विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रह्मदेव– सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत जो रजोगुण, त्याची मूर्तीमान देवता. यास चार मुखें असल्यानें चतुर्मुख, चतुरानन म्हणतात. यानें संकल्पमात्रेंकरूंन सर्व सृष्टि निर्माण केली. संपूर्ण देव, ॠषि प्रजापति, यांचा हाच कर्ता असल्यामुळें यास धाता विश्वसृट् इत्यादि अर्थाची अनेक नांवे असून पुत्राकडून कांहीं प्राणी उत्पन्न केल्यामुळें यास पितामह असेंहि म्हटलेलें आहे.