विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोलपूर– बंगाल, बिरभुम जिल्ह्याच्या एका पोट विभागाचें मुख्य गांव. हें ईस्टइंडियन रेल्वेवर हौ-यापासून ९५ मैलांवर आहे. लोकसंख्या ३१३१. हें व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणीं रवींद्रनाथ टागोर यांनीं काढिलेलें 'शांतिनिकेतन' व 'विश्वभारती' विद्यालय आहे.