प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर 
 
ब्राह्मण- हिंदुस्थानांत मात्रसंस्कृतीचे लोक प्रथम आले, त्यापूर्वींच त्यांच्यांत दोन वर्ण म्हणजे वर्ग उत्पन्न झाले असावे ते आर्य व दास होत. उपाध्यायवर्गास वर्ण हा शब्द ॠग्वेद काळीं लागला नव्हता.

प्रस्तावनाखंडामध्यें तिस-या विभागांत ब्राम्हण्याचा इतिहास दिला आहे. त्या ठिकाणीं असें दाखविलें आहे कीं, पुरोहित किंवा उपासकाचा धंदा करणा-या वर्गाचें अत्यंत जुनें नांव अथर्वन् किंवा अथ्रवन असें असावें. पर्शुभारतीय काळामध्येंच त्याचें सामाजिक अग्रेसरत्व स्थापन झालें होतें. व याच वर्गास ब्रह्मन् असेंहि नांव मिळालें असावें. ब्रह्मनचा मुलगा तो ब्रह्मपुत्र अगर ब्राह्मण. हीं दोन्ही नांवें सारख्याच वेळीं ॠग्वेदांत येत असल्याकारणानें पौरोहित्य वंशपरंपरा झालेंच होतें. ब्रह्मन् हा शब्द देखील बृह् (स्तुति करणें अगर वाढविणें)  +मत् यावरून झाला असावा. ब्रह्मन् या शब्दाचा अर्थ याज्ञिक वाङमयांत निराळ्या अर्थानें आला आहे, त्या अर्थीं  सोमसंस्था तयार होण्यापूर्वीं ब्रह्मन् व ब्राह्मण  हे शब्द प्रचारांत आले असावे व हा स्तुति करणारा अगर वृद्धि करविणारा वर्ग सोमसंस्थांच्या पूर्वीं म्हणजे यज्ञसंस्था मोठी होण्यापूर्वीं तयार झाला होता. जोपर्यंत यज्ञसंस्था रूढ असून पुरोहितांचा धंदा चालू होता तोंपर्यंत या वर्गांत इतर वर्गांतील व्यक्तींहि प्रवेश करूं शकत असत. या वर्गाला वर्ण हा शब्द ॠग्मंत्रोत्तरकालांत मिळाला असावा व याला जातिस्वरूप कुरूयुद्धोत्तर कालांत येऊं लागलें असावें असें दिसतें. म्हणजे यज्ञसंस्था मागें पडल्यामुळें नवीन ॠत्विज होणें बंद झालें.  व पूर्वींच्या पुरोहितवर्गास जातिस्वरूप प्राप्त झालें. तथापि इतर जातींशीं लग्नव्यवहार बराच कालपर्यंत बंद पडला नव्हता.

