विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोर्डो– हें शहर फ्रान्सच्या नैर्ॠत्य भागांत असून गिराँडी विभागांतील मुख्य शहर आहे. येथील लोकसंख्या (१९२१) २६७४०९ आहे. हें फ्रान्स देशांतील अति मोठ्या, रमणीय शहरांपैकीं एक आहे. शहरांतील मुख्य विहार मध्यभागाच्या जवळच आहेत. ह्यांत उत्तम उत्तम सार्वजनिक बागाअलिसडीटारनी, प्लेस डेस् क्विकान्सेस इत्त्यादि विहार आहेत. सार्वजनिक बागेजवळच रोमन लोकांच्या वेळच्या नटकगृहाची अर्धचंद्राकृति एक भिंत अजून अर्धी मुधीं उभी आहे. येथील शिक्षणविषयक संस्थांत कायद्याची शाखा, शास्त्रशाखा, वाड्ःमयशाखा व वैद्यकशाखा व औषधी तयार करणारी शाखा ह्या होत. ह्याशिवाय कॅथोलिक तत्त्वज्ञान शाखा, शिक्षक शिक्षणाची मोठी शाळा, व्यापारी शिक्षणाची उच्चशाळा, कृषिपीठ, नाविकांची व वैद्यकशाळा ह्या होत. येथें बरींच पदार्थसंग्रहालयें आहेत. येथें एक विश्वविद्यालय आहे. बोर्डोचा व्यापार मुख्यत्वें समुद्रांतून होतो. येथें दारूची सर्वांत अधिक विक्री होतें.