विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्लँक, मॉन्ट- यूरोप. पेनाइन आल्पसपैकीं याच नांवाच्या एका आल्पसचें हें अत्युच्च शिखर (१५७४२ फू.) आहे. तें फ्रेंच लोकांच्या ताब्यांत असून कॉकशियसमधील कांहीं शिखरें वगळलीं असतां यूरोपांत त्याच्याइतके उंच शिखर दुसरें कोणतेंच नाहीं. या शिखरावर जाण्याकरितां जरी ब-याच वाटा आहेत तरी कॅमोनिक्सची वाट बरीच रहदारीची आहे. बासेस डू ड्रोमडेर येथें एक वेधशाळा आहे व शिखराच्या अगदीं वरील टोंकाशीं आणखी एक वेधशाळा आहे.