प्राचीन काळीं ब्राह्मणांमध्यें गोत्रसंस्था म्हणजे विशिष्ट कुलसमुच्चयाबाहेर विवाहसंबंध करावयास लावणारे नियम नसावेत पण मात्र गोत्रें होतीं, म्हणजे ब्राह्मण आजेपणजांच्या नांवावरून ओळखले जात असत. म्हणजे त्यावेळीं गोत्रें हीं कुलदर्शक नामें म्हणून प्रचारांत होतीं. प्रवर मात्र वाटेल त्या व्यक्तीचीं नांवें निवडीत. प्रवर म्हणजे आव्हान करण्यास योग्य अशा समजलेल्या व निवडलेल्या व्यक्ती. परंतु यज्ञसंस्था मृत होऊं लागल्याबरोबर  इतर कर्मप्रसंगीं, बापानें यज्ञप्रसंगीं पतकरलेले प्रवर मुलानें सांगावयाचे अशी पद्धति सुरू झाली, आणि नवीन प्रवर निवडण्याची क्रिया बंद झाली. प्रवर निवडतांना ॠग्वेदांतील मोठालीं मंडलें करणारे ॠषी किंवा आकाशांतील सत्पर्षी म्हणून प्रसिद्ध झालेंले ॠषी यांच्याशीं आपली परंपरा भिडवावी अशी इच्छा जागृत होती व तसे करण्यास थोडेंसें याज्ञिक कारणहि होतें आणि तें म्हटलें म्हणजे पतकरलेल्या म्हणजे प्रवर केलेल्या ॠषीप्रमाणें भिन्न देवता अगर आप्री (पशुयाग विषयक याज्यामंत्र) घ्याव्या असा नियम असे. तर ज्या ॠषींच्यामुळें भिन्न देवता उत्पन्न होणार त्या ॠषींशीं संबंध जुळविण्याची इच्छा होणें स्वाभाविक होतें व यामुळें विश्वामित्र, अग्नि, भरद्वाज, वसिष्ठ, कश्यप, आगस्त्य, गौतम, जमदग्नि या ॠषींशीं संबंध जुळविण्यांत येई व यांपैकीं कोणाशीं संबंध जुळवितां आला नाहीं तर अत्यंत प्राचीन ॠषी किंवा ॠषिकुल जे आंगिरस त्यांच्याशीं जोडण्यांत येई.

विशिष्ट गोत्राचे व प्रवरांचे लोक आघ्वर्यवाकडे किंवा हौत्राकडे जात असत असा नेम नसे; वाटेल त्या कुळांतील लोक स्वेच्छेप्रमाणें हौत्र किंवा आघ्वर्यव पतकरीत असत. त्यामुळें अघ्वर्यू किंवा होते यांमध्यें सामान्य अनेक गोत्रें सांपडतात. म्हणजे गोत्रांचा व वेदाध्ययनाचा संबंध कांहीं एक नव्हता. अनेक कुलांतील ब्राम्हण वाटेल तो वेद पतकरीत व त्यांत सुद्धां जेव्हां शाखाभेद किंवा सूत्रभेद झाले तेव्हां ते कोणत्या तरी पक्षास मिळाले. फरक एवढाच कीं, शुक्लयजुर्वेदी मंडळीमध्यें मात्र जुनीं गोत्रें कमी सांपडतात. त्यांची गोत्रमालिका कृष्णाहून किंवा आश्वलायनीय होत्यांच्या गोत्रांहून भिन्न आहे. म्हणजे जेव्हां शुक्लयजुर्वेदी वर्ग निर्माण झाला तेव्हां बराचसा भिन्न वर्ग यज्ञजीविवर्गांत शिरला.

ब्राम्हणांचें काम देवतांचे स्तुतिपाठ करूंन त्यांचे यज्ञ करण्याचें होतें, व क्षत्रियांचें काम लढण्याचें होतें. कामाचें विशिष्टीकरण पूर्णपणें कधींच झालें नव्हतें. यज्ञावर एकसारखें पोट भ्रत असेल काय ही शंकाच आहे. ॠषी लढाईंत पडत असत व पुढें ब्राह्मणहि पडत. वसिष्ठ लढाईच्या प्रसंगीं इन्द्रादि देवतांची भरतांकरितां स्तुति करतो व सुदास राजा लढतो असें वर्णन ॠग्वेदांत आहे. याच प्रकारचें काम विश्वामित्र, भरद्वाज, कण्व, आंगिरस वगैरे करतात व भरतांकरितां  स्तुति करूंन देवतांस संतुष्ट करतात. परंतु अद्याप या जाती इतर निर्बंधानें जखडल्या गेल्या नव्हत्या, म्हणजे त्यांचे आचारविचार भिन्न नव्हते, व त्यांच्यांत लग्नाचेहि निर्बंध नव्हते; म्हणजे क्षत्रियांच्या मुली ब्राह्मण करीत असत व ब्राह्मणांच्या मुली क्षत्रिय करीत असत. सोमवंशीय क्षत्रियांपैकीं कित्येक क्षत्रिय आपला क्षत्रियाचा धंदा सोडून ब्राह्मण होत असत, हें महाभारतांतील सोमवंशाच्या हकीकतीवरून स्पष्ट दिसतें. प्रतीपाचा ज्येष्ठ पुत्र देवापि हा क्षत्रियाचा धंदा सोडून वनांत जाऊन तपश्चर्या करूं लागला व त्यानें एक सूक्तहि केलें आहे. कण्व हा मतिनार याच्या वंशांत उत्पन्न होऊन ब्राह्मण झाला व पुढें त्याचे सर्व वंशज ब्राह्मणच झाले.

