विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोकेशियो (१३१३-१३७५)– एका इटालियन ग्रंथकर्ता. प्रथम त्यानें कायद्याचा अभ्यास आरंभिला, पण नंतर तो व्यापार करण्याकरितां नेपल्स येथें राहिला, पुढें व्हर्जिलचें थडगें पाहिल्यापासून त्यानें स्वतःला काव्याला वाहून घेण्याचें ठरविलें. त्याची 'फिलोकोप' ही एक गद्य कथा असून हा त्याचा पहिला ग्रंथ होय. 'अँमेटो' यामध्यें त्यानें प्रेमाचें साम्राज्य संस्कृतिजनक कसें असतें याचें वर्णन केलें आहे. 'एल अमोरोसा फायमिता' हा त्याचा गद्यात्मक ग्रंथ आहे. यांत 'फायमिता' ही आपल्या दैवास दोष देत आहे व आपल्या प्रेमाच्या विषयास बेफिकीरपणाबद्दल दोषी ठरवीत आहे असें दर्शविलें आहे.
पुढे तो राजकीय बाबतींत शिरला व त्याच्याकडे महत्त्वाचीं कामें सोंपविण्यांत येऊं सागलीं, परंतु पेट्रार्च व डान्टे यांच्या सारखा मुत्सद्दी तो नव्हता. १४ व्या शतकांत प्राचीन वाडःमयाचें अध्ययन करण्याची प्रवत्तॢ इटलींत फारच थोडीं होती. सर्व लोकी राजकीय घडामोडींत गुंतले होतें आणि वाड्ःमय, सुस्त व अशिक्षित अशा धर्मगुरूंच्या हातांत होतें अशा तऱ्हेंनें वाड्ःमयाविषयीं सर्वत्र अनास्था असतां बोकेरितीनें अत्यंत परिश्रमानें व काळजीनें त्यांतील हस्तलिखितें उर्जितावस्थेत आणलीं; व कित्येक महत्त्वाच्या नकला त्यानें स्वतः बसून तयार केल्या. 'डेकॅमेरॉन’ या त्याच्या उत्तमोत्तम व प्रसिद्ध गद्य ग्रंथांत १०० कथा ग्रंथित केल्या आहेत. या कथा ब-याचशा भावनात्मक व अश्लील असून रेनाल्डच्या कांदब-यांप्रमाणें त्यांचा तिटकारा वाटणें साहाजिक आहे. पण बोकेशियोच्या काळीं हा ग्रंथ तरूणांत फार लोकप्रिय झाला. त्यावरून त्याला 'इटालींतील गद्यात्मक वाड्ःमयाचा जनक' असें वास्तविक म्हणावयास पाहिजे. त्याच्या स्वंतत्र भाषाशैलीचें वर्चस्व त्याच्यानंतर झालेंल्या सर्व लेखकांवर असल्याचें दिसून येतें.