचे जे लोक नसतील अशांचा निवाडा करणारी व शिक्षा देणारी संस्था) त्यांचा अतिशय छळ करीत असें. धाकानें बरेंच उद्योगी व हुशार लोक इंग्लंड किंवा डच प्रजासत्ताक राज्यांत पळून गेलें. व्यापार आणि उद्योगधंदे सारे बसले. पार्मानंतर ऑस्ट्रियाचा आर्च ड्यूक हा गव्हर्नर झाला. व त्यानंतर त्याचा भाऊ आर्चड्यूक अल्वर्ट हा १५९६ सालीं गव्हर्नर झाला. यावेळीं फिलीपचा बराच वृद्धपकाळ झाला होता. त्यानें नेदर्लंडचें एक छोटेसें राज्य निर्माण करूंन तेथें  आपला जांवई आर्चड्यूक अल्बेट यांस नेमलें. यामुळें बेलजी लोकांनां जरी आंनद झाला तरी डच लोकांस बरें वाटलें नाहीं. त्यांच्या  मनांत स्वातंत्र्याचें वारें सारखे खेळत होतें. या अल्बर्ट आणि इसाबेलच्या कारकीर्दींत न्यूपोर्टचा लढाई झालीं. नासोच्या नॉरिसानें आर्चड्यूक अलबर्ट याचा पराभव केला. आर्चड्यूक यानें १६०४ यावर्षीं अस्टेंड शहर घेतलें परंतु डच लोकांची समुद्रावर चांगलीं सत्ता असल्यामुळें त्यांनीं समुद्रकिना-यावरील व्यापार बंद पाडून १६०९ सालीं स्पेनच्या राजाला व आर्चड्यूकला १२ वर्षांचा तह करावयास भाग पाडलें. यामुळें त्यास संयुक्त प्रांताचें स्वातंत्र्य कबूल करावें लागलें. दुर्दैवानें आर्चड्यूकास मूलबाळ काहींच नव्हतें. व १५९८ च्या कराराप्रमाणें त्यांच्या निपुत्रिक मरणामुळें त्याचें राज्य स्पेनच्या राजांकडे गेलें. याप्रमाणे बेलजिक प्रांत चौथ्या फिलीफच्या  ताब्यांत आले व त्याला स्पॅनिश नेदंर्लंड असें नांव पडलें.

स्पेनचा- हास होत असतांना नेदर्लंडचा व त्याचा हा जो संबंध होता त्यामुळें बेल्जमच्या लोकांच्या सुखांत माती कालविली गेली. कारण ब-याच वर्षांपासून फ्रान्स व संयुक्त प्रांत यांमध्यें मैत्री झाल्यामुळें दक्षिणनेदर्लंड दोन्हींकडून उघडें पडलें व त्यावर शत्रूंच्या स्वा-यावर स्वा-या सुरू होऊन नेदर्लंडची फार नासाडी झालीं. कार्डिनल आर्चड्यूक फर्डिनड हा फार शहाणा राज्यकर्ता होता. त्यानें आपल्या लष्करी हुशारीनें शत्रूंना सर्वं देश पादाक्रांत करूं दिला नाहीं. १६४८ सालीं मुन्स्टर मुक्कामीं स्पेननें डच लोकांशीं तह केला. व या तहानें चौथ्या फिलिपानें संयुक्त प्रांतांवरील आपले सर्व हक्क कायमचे सोडले, व त्यांनां ब-याच  सवलती दिल्या. यामध्यें एक अशी अट होती कीं, त्यामुळें शेल्डनदीवरील सर्व व्यापार बंद पाडण्यांत आला यामुळें बेल्जम प्रांतांचें मनस्वीं नुकसान झालें. याप्रमाणें बरेच दिवस बेलजी लोकांनां व्यापारी बंदरच नव्हतें. व फ्रान्स व स्पेन यांच्यांतील बहुतेक युद्धांत या देशांवर हल्ले वढविण्यांत येत. पिरनीजच्या तहानें बरींचशीं शहरें फ्रान्सला  जोडण्यांत आलीं. व पुढें एक्सला शपेलच्या तहानें तर लिले, दूए, शार्लेराय, उदनार्द, कूर्त्रे आणि तूर्ने हीं शहरें फ्रान्सच्या ताब्यांत गेलीं. यावेळीच्या अंतर्गत इतिहासाविषयीं फारसे लिहिण्यासारखें नाहीं. फ्रान्सच्या महत्त्वाकांक्षी १४ व्या लुईनें मोठमोठीं हानिकारक युद्धें उपस्थित करूंन आपली बायको जी मरायाथेरिसा हिच्या वांट्याचा नेदर्लडांतील मुलुख काबीज करण्याप्रीत्यर्थ ब-याच स्वा-या बेल्जमवर केल्या. परंतु त्या महत्त्वाकांक्षेचें इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम यानें