विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भ- या वर्णाच्या मुख्य पांच अवस्था ज्या प्राचीन लेखांतून आढळतात. त्यांची नांवें:- (१)-अशोकाचा गिरनार येथील शिलालेख; (२) नाणेंघाटांतील लेख (ख्रिस्तपूर्व २ रें शतक); (३) ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या सुमारास मथुरा येथील जैन लेख; (४) समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद स्तंभावरील लेखः व (५) हैहयवंशी जाजल्लदेवाच्या वेळचा लेख (इ .स .१९१४).
भचीं दोन वळणें आहेत. पहिल्या वळणाच्या वरील पांचव्या अवस्थेंत डाव्या बाजूच्या वरच्या भागास गांठ आल्यानें दुसरें वळण बनलेलें आहे.