विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भडगांव- मुंबई, पूर्व खानदेश. एका पेट्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६ हजारांवर. हा गांव गिरणा नदीच्या दुबेळक्यांतील बेटावर वसलेला आहे. या गावांस चार वेशी होत्या. मोगलांनीं खानदेश जिंकला त्यावेळीं येथील रामजीपंत नांवाच्या मनुष्यानें अशीरगडच्या वेढ्यांत पराक्रम दाखविल्यामुळें त्यास नशिराबाद, एरंडोल, जामनेर, बाहुळ, भडगांव या परगण्यांची सुभेदारी मिळाली. त्यानें हें गांव पुष्कळ भरभराटीस आणलें. त्याच्या मरणानंतर त्याची बायको लाडकुबाई हिनें कारभार पाहिला व एकदां ३०० लुटारू भिल्लांचा पराभव केला असें सांगतात.