विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्लोएमफाँटेन- ऑरेंज फ्रीस्टेटची राजधानी. पूर्वीं येथें ऑरेंज फ्रीस्टेटच्या राड (शासनमंडळ) च्या सभा होत. या इमारतीसमोर प्रेसिडेन्ट ब्रँडचा पुतळा आहे. डोग्लस सडकेवरील इमारतींत पदार्थसंग्रहालय आहे. फ्रीस्टेटच्या बोअर लोकांनां ज्या करारनाम्यानें स्वतंत्रता मिळाली तो करारनामा येथेंच झाला. वार्डन सडकेवर सार्वजनिक वाचनालय व त्याच्याच समोर राष्ट्रीय पदार्थसंग्रहालय आहे. हें प्रांताच्या व्यापाराचें ठिकाण असून येथील हवा आरोग्यकारक आहे. १९२१ सालीं येथील लोकसंख्या ३९०३४ असून पैकीं निम्मे लोक गोरे होते. बॅकुआना व बासुटो जातीचे लोक येथें राहतात.