कांहीं चालू दिलें नाहीं. १६९२ च्या सुमारास बव्हेरियाचा इलेक्टर मॉक्झमीलियन याला बहुतेक राजाप्रमाणें अविष्कार देऊन बेल्जमचा गव्हर्नर नेमण्यांत आल्यामुळें बेलजी लोकांच्या आशांना अंकुर फुटुं लागलें. मॅग्झिमिलीयन हा कर्तृत्वान पुरूष असल्यामुळें त्यानें हा देश सुधारण्याची फार अटोकाट मेहनत घेतली. नवीन कायदे व चालीरीती प्रचारांत आणून व्यापारवृद्धीसाठीं त्यानें फार प्रयत्न केलें. व नवीन कालवे बांधून शेल्डवरील व्यापार बंद झाल्यामुळें बेल्जमची झालेंली हानि भरून काढण्याप्रीत्यर्थ भगीरथ प्रयत्न केलें. याच सुमारास १६९८ च्या करारान्वयें इलेक्टरच्या जागेस बळकटी आणण्यांत आली. या तहाप्रमाणें इंग्लंड, फ्रान्स व हॉलड यांनीं दुस-या चार्लस राजाच्या मृत्यूनंतर बव्हेरियाच्या राजपुत्रानें  आपल्या बापाच्या देखरेखीखालीं स्पेन, बेल्जम आणि स्पॅनिश अमेरिका यांचा राजा व्हावें असें ठरविले; व खुद्द दुस-या चार्लसनें बव्हेरियाच्या राजास आपला वारस नेमिलें. परंतु थोडक्याच दिवसांत या छोट्या राजपुत्राचा मृत्यु झाल्यामुळें स्पेनच्या वारसासंबंधीची ही बिनभानगडीची व्यवस्था जागच्या जागींच राहिली. यामुळें दुस-या चार्लसनें आपल्या मरणानंतर फ्रान्सच्या राजाचा नातु आंजुचा फिलिप यानें आपल्या गादीवर बसावें असें ठरविलें, व त्याच्या मरणानंतर चौदाव्या लुईनें आपल्या नातवाच्या हक्का प्रीत्यर्थ प्रयत्न करण्यास सुरवात केली. परंतु इंग्लंड व हॉलंड यांनीं निदान बेल्जम तरी फ्रान्सच्या हातीं लागूं द्यावयाचा नाहीं असा बेत केला व त्याप्रमाणें या दोन राष्ट्रांत 'ग्रँड अलायस' नावाचा मोठा संघ स्थापण्यात आला. हा संघ स्थापण्याचा मुळ हेतु इतकाच कीं, बादशहाच्या दुस-या मुलीचा हक्क सर्वांनीं उचलून घरावा.

लुईचा पहिला उद्देश नेदर्लंड काबीज करण्याचा होता. ऑस्ट्रिया आणि बव्हेरियामधील आपसांतील भांडणांमुळें इलेक्टरनें फ्रान्सचा बाजू घेतली व त्यामुळें पांचव्या फिलिपनें त्यास नेदर्लंडचा व्हिकार जनरल नेमलें. याप्रमाणें दुर्दैवी बेलजी लोकांचा देश पुनःयुद्धक्षेत्र बनून बरींच वर्षें युध्यमान राष्ट्रांच्या तलावारींच्या खणखणाटांनीं दणदणून गेला. याच बेलजी लोकांच्या देशांत मार्लबरोच्या ड्यूकनें रॅमिलीज, उदनार्दसारख्या मोठमोठ्या लढाया मारून फ्रेंच लोकांना नेदर्लंडमधून पिटाळून लाविलें, १७३१ या वर्षीं युट्रेच मुक्कामीं तह होऊन बेल्जम व स्पेनमधील ब-याच दिवसांचा संबंध तोडून टाकण्यांत आला, व याप्रमाणें बर्गंडीच्या पांचव्या चार्लसच्या वारसांतील हा मुलुख हॅब्सबर्गच्या वारसदारांच्या सत्तेखालीं गेला. व हाच पुढें आपल्या भावाच्या मृत्युनंतर बादशहा ६ वा चार्लस म्हणून प्रसिद्धीस आला. याप्रमाणें पुढें हें बेल्जिक प्रांत सुमारें एक शतकपर्यंत ऑस्ट्रियन नेदर्लंड म्हणून इतिहासांत प्रसिद्ध आहेत. सुरवातीस बेलजी लोक ऑस्ट्रियाची सत्ता मानीतच नव्हते परंतु अनीसेन्स नांवाच्या बेलजी देशभक्ताचा शिरच्छेद सन १७१९ या वर्षीं ऑस्ट्रियानें केल्यामुळें माक्किर्स दि प्राय याची सत्ता बेल्जममध्यें प्रस्थापित होऊं लागली. यानें आस्टेंड येथें बदंर करूंन पूर्व आणि पश्चिम इंडीजशीं व्यापार करणारी एक कपंनी स्थापिली. परंतु ती स. १७३१ त मोडण्यांत आली.

