विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बौरिंगपेठ.– ह्मैसूर .कोलार जिल्ह्यांतील एक तालुका. यांत मुख्य गांवें दोन; कोलार (सुवर्ण खाणी) व बौरिगपेठ. बराच भाग डोंगराळ आहे. यांत बेटमंगल व रामसागर हीं तळीं आहेत. कोलारच्या सोन्याच्या खाणींच्या कारखान्यामुळें एकंदर प्रदेशांचें पूर्वींचें ओसाड स्वरूप बदलून आंता बौरिंगपेठ हे भरभराटीच्या उद्योगधंद्याचें एक मुख्य ठिकाण झालें आहे. बौरिंगपेठ हें मद्रास- सदर्नमराठा व म्हैसूर रेल्वे यांच्या जंक्शनचें स्टेशन आहे. येथूनच कोलारच्या खाणींकडे एक फांटा जातो. बौरिंग नांवाचा एक चीफ कमीशनर होता त्याचें स्मारक म्हणून या गांवाला त्याचेंच नांव दिलें.