विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोरिया– असाममधील एक जात. या जातीची लोकसंख्या (१९११) २१५१३ आहे. हीजात फक्त असामांतच आढळतें. या लोकांची उत्पति गणक विधवा व ब्राह्मण पुरूष यांपासून झालीं आहे. 'बारि, म्हणजे विधवा व त्यावरूनच बोरिया हें नांव पडलें. हे लोक आपणाला सूत' म्हणवितात. लग्राच्या आधीं पूर्ण वयांत आल्यामुळें नंतर हलक्या जातींच्या पुरूषांशीं लग्र झालेंल्या ब्राह्मणांच्या मुलींपासून झालेंल्या मुलांनां बोरिया जातीचेच समजतात.