जवळ जवळ १६ वर्षें (१७२५ ते १७४१ पर्यंत) बादशहाची बहीण मेरी एलिझाबेथ ही गव्हर्नर जनरल होती. हिच्या कारकीर्दींत सर्वत्र शांतता नांदत होती. तिच्या मृत्यूनंतर महाराज्ञी मराया थेरिसा  हिनें आपल्या चार्लस लारेन नांवाच्या मेहूण्यास गव्हर्नर जनरल नेमलें. हा जवळ जवळ ४० वर्षें गव्हर्नर जनरल होता. व त्यानें लोकांत फार चांगल्या रीतीनें वागवल्यामुळें त्यास ''चांगला गव्हर्नर असें नांव पडलें. याच्या कारकीर्दीचीं पहिली वर्षें धुमाकुळीचीं गेलीं. ऑस्ट्रियाला वारसाच्या युद्धांत हा देश फ्रान्सनें जिंकला पण पुढें एक्सला शॅपेलच्या तहानें हा पुन्हा स. १७४८ मध्यें ऑस्ट्रियाला परत मिळाला. सातवर्षाच्या  युद्धांत बेल्जम देशांत शांतता नांदत होती. चार्लस लारेन हा बेलजी लोकांशीं मिळून मिसळून वागत असें. त्यानें  बेल्जियन लोकांनां स्वातंत्र्य मिळण्याबद्दल फार प्रयत्न केलें त्यानें शेतकीला उत्तेजन दिलें व मोठमोठें कालवे बांधले. व याप्रमाणें बेल्जम देश पुन्हां भरभराटीस आणला त्यानें ज्ञानाच्या वाढीप्रीत्यर्थ फार मेहनत घेतली व एक शास्त्रीय विद्यालय स्थापिलें.

मेराया थेरिसाच्या मृत्यूनंतर लौकरच लारेनचा चार्लस मरण पावला. नंतर दुसरा जोसेफ यानें आपली बहीण मेरी किस्टाईन हिला गव्हर्नर जनरल नेमलें तो बेल्जमच्या राज्यव्यवस्थेत प्रत्यक्ष लक्ष घालू लागला. परंतु त्याचें सुधारणेचें बेड सारासार विचारास धरून नसल्यामुळें जिकडे तिकडे अडथळे उपस्थित होऊं लागलें. संयुक्तप्रांत इंग्लंडशीं लढण्यांत गुंतलेले पाहून त्यानें बेल्जमच्या राज्यव्यवस्थेस विद्यातक असें सर्व निबंध फेंटाळून लावण्याची ही संधि साधली व डच लोकांनां सरहद्दीवरील शहारांतून सैन्य काढून टाकण्यास भाग पाडलें. परंतु शेल्ड नदीचा व्यापार मात्र त्यास खुला करतां येईना. यामुळें तो बेलजी लोकांचा कांहींसा आवडता झाला. परंतु त्याच्या अंतर्गत सुधारणांचा मात्र अगदीं उलट परिणाम झाला. लोकांचे हक्क व जुन्या संस्था मोडून टाकल्यामुळें त्यावर लोकांचा फार रोष झाला. शिवाय धार्मिक बाबतींत त्यानें सर्व पंथास सारखी मुभा दिली. या कारणामुळें त्याच्याविरूद्ध लोकमत फार खवळलें. यामुळें लोक चिडून जाऊन त्यांनीं हॉलंडमध्यें सैन्य जमविलें. व ऑस्ट्रियाचा टर्नहाऊन येथें पराभव केला. ब्रबंटच्या संस्थानांनीं स्वातंत्र्य पुकारलें. व सन. १७९० मध्यें सर्व बेल्जमनें ''बेल्जियन संयुक्त संस्थाने” या नांवाखालीं स्वातंत्र्याची ध्राजा फडकावली. थोडक्याच दिवसांत दुसरा जोसेफ मरण पावून त्याच्या गादीवर दुसरा लिओपोल्ड बसला.