पण ब्राह्मण हा त्यावेळीं स्वतंत्र धंदा असावा अशी सामाजिक भावना होती असेंहि दिसतें; म्हणजे ब्राह्मणांनींच यज्ञ यागादिकांच्या क्रिया कराव्या असा ब्राह्मणांचा आग्रह होता. वेदविद्या पठण करण्याचें कठिण काम ब्राह्मणांनीं सुरू केलें होतें. यज्ञयागादिकांस लागणारी निरनिराळी माहिती व मंत्रतंत्र त्यांनीं जतन करूंन ठेवले होते, अर्थात ब्राह्मणांचें काम कठिण झालें असून त्यांनां आपली बौद्धिक शक्ति वाढवावी लागली होती. कोणत्याहि धंद्यास आनुवंशिक संस्कार फार उपयोगी पडतो हें प्रसिद्ध आहे. अर्थात ब्राह्मणांचीं मुलें हींच स्मरणशक्तीनें वेदग्रहण करण्यास योग्य असत. यामुळें साहजिकच ब्राह्मणाचा मुलगा हाच ब्राह्मण व्हावा असा आग्रह उत्पन्न होणें अपरिहार्य आहे. क्षत्रियांनीं ब्राह्मणांचा हा आग्रह प्रथम चालू दिला नाहीं व त्याजविषयीं मोठा तंटा केला ही गोष्ट आपल्यास वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या पौराणिक वादावरून स्पष्ट होतें. कथा खोटी खरी पण ती लिहिण्याचें प्रयोजन वादाचें अस्तित्व दाखविते. या वादाचीं निरनिराळीं स्वरूपें रामायणामध्यें व महाभारतामध्यें दिसतात, पण सर्वांचें तात्पर्य एकच आहे व तें हें कीं, ब्राह्मणाचा मुलगा, ब्राह्मण व्हावा आणि क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय व्हावा हा ब्राह्मणांचा आग्रह आणि विश्वामित्राचा आग्रह असा कीं, क्षत्रियाच्या मुलानें जर आपली बौद्धिक शक्ति वाढविली तर त्याला ब्राह्मण कां होतां येऊं नये? अखेरीस विश्वामित्राचा जय झाला व तो ब्राह्मण झाला इतकेंच नव्हे तर ब्राह्मण कुलाचा तो प्रवर्तक झाला.

वसिष्ट- विश्वामित्राच्या तंटयांत जातीच्या लग्नविषयक निर्बंधाचें जसें परीक्षण झालें तसें नहुष-अगस्ति या कथेमध्यें जातीच्या दुस-या एका गोष्टीचें परीक्षण झालें. ब्राह्मणाचा धंदा इतरांनीं कां करूं नये या वादाप्रमाणें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, ब्राह्मणांनां इतर जातींचा धंदा करावयास कां लावूं नये? नहुषानें सर्व ॠषींस आपली पालखी उचलावयास सांगितलें व त्यांस जेव्हां त्याची पालखी खांद्यावर घेऊन जलदीं चालतां येईना तेव्हां त्यास तो मोठमोठ्यानें 'सर्प सर्प' म्हणजे ''चाला चाला'' असें म्हणूं लागला. तेव्हां अगस्ति ॠषीनें त्यास  'तूं सर्प हो' असा शाप दिला आणि तो सर्प होऊन खालीं पडला (भारत वनपर्व अध्याय १८१,). या कथेंतील तात्पर्य हें कीं जे बौद्धिक धंदा करतील त्यांच्यावर शारिरिक मेहनत करण्याची सक्ति होऊं शकणार नाहीं!

