विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भज्जी- पंजाबांत सिमल्याच्या डोंगराळ संस्थानांपैकीं एक संस्थान. क्षेत्रफळ ९६ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) १४२६३. हें सतलज नदीच्या कांठीं आहे. भज्जीचा संस्थानिक रजपूत आहेत. उत्पन्न सुमारें पन्नास हजार रूपये. १४४० रूपये खंडणी द्यावी लागते. येथें चांगली अफू तयार होते.