लिओपोल्डनें मोठ्या गोडीगुलाबीनें सत्ता परत मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सिद्धीस गेला नाहीं. तेव्हां ऑस्ट्रियाच्या सैन्यानें बेल्जममध्यें प्रवेश केला, तेव्हां लोकांचे नेते पळून गेलें. व मराया थेरिसाच्या वेळची राज्यव्यवस्था पुन्हां पुकारण्यांत आली. याप्रमाणें ऑस्ट्रियाची सत्ता पुन्हां स्थापण्यातं आली; परंतु ती फार दिवस टिकली नाहीं. १७९२ या वर्षीं फ्रान्सची क्रांतीकारक सेना बेल्जममध्यें शिरली व तिनें बेल्जम देश जिंकून घेतला. कँपो फार्मिओ व लुलेव्हिले (१८०१) च्या तहांनें हा प्रदेश फ्रेंचांच्या ताब्यांत गेला. व त्याप्रमाणें बेल्जम फ्रेंच प्रजासत्ताक राज्याचा एक अवयव होऊन फ्रेंच राज्यव्यवस्था येथें सुरू झालीं. स. १८१४ मध्यें कांहीं दिवस बेल्जम  पुन्हां ऑस्ट्रियाच्या अमलाखालीं आले; परंतु लौकरच बेल्जम व हालंड देश  एक करूंन नेदर्लंडचें राज्य स्थापण्यांत आलें. ऑरेंजचा राजा हा येथील गादीवर पहिला विल्यम हें नावं धारण करूंन बसला.

याप्रमाणें स. १८०३ पर्यंत चाललें. बेलजी व डच लोकांचे आचारविचार, स्वभाव व धर्म गेल्या शंभर वर्षांत अगदीं निराळ्या प्रकारचे बनल्यामुळें त्यांच्यामध्यें स्वभावतःच शांतता नांदेना तशात बेल्जमवर फ्रेंचांच्या २० वर्षांच्या सत्तेचा फारच परिणाम झाला होता. फ्रेंच विचार आणि भाषा हीं या देशांत प्रचलित झालीं होतीं. विल्यमच्या हातांत बरीच सत्ता देण्यांत आली होती. ती उदारमतवादी बेलजी लोकांनां आवडेना. शिवाय फ्रान्सच्या क्रांतिकारक सैन्यानें केलेंल्या हानीप्रीत्यर्थ डच लोकांनां बेल्जम देश देण्यांत आला असा डच लोकांचा समज झाला. व यामुळें साहजिकच डच लोकांनीं बेलजी लोकांनां लुबाडण्यास सुरवात केली. शिवाय विल्यम हा स्वतः डच असून त्याची राजधानी हॉलंडमध्येंच होती शिवाय तो प्रॉटेस्टंट मताचा होता. शिवाय  नॅशनल कौन्सिलांत डच लोकांची संख्या जास्त असें. विल्यमच्या मनांत डच भाषा ही सर्वांनां आली पाहिजे, असें होतें. म्हणून हा भाषेचा प्रश्न उपस्थित झाला. याला बेलजी लोकांनीं फार अडथळा आणला. विल्यमच्या कारकीर्दींत बेल्जमचा व्यापार फार वाढला, व शिक्षणविषयक संस्थांची वाढ सपाटून झालीं. १८२५ या वर्षीं लुव्हेनला तत्त्वज्ञानाचें विद्यालय स्थापण्यांत येऊन त्या ठिकाणीं प्रत्येक धर्मोपदेशकानें २ वर्षें अभ्यास केल्याशिवाय त्याला धर्मोपदेशकच होतां येणें बंद करण्यांत आलें. व याच्याविरूद्ध चळवळ करणा-या भटजींस शिक्षा सुनावण्यांत आल्या. १८२८ या वर्षीं दोन परस्परविरूद्ध असें कॅथॉलिक अल्ट्रामांटेनस व क्रांतिकारक उदारमतवादी असें दोन पक्ष निर्माण झालें.  व त्यांनीं डच सरकारविरूद्ध एकी केली, व बेलजी लोकांसाठीं स्वतंत्र राज्यव्यवस्था निर्माण करण्याप्रीत्यर्थ अर्जावर अर्ज करण्यांत आले.