ब्राह्मणप्रामुख्याचा इतिहास वैदिक कालापासून अत्यंत अर्वाचीन कालापर्यंत सातत्यानें  देतां येईल. ब्राह्मणांचें प्रामुख्य रहाण्याचें एक कारण म्हटलें म्हणजे त्यांनीं आपल्या वेदमूलक विद्येचा विकास करूंन प्रथम धर्मशास्त्र आणि नंतर कायदा आपल्या अभ्यासाचा विषय करूंन तो वेदमूलक वाङयाशीं निगडित केला आणि आपली धर्मशास्त्रज्ञता वेदांच्या पायावर उभारली हें होय. ज्या अर्थीं वेदग्रंथ कोणी वाचीत नव्हते आणि वेदार्थयत्न तर करणें दूरच होतें त्याअर्थीं ब्राह्मणांच्या वेदवाङमयमूलक म्हणविणा-या धर्मशास्त्राची तपासणी करून ब्राह्मणांचे अधिकार प्रश्नविषय करणारा वर्ग निघालाच नाहीं. गौतमबुद्धकडून तें काम झालेंच नाहीं व जैनांकडूनहि झालें नाहीं. दोघांचाहि वेदविरोध भीतभीतच होता. आणि वेद तपासण्याची ताकद कोणासहि नव्हती. व या त-हेच्या क्रिया व्हावयाच्या राहिल्यामुळें सर्व ब्राह्मणविरोध अत्यंत दुर्बल होता. ब्राह्मणांची उपयुक्तता शासनसंस्थांस अनेक त-हांनीं होती. राजसत्तेंतहि नियामक असें कांहीं तरी निर्बंध असले पाहिजेत ही भावना लोकांत असल्यामुळें त्या भावनेचा कोणी तरी फायदा घ्यावयास पाहिजे होता तो ब्राह्मणांनीं आपलें नातें धर्मशास्त्राशीं व वेदांशीं कायम ठेवून घेतला. आणि या परिस्थितीचा जो परिणाम उत्पन्न झाला तोच शेवटपर्यंत कायम राहिला. मुसुलमानी राज्यामध्यें ब्राह्मणमहत्त्व कमी न होतां वाढतच गेलें व याची कारणें दोन होतीं: एक तर ब्राह्मणांनीं आचार व प्रायश्चित्त हीं वाढवून आणि म्लेच्छांचें स्थान त्या सोवळ्याओंवळ्याचा नियमावरून शेवटचें ठेवून मुसुलमानी हिंदु समाजाचें पृथकत्व राखलें आणि सर्व समाजांत अशी भावना उत्पन्न झालीं कीं, हिंदु समाजाच्या अभिमानाचें आणि अभिमानमूलक भक्तीचें आश्रयस्थान होणारा राजन्यवर्ग नष्ट झाल्यामुळें ब्राह्मण हेच भक्तीचें आश्रयस्थान झालें व आम्ही हिंदू असून परचक्राच्या त्रासामुळें मुसुलमानांचा हुकूम जरी आम्हांस मानावा लागला तरी आमच्या निष्ठेचे खरे अधिकारी निराळे आहेत अशी भावना हिंदूमध्यें जागृत ठेवावी लागली त्यामुळें ब्राह्मणसन्मान ही एक सामाजिक आवश्यकता उत्पन्न झालीं.

