विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भानिल, अ जी वि न- (फेनाझाईन)- हा एक सेंद्रिय पदार्थ असून यापासून बरेच रंग बनवितां येतात. भरअजीव-भनिताचें (बेरिअम अझो बेन्झोएट) ऊर्ध्वपातन केलें असतां वरील पदार्थ मिळतो. शिसप्राणिदावरून निलीनची बाफ जाऊं दिल्यासहि वरील पदार्थ तयार होतो. हा पदार्थ अल्कोहोलमध्यें थोडासा विद्रुत होतो. अजीविनांचा रंग पिवळा असून तीं बहुधा न बदलतां ऊर्