विभाग आठरावा : बडोदें ते मूर   

ब्रिडिसी- हें बंदर इटालीच्या दक्षिण किना-यावर आहे. याची लोकसंख्या १९०१ सालीं २५३१७ होती. कोळसा, मीठ, गंधक, इमारतीचें लांकूड आणि धातू परदेशाहून बंदरांत येतात  स्फोटक दारू, गाळलेली दारू, तेल आणि सुकीं फळें या बंदराहून परदेशांस जातात. सेन्ट जिऑव्हेनी या प्रार्थनामंदिरांत पदार्थसंग्रहालय आहे.