राजन्यवर्गाच्या नाशास दोन कारणें झालीं. एक कारण हें कीं राज्यक्रांति होई तेव्हां पूर्वीं राजत्व भोगीत नसलेलें दुसरें कुल पदाधिष्ठित होई. तें पूर्वीं क्षत्रिय समजलेल्यांपैकींच नेमकें कसें असणार? तेव्हां राजाला आपलें क्षत्रियत्व ब्राह्मणांकडूनच मान्य करून घ्यावें लागे, तेव्हां तो क्षत्रिय व लोकांच्या निष्ठेला पात्र अशी व्यक्ति होई. तथापि त्याविषयीं शंका घेणारे लोक त्यावेळेस असावयाचेच. विशेषेंकरून  जुन्या राजघराण्याचे अभिमानी असावयाचेच. तरी त्यामुळें सर्वच क्षत्रियांचें क्षत्रियत्व येणेंप्रमाणें संशयांतच होतें. ब्राह्मणांचें ब्राह्मण्य मात्र संशयित नव्हतें.

याशिवाय ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांमध्यें अंतर उत्पन्न करणा-या चळवळी झाल्या, त्या देखील ब्राह्मणांचें महत्व इतरांहून अधिक करण्यास कारण झाल्या. असल्या चळवळी म्हणजे बौद्ध व जैन हे संप्रदाय होत. येथील चातुर्वर्ण्य केवळ कर्मानुसारी नव्हतें तर तें संस्कारांकितहि होतें. असें असल्यामुळें जर कोणी बौद्ध-जैनादि मतांस चिकटून संस्कारांकडे दुर्लक्ष केलें तर तो सामान्य लोकांच्या दृष्टीनें संस्कारहीन व्रात्य अगर शूद्र होई. या सर्व गोष्टींचा पगडा अजूनपर्यंत कायम आहे.

याशिवाय ब्राह्मणांचें राजकीय महत्त्वहि होतेंच. बरेचसे मंत्री ब्राह्मणच असत.  व राजांचे शिक्षकहि ब्राह्मणच असत. एवढेंच नव्हे तर कित्येक ठिकाणीं ब्राह्मणांचीं राज्येंहि होतीं. आपण राजतरंगिणीमधील काश्मीरचा इतिहास जर पाहिला तर त्यांत अनेकदां ब्राह्मण राजे झालेले आढळतात. शुंगांचा पाडाव करून राज्य घेणारे काण्वायन ब्राह्मण होते. व सबक्तगीनच्या कारकीर्दींत काबूलवर घाला घालून तेथें हिंदू राज्य स्थापन करणारें शाही घराणें देखील ब्राह्मणच होतें. कुडाळचे सामंत देखील ब्राह्मण असावेत अशी मांडणी करण्यांत आली आहे (कुडाळदेशकर ब्राह्मण पहा- विभाग ११). यानंतरचें उदाहरण म्हणजे पेशव्यांचें होय.

मुसुलमानी अमदानींत देखील दक्षिणेमध्यें बरींच महत्त्वाचीं स्थानें ब्राह्मणांच्या हातीं होतीं व त्यामुळें त्यांस मोठमोठ्या जहागिरी मिळाल्या आहेत.

इंग्रजी अंमलामध्यें बंगाल व दक्षिण हिंदुस्थान या दोन भागांत सुशिक्षित वर्ग या नात्यानें ब्राह्मणांचें समाजप्रामुख्य राहिलें आहे.

ब्राह्मणांविरूद्ध चळवळी ज्या झाल्या त्यापैकीं कांहीं धार्मिक प्रामुख्यास आक्षेप घेणा-या व कांहीं राजकीय प्रामुख्यांत स्पर्धा करणा-या होत्या. चळवळींमध्यें बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव, ब्राह्मसमाज व सत्यशोधक समाज अशी परंपरा देतां येईल. पांचालांची चळवळ आपलें ब्राह्मणसदृश महत्त्व मागणारी चळवळ होती व तीमुळें ब्राह्मणमहत्त्वास पोषकच झाली.

सिलोनमध्यें गोइगणांची जात इतरांपेक्षां आपलें उच्चत्व जेव्हां सांगूं लागली तेव्हां ती आपणांमध्यें ब्राह्मणी रक्त आहे असें विधान करूंन तो हक्क सांगूं लागलीं.
 
ब्रह्मदेश व सयाम हे दोन्ही देश जरी बौद्ध होते तरी त्यांनीं आपल्या संस्कारांसाठीं अनेक ब्राह्मण नेले होते. ब्राह्मणब्राह्मणेतर विवाह हे केव्हां बंद झाले हें निश्चयानें सांगतां येत नाहीं तथापि त्यांचें अस्तित्व ब-याच उत्तर काळापर्यंत दिसून येतें. देशांतरी भटकणारा ब्राह्मण राजकन्येशीं विवाह लावतो अशी कथानकें आपल्या कथासरित्सागरांत बरींच आहेत. ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतर स्त्रियांशीं लग्न लावावें व मुलांनीं ब्राह्मणच म्हणवून घ्यावें अशी परिस्थिति बलिद्वीपांत अजूनहि आहे. विक्रमांकदेवचत्रिचा कर्ता बिल्हण राजकन्येचा शिक्षक म्हणून जातो व तिच्याशीं पुढें लग्न लावतो. प्रसिद्ध राजशेखर कवि आपली आई चौहान आहे म्हणून सांगतो. तथापि ब्राह्मणब्राह्मणेतर यांच्या विवाहास मुख्य अडचणी असत त्या ह्या कीं, बराच क्षत्रिय वर्ग संस्कारदृष्ट्या क्षत्रियत्वापासून च्युत झाल्यामुळें म्हणजे शुद्रत्वाप्रत गेल्यामुळें हे विवाह कमी झाले. मलवारमध्यें तंबिरान (राजघराण्यांतील) स्त्रियांचे ब्राह्मणांबरोबर संबंध उर्फ दुय्यम प्रकारचे विवाह अजून चालू आहेत.

ब्राह्मणांमध्यें पंचगौड (सारस्वत, कान्यकुब्ज, गौड, उत्कल व मिथिल) आणि पंचद्रविड (महाराष्ट्रीय, आंध्र किंवा तेलगु, द्राविडी, कानडी व गुजराथी) असे मुख्य दहा प्रादेशिक भेद आहेत.

पंचद्राविडांपैकीं महाराष्ट्रब्राह्मणांत (१) वित्पावन किंवा कोंकणस्थ, (२) देशस्थ, (३) क-हाडे, (४) देवरूखे, (५) काण्व, (६) मैत्रायणी, (७) सामवेदी, (८) गोवर्धन, (९ ) जवळ किंवा खोत,(१०) कास्त, (११) किरवन्त किंवा क्रमवंत, (१२) पळशे, (१३) सवाशे, (१४) तिरंगुळ किंवा त्रिगर्त, (१५) चरक (१६) माध्यंदिन , (१७) जाबाल उर्फ, नार्मद (१८) अभीर, (१९) सोपार , (२०) खिस्ती, (२१) हुसेनी, (२२) कलंकी वगैरे पोटजाती आहेत. गुजराथी ब्राह्मणांमध्यें  (१) अनावल, (२) औदीच्य, (३) बलं, (४) भार्गव, (५) भोजक, (६) बोरसाद, (७) खोवीस, (८) दधीच, (९) देसावल, (१०) गयावळ, (११) गिरनारा, (१२) गोंतीवाल, (१३) गोगली , (१४) हरसोला, (१५) जंबु, (१६) झालोरा,  (१७) कंडोला, (१८) कपील, (१९) खदायता, (२०)खेडावल, (२१) मेवाड, (२२) मोढ, (२३) मोताला, (२४) नागर, (२५) नंदवाना, (२६) नंदोरा, (२७) नापल, (२८) पालिवाल, (२९) परजिआ , (३०) पुष्करणा, (३१) रायकवाल, (३२) रायस्थल, (३३) रूंडवाल, (३४) साछोरा, (३५) साजोद्रा, (३६) सारस्वत, (३७) सेवक,  (३८)  श्रीगौड, (३९) श्रीमाळी, (४०) सोमपुरा, (४१) सोरठिआ, (४२) तपोधन, (४३) उदंबरा, (४४) उन्बाल, (४५) वदाद्रा, (४६) वायदा, (४७) वेदांत वगैरे पोटजाती  आहेत. आंध्र उर्फ तेलगू  ब्राह्मणांच्या पोटजाती-वर्णशालु, कमरूकुलु कर्णमक्कळु, माध्यंदिन, तैलंग, मुरकनाडु, आराध्य, याज्ञवल्क्य, कासरनाडु , वेलनाडु, वेंगिनाडु, वेदिनाडु, तैलंगसामवेदी, रामानुज, माघ्व, नियोगी. द्राविडांच्या पोटजाती-ॠग्वेदी, कृष्णयजुर्वेदी, शुक्लयजुर्वेदी, सामवेदी, द्राविडअथर्ववेदी. कर्नाटिकांच्या पोटजाती- कुमे, नागर, कोंकणी, हुबु, गौकर्ण, हविक्, तुलव, अम्मकोडग उर्फ कावेरी, नंबुद्री, पोट्टी, मुत्तडु, एलेडु, पट्टर इत्यादि.

पंचगौड ब्राह्मणांच्या पोटजाती- सारस्वत, (महाराष्ट्र ,पंजाब, सिंध, वगैरे )-श्रीकार, बारी, उर्फ बरोवी, रावणजाही शेतपाल, कुवचंद, पोखर्ण,  कुडाळदेशकर, इत्यादि . कान्यकुब्ज, उर्फ कनोजी (संयुक्तप्रांत)-मिश्र, शुक्ल, दुबे, पाठक, पांडे, उपाध्ये, चोबे, दीक्षित, वाजपेयी, सर्वरिया इत्यादि. गौड (बंगाल व बिहार)-राधाकुलीन, भंगकुलीन, वौशज, राधीयश्रोत्रीय, वरेंद्र, सत्पशती, वैदिक, अग्रधानी, मैरपोर, रपली, दैवज्ञ, मध्यदोषी, व्यासोक्त, पीरआली, इत्यादी. उत्कल (ओरिसा)-शाशनी, श्रोत्रीय, पंडे, घातीय, महास्थान, कलिंग, इत्यादि. मैथिल-(तिर्हुत, सारण, पुरणिया हे जिल्हे आणि नेपाळनजीकचा प्रदेश), ओझा, ठाकूर, मिश्र, पूर, श्रोत्रीय, भुइहर इत्यादि.

सर्व पोटजातींसह ब्राह्मणांची संख्या प्रांतवार पुढीलप्रमाणें १९११ सालीं होती. अजमीर-मेरवाडा २४२२०; आसाम १३१३१७;  बंगाल १२५३८४१; बिहारओरिसा  १७५५४२४; मुंबई १०६७६८१; ब्रह्मदेश २११७०; व-हाड व मध्यप्रांत ४४५७४४; मद्रास १३१०३६०; पंजाब १०१७७४३; संयुक्तप्रांत ४७०११७९; बडोदें संस्थान ११३४१२; मध्यहिंदुस्थान ९८६२०६;  कोचीन संस्थान ३५५३२; हैद्राबाद संस्थान २६१२४१; काश्मीर २४१३६२; म्हैसुर १९४५७६; राजपुताना ९५९७५२; सिकिम ५६७३; त्रावणकोर ५५६७४; वायव्यसरहद्दप्रांत १३२०८; आणि इतर ३३९३; एकूण १४५९८७०८.

ब्राह्मणांचे त्यांच्या वस्तीच्या निरनिराळ्या देशभागांप्रमाणें निरनिराळे रीतीरिवाज असतांत. विशिष्ट ब्राह्मण जातींची माहिती स्वतंत्र लेखांतून दिलेली आहे.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .