विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भरत- (१) एक वैदिक राष्ट्र. याची सविस्तर माहिती 'बुद्धपूर्व जग' (प्रकरण ४ थें) यांत दिली आहे.
(२) ॠषभ देवाचा ज्येष्ठ पुत्र. याच्यामुळें अजनाभ वर्षाचें भरतवर्ष असें नांव पडलें. हाच पुढें जडभरत झाला. (३) इक्ष्वाकुकुलोत्पन्न दशरथ राजाला कैकयीपासून झालेला पुत्र. यानें रामाकरितां राज्य त्याग केला. बंधुप्रीतीचें उदहरण म्हणून भरताचें नांव घेण्यांत येतें. (४) दुष्यंत-शंकुतलेचा पुत्र. याच्यापासून कुरूवंश निघाला. कौरव, पांडव हे भरताचे वंशज असल्यानें त्यांनां भारत असें नांव होतें; विशेषतः पांडवांनां भारत म्हणत. तेव्हां त्यांच्यांतील युद्धाला भारतीय युद्ध हें नांव मिळालें.