इकडे अशी स्थिति असतांना, फ्रान्समध्यें स. १८३० त बंड पुकारण्यांत आलें. ही गोष्ट ब्रुसेल्समध्यें हां हां म्हणतां पसरली. व ब्रुसेल्स शहरानें बंडाचें निशाण उभारलें. या बंडाच्या ज्वाला जिकडे तिकडे पसरल्या .व लुटालुट, दंगेधोपे, यांचें साम्राज्य माजलें. ब्रुसेलसकारांनां वॉन मॅनेन नांवाच्या प्रधानास काय तें काढून टाकावयाचें होतें व बेल्जमची निराळी राज्यव्यवस्था स्थापावयाची होती. या धंगयाधोप्याचें पर्यवसान राष्ट्रीय बंड पुकारण्यात झालें. तेव्हा राज्याचा वारस प्रिन्स आरेंज हा बेल्जममध्यें आला. हेग येथें एक मोठी खास सभा भरविण्यांत आली. तींत बेल्जमच्या राज्यव्यवस्थेसंबंधानें वाटाघाट सुरू झालीं. इकडे विल्यमचा मुलगा फ्रेडरिक हा १४००० सैन्य घेऊन ब्रुसेल्सनजीक येऊन ठेपला. त्याला लोकांनीं अडथळा करूंन मागें परतविलें. ब्रुसेल्सच्या तात्पुरत्या नेमलेल्या सरकारनें स्वातंत्र्याचा पुकारा केला. विल्यम राजानें तडजोडीचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु तो फार उशीरा करण्यांत आला. पुढें यूरोपांतील ५ प्रमुख राष्ट्रांची सभा भरविण्यांत येऊन  हा तंटा तडजोड करूंन मिटविण्यांत येण्याचें ठरलें. १० नोव्हेंबरला नॅशनल असेंब्लीची सभा बोलवण्यांत आली. व तींत फार महत्त्वाच्या तीन गोष्टी अशा ठरविण्यांत आल्या त्या:- (१) राष्ट्राला स्वातंत्र्य, (२) सनदशीर राजसत्ताक राज्यपद्धति देणें व (३) आरेंज ( नासो) घराण्याची कायमची हकालपट्टी करणें. पुढें राजा निवडण्यांत येऊन  ब्रिटिश पार्लमेंटच्या धर्तीवर एक राष्ट्रीय संस्था निर्माण करण्यांत आली राजाला मंत्रिमंडळ निवडण्याचा अधिकार दिला गेला. कायदेकारी मंडळ-सीनेट व ''चेंबर ऑफ डेप्युटीज” या दोन संस्था मिळून झालें. सिनेटर्स व डेप्युटीज यांनां पगार ठरविलेल्या असें. लिओपोल्ड हा पहिला राजा निवडण्यांत आला. याच सुमारास डच लोकांनीं बेल्जमवर चाल केली, परंतु इकडे फ्रेंच सैन्याची कुमक बेल्जमला येऊन पोंचली. त्यामुळें प्रिन्स ऑफ आरेंजला परत फिरावें लागलें.

इकडे लंडन येथें भरलेल्या सभेनें बेल्जम व हॉलंड यांच्यामधील संबंध अगदीं अखेरचा तुटला असें जाहीर केलें. याला ''विभक्ततेचा तह” असें म्हणतात. या तहाची कलमें बेल्जमच्या फारशी हिताचीं नव्हतीं. या तहावर १८३१ यावर्षीं सीमेटच्या सभासदांनीं चरफडतच सही करण्यास रूकार दिला. या तहान्वयें लुग्झेंबर्गचा भाग विभागला गेला. राष्ट्रीय कर्जाची सारखी  विभागणी करूंन अर्ध्या कर्जाचा बोजा बेल्जमवर लादण्यांत आला. इतर राष्ट्रांनीं बेल्जमचें स्वातंत्र्य कबूल केलें पण ते यापुढें तटस्थ राष्ट्र म्हणून ठरविण्यांत आलें. याप्रमाणें यूरोपयच्या मोठमोठ्या राष्ट्रांनीं बेल्जमाचें स्वातंत्र्य कबूल केलें असतां. हालंडचा राजा विल्यम हा तें कबूल करीना, तेव्हां फ्रेंच व इंग्लिश सैन्य बेल्जममध्यें शिरून त्यानें अँटवर्प घेतलें. १८३८ या वर्षीं हालंडचा राजा तहाच्या अटी पाळण्यास कबूल झाला. परंतु लुग्झेंबर्गबद्दल मात्र लढा उरला. परंतु बेल्जमच्या राजाला तहाच्या कलमाबरहुकूम वागण्यास इतर राष्ट्रांनीं १८३९ मध्यें भाग पाडलें.

पुढें ज्या कॅथॉलिक आणि लिबरल पक्षाच्या एकीमुळें बेल्जम स्वतंत्र झालें, त्यांच्यांत भांडणें सुरू झाला. १८४८ या वर्षीं बेल्जममध्यें नवीन सभासद निवडण्याची पद्धति सुरू केली. यामुळें १८४८ या वर्षीं फ्रेंच राज्यक्रांतीची लाट बेल्जममध्यें पसरली नाहीं. यावेळीं जिकडे तिकडे रेल्वे उघडण्यांत आल्या व चोहोंकडे जाण्यायेण्याची चांगलीं सोय करण्यांत आली. याच सुमारास परराष्ट्रांशीं व्यापारी तह करण्यांत आले. १८५० मध्यें मध्यम स्थितींतील लोकांच्या शिक्षणाविषयींचें बिल पास करूंन घेण्यांत आलें. १८५३ सालीं शेल्ड नदीवरील व्यापार खुला करण्यांत आला. १८६५ मध्यें लिओपोल्ड (पहिला) मरण पावला. व त्याचा मुलगा दुसरा लिओपोल्ड हा गादीवर बसला. आतांपर्यंत फ्रेंच ही सरकारदरबारी भाषा होती. परंतु यापुढें फ्लेमिश आणि बेल्जम  या भाषा उपयोगांत आल्या. याचा मुख्य उद्देश हाव कीं, बेलजी लोक  हे वास्तविक ट्युटॉनवंशीय असल्यामुळें बेल्जम सर्व फ्रेंचमय होऊं नये म्हणून फ्रेंच भाषेची हकालपट्टी करण्यांत आली. आजपर्यंत कॅथोलिक पंथाचें शिक्षण  शाळांमधून मिळत असें. परंत १८७९ या वर्षीं कायदा पास करूंन, निरनिराळ्या पंथांनीं आपापल्या मतानुसार शिक्षण द्यावें असें ठरविण्यांत आलें. १८८६ या वर्षीं एक मोठा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला. हा प्रश्न म्हणजे जर्मनीच्या धर्तीवरील (सोशॅलिझम्) समाजसत्तावादाविषयीं होय. तसाच फ्रेंच समाजसत्तावादहि वॉलूनस्मध्यें  बराच पसरला होता. १८८६ या वर्षीं एकाएकी समाजसत्तावादीयांनीं बंड पुकारलें. तें कसेंबसें मोडण्यांत आलें. परंतु यामुळें पुष्कळ नवीन सामाजिक कायदे करण्यांत आले. १८९२ या वर्षीं आतां राज्यव्यवस्थेची पुन्हां नवीन घटना केली पाहिजे असें जाहीर करण्यांत आलें. यावेळीं प्रोफेसर नायसेन्स यानें आजपर्यंत माहीत नसलेली अशी सभासद निवडण्याची पद्धति सुचविली. ती १८९५ या वर्षीं पास करण्यांत आला. १८८७-१९०० सालापर्यंत कामकरी लोकांची स्थिति सुधारण्याप्रात्यर्थ बरेच कायदे करण्यांत आले. १९०५ या वर्षीं बेल्जमच्या साम्राज्याचा ७५ वा वाढदिवस करण्यांत आला.

१९०५ च्या सुमारास कांगोमधील प्रश्न फार कठिण होऊं लागला. इ. स. १८७८ मध्यें एक कमेटी (मंडळ) नेमली गेली. पुढें तिला जगद्व्यापी स्वरूप प्राप्त झालें. १८८९ या वर्षीं दुस-या लिओपोल्डनें आपण कांगोचें संस्थान बेल्जमला दिलें असें जाहीर केलें. पुढें कांगोमध्यें फार बंडाळी माजल्यामुळें १९०८ सालीं तह करण्यांत आला. व एकदांचें कांगो संस्थान १९०८ मध्यें खालसा करण्यांत आलें.

१९०९ सालीं दुसरा लिओपोल्ड राजा मरण पापला. त्याच्य कारकीर्दींत बेल्जमाची सर्वांगीण सुधारणा झालीं होती. बेल्जमच्या वसाहती वाढविण्याकडे त्याचें लक्ष फार वेधलें होतें. त्याच्यानंतर आल्बर्ट हा गादीवर बसला. त्यानेंहि लिओपोल्डचें अनुकरण करूंन बेल्जमची सर्वांगीण प्रगति करण्याकडे आपलें लक्ष वेधलें. १९१४ सालीं सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास करण्यांत आला.

१९१४ सालीं ऑगस्टच्या २ तारखेला जर्मनीच्या बेल्जममधील वकिलानें फ्रान्सवर स्वारी करण्यासाठीं आपल्या सैन्याला बेल्जममधून वाट देण्याबद्दल निर्वाणीचा खलिता पाठविला; व त्याबरोबरच लीज व नामूर या किल्लयांचा उपयोग करण्याची परवानगी मागितली. बेल्जमनें त्याला संमति दिली नाहीं. जर्मनीनें बेल्जमवर सैन्य पाठवलें. बेल्जमनें आपलें सर्व सैन्य जमवून जर्मन सैन्याचा प्रतिकार केला. तथापि जर्मन सैन्यापुढें बेल्जम सैन्याचें कांहींच चालेना. जर्मनीनें लीज किल्ल्याला वेढा देऊन अनेक चकमकीनंतर तो किल्ला सर केला. त्यानंतर जर्मनीनें म्यूस दरीकडे व लग्झेंबर्गच्या प्रांताकडे आपला मोर्चा फिरविला. यावेळीं फ्रेंच सैन्य बेल्जमच्या मदतीला धांवून आलें. जर्मनीनें नामूर किल्ल्याला वेढा दिला. आसपासच्या भागांत जर्मनीनें भयंकर अत्याचार व कापाकापी करूंन नामूरचा किल्ला आपल्या ताब्यांत आणिला, पुढें थोडक्यात दिवसांनीं जर्मन सैन्य ब्रुसेल्समध्यें शिरलें. जर्मनांचा निकराचा प्रतिकार करण्यासाठीं सर्व बेल्जम सैन्य अँटवर्पच्या किल्ल्यांत गोळा झालें. लगेच जर्मनांनीं अँटवर्प किल्ल्यावर आपला रोंख घरला; व भयंकर रक्तपातानंतर त्यांनीं तो किल्ला आपल्या ताब्यांत घेतला. बेल्जम पादाक्रांत होतांच त्याची राज्यव्यवस्था जर्मनीनें आपल्या ताब्यांत घेतली. त्यांनीं आपली राज्यपद्धति त्या ठिकाणीं सुरू केली. भेल्जम लोकांच्या हितसंबंधांची व हक्कांची सरसहा पायमल्ली सुरू झालीं. बेल्जमच्या जर्मनीकरणाला सुरवात झालीं. तथापि इतक्या भयंकर स्थितींतहि बेल्जियनांनीं आपलें राष्ट्रीयत्व अद्यापीहि जिवंत ठेवलें होतें. शक्य तेथें व शक्य त्या ठिकाणीं त्यांनीं जर्मनीला विरोध करण्याचें व्रत सुरू ठेवलें होतें. अशी स्थिति पाहून जर्मनीनें बेल्जमची राज्यव्यवस्थेच्या सोईसाठीं दोन शकलें करावयाचें ठरवून त्याप्रमाणें बेल्जमचे दोन भाग पाडले, व त्या भागांचा स्वतंत्र रीतीनें राज्यकारभार सुरू झाला एका भागांतील दरबारभाषा फ्लेमिश करण्यांत आली. व दुस-या भागांत फ्लेमिश व जर्मन अशा दोन राजभाषा ठरविण्यांत आल्या. या योजनेची बेल्जम लोकांनीं अजिबात पर्वा बाळगली नाहीं. तथापि कांहीं राष्ट्रघातकी बेल्जियनांनीं या योजनेला संमति दिलीच.

अशा रीतीनें जर्मनींनें बेल्जमचा बहुतेक टांपू आपल्या कबज्यांत आणून त्यावर आपली सत्ता गाजविण्यास सुरवात केली होती, तर यावेळीं बेल्जम सरकारनें हाव्रे येथें आपलें ठाणें देऊन आपलें सैन्य आस्ते जमा करण्यास सुरवात केली. शेवटीं १९१८ सालीं जर्मनीचा सर्व बाजूंनीं पराभव झाल्यामुळें बेल्जममधील जर्मनीचा तळ उठला व पुन्हां बेल्जम हें बेल्जियनांच्या ताब्यांत आलें. त्यानंतर बेल्जमची पुनर्घटना करण्याचें प्रचंड काम बेल्जमसरकारपुढें उभें राहिलें. बेल्जमची परिस्थिती महायुद्धमुळें अतिशय नाजुक झालीं होती, तथापि बेल्जम सरकारनें बेल्जियम लोकांच्या साहाय्यानें आपला जम हळू हळू बसविला. १९१८ सालीं बल्जम व फ्रान्स यांच्यामध्यें सलोख्याचा व परस्परसाहाय्याचा तह करण्यांत आला. अँटवर्पचा किल्ला पुन्हां बांधण्यांत आला. व्यापाराच्या वृद्धीबद्दल खटपट करण्यांत आली. इनकमटॅक्स, दारूबंदी इत्यादि कायदे पास करण्यांत आले. जर्मनीला अनुकुल असलेल्या अँक्टिव्हिस्ट पक्षाचा मोड करण्यांत आला राष्ट्रसंघांत बेल्जमला मानानें शिरकाव मिळाला.

वा ड्ः म य– सामान्यपणें या देशाचें वाड्ःमय फ्लेमिश, वलून व फ्रेंच या तीन भाषांत विभागले गेलें आहे. स .१८३० मध्यें बेल्जमचा नेदर्लंडपासून संबध सुटला व तेव्हां पासून फ्लेमिश वाड्ःमयास जास्त जोर आला (फ्लेमिश वाड्ःमय स्वतंत्र दिलें आहे.) बेलजियन ग्रंथकारांच्या अंगीं १८७०-८० पर्यंत प्रांताभिमान होता व त्याला अनुसरून ते ग्रंथनिष्पत्ति करीत. बेल्जियन –फ्रेंच वाड्ःमय राष्ट्रीयदृष्टि थोडीं असून पॅरिस किवां फ्रेंच वाड्ःमययाचीच छाप त्याच्यावर आढळून येते; हे ग्रंथकार फ्लेमिश जातीचे आहेत; काल्पनिक व गूढ वर्णनें फ्रेंच धर्तीवर आणि सत्य व स्पष्ट वर्णनें फ्लेमिश धर्तींवर करण्याची यांची रीत असें. परंतु स. १८८० नंतर हा मनु पालटत  चालला. स. १८३० च्यापूर्वीं कांहीं नामांकित ग्रंथकार होऊन गेलें. अडोल्फ मँथ्यू याच्या वाड्ःमयांत बहुश: प्रेमविषयच प्रधान असें. ऑगस्ट क्लॅव्हॅरिओ (१७८७) हा एक कवि होता; याच्या आनंदपर्यवसायी कथागोष्टींत डच व फ्रेंच वाड्ःमयाची छाया आढळतें. स्मिटस  याच्या ग्रंथांत देशभक्ति दृगोचर होतें. बंडानंतर बेलजियन वाड्ःमयाची वाढ झपाट्यानें होऊं लागली. अँडे्रव्हान हॅसेल्ट याच्या घराण्यांत तर, कवि, ग्रंथकार, कारागीर, गायक, वादक वगैरे लोक बरेच निपजले. चार्लस द कोस्टरच्या प्रणयी कादंब-या हे त्या विषयांतील उत्तम ग्रंथ होत. पिरमेझ, क्लेसी, क्विनेट, वेकन, लॅबारे, डेल्मोटे, पोट्वीन वगैरे कोणी कवी, कोणी नाटककार तर कोणी ग्रंथकार या काळांत प्रख्यातीस आले ( १८००-८०) डेल्माटेनें बेलजियन वाड्ःमयाचा इतिहास ४ भागांत लिहिला आहे व वेमेलनें (१८८०) बल्जम देशाचा इतिहास व बेल्जियन ज्ञानकोश लिहिला आहे. कास्टेरप्रमाणेंच रूइलेन्स ही कादंबरीलेखिका प्रसिद्ध होती (१८७८). परंतु या बहुतेक वाड्ःमय परकीय वाड्ःमयाचा आधार आहे ( फक्त कोस्टर व पिरमझ हे स्वतंत्र प्रतिभावान लेखक आहेत.) त्यामुळें त्यांत कांहीं नाविन्य आढळत नाहीं. तें लेमोनिएर याच्या काळापासून मात्र आढळतें, तो स्वतः एक अर्थानें अभिवबेल्जमचा उत्पन्नकर्ता होता; त्याच्या ग्रंथांत, त्याच्या नंतर वाड्ःमयक्षत्रांत ज्या ज्या सुधारणा किवां बनाव बनून आले, त्यांचा उगम सापडतो. मासिक पुस्तकांत ‘ल ज्यूने बेल्जिक’ हें मासिक श्रेष्ट दर्जाचें होतें, त्याचे लेखक वार्लोमॉन्ट, गिरौड सारखे विद्वान होतें पिकार्ड (हा उत्तम वकील होता) या लेखकानें नूतन लेखकांसाठीं लेखनकलेवर एक प्रो आर्टे नांवाचा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आहे (१८८६) एकहौड या लेखकानें सन १९०० पर्यंत अनेक कादंब-या लिहिल्या आहेत, त्यांत फ्लँडर्स शेतक-यांचें व त्यांच्या चालीरीतींचें चित्र पहावयास सांपडतें अभिनवबेल्जमच्या तरूण लेखकांनीं १८७० पासून लेखनव्यवसायास आरंभ केला. त्यांनीं मर्क्युरी द फ्रान्स या प्रख्यात फ्रेंच नियतकालिकांत प्रथम लिहिण्यास आरंभ केला. बेल्जियन कवी बहुतेक प्राचीन संस्कृतिप्रिय असतांत व त्यांचें काव्यहि तिच्यावर साधारणपणें रचिलेलें असतें. रॉडेन बाक (१८९८) यानें खेड्यातील साधारण जनतेंत सर्व तऱ्हेचें उत्पन्न होईल अशी ग्रंथनिष्पत्ति केली. अर्वाचीन ग्रंथकारांत मॉरिस मॅटरलिक यांची योग्यता फार मोठी आहे. मनांतील उच्च भाव अथवा कल्पना उत्कृष्टपणें सामान्य लोकांच्या मनावर बिंबविण्याचें काम याच्यासारखें दुस-यास साधलें नाहीं (१८९७). इतिहास, पुरणवस्तुसंशोधन, भूगोल, गायन, पुरातत्त्व वगैरे विषयांवर गेल्या ४०-५० वर्षांत कांहीं लेखकांनीं ग्रंथ लिहिले आहेत.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .