विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भटोत्पल- काश्मीर देशांतील एक प्रसिद्ध ज्योतिषी. काल शके ८८७-८८. यानें बृहज्जातक, बृहत्संहिता,लघुजातक, खंडखाद्य, षट्पंचाशिका इत्यादि ग्रंथांवर टीका लिहिल्या आहेत. याचा प्रश्नज्ञान नांवाचा एक स्वतंत्र ग्रंथहि आहे. त्याशिवायहि भटोत्पलाचे ग्रंथ आहेत असें अल्बेरूणी लिहितो; तेःराहुन्नाकरण आणि करणपात असें दोन करण ग्रंथ आणि बृहन्मानस ग्रंथावरील टीका. श्रुधव नांवाचा उत्पलाचा आणखी एक शकुनग्रंथ अथवा प्रश्नग्रंथ असावा असें अलबेरूणीचें मत आहे. (दीक्षितकृत भा. ज्योतिःशास्त्र.)