विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बैगा- ही प्राचीन द्रविड जात असून तिचें वास्तव्य व-हाड मध्यप्रांत व मध्यहिंदुस्थान यांतून आहे. यांची एकंदर संख्या ५० हजारांवर आहे पैकीं व-हाड मध्यप्रांतांताच तीस हजार आहे. विंझाल किंवा विंझावर लोक पूर्वीं बैगाच असावेत पण आतां त्यांचा दर्जाबैगापेक्षां उच्च आहे. यांच्यांत वन्यधर्मीय व हिंदु निमेनीस आहेत. ईश्वरानें प्रथमारंभीं एक बैगा आणि बैगीण निर्माण केली. आणि त्याच्याच विंनतीवरून झाडें कापण्याचा धंदा करण्याची त्यांस परवानगी दिली. या जोडप्यास दोन मुलें व दोन मुली झाल्या. दोघां मुलांनीं आपआपल्या बहिणींशीं लग्रें केलीं. एकापासून बैग लोक जन्मले व दुस-यापासून गोंड जन्मले अशी यांची उत्पत्ति कथा आहे. हे लोक अगदीं डोंगराळ व झाडीच्या प्रदेशांत रहातात. पूर्वीं गोंडाचा प्रवेश या जातींत पुष्कळ होई. आतां अगदीं नाच लोकच फक्त गोंडांच्या मुली करतात.
सामानसंख्याक देवतांचें पूजन करणा-या कुलांत परस्पर विवाह होत नाहींत. आईच्या कुलांतील मुलगी वरण्यास मात्र हरकत नाहीं. विवाह प्रौढ वयांत होतात. मुलीला शुल्क द्यावें लागतें, अववा मुलानें भावी सास-याकडे २ वर्षे चाकरी करूंन त्याला खुश केलें म्हणजे झालें. दिराबरोबर पुनर्विवाह करणें इष्ट समजतात. पंचायतीच्या समोर काडी मोडली म्हणजे घटस्फोट झाला. बैगा लोक हे गोंडांचे पुराहित होत, यांनां कंदमुळें व वनस्पतींची बरीच माहिती आहे. जंगलाची कापणी व लागवड हा धंदा बैगा लोक पूर्वीं करीत असत आतां त्यास शेती करणें शिकविले जातें. कांहीं लोक टोपल्या व चट्या विणतात, कांहीं मध विकतात, कु-हाडीचा उपयोग यांस फार चांगला करता येतो. बैगा लोक आपली मूळ भाषा अजीबात विसरले. ते आतां मोडकें तोडकें हिंदी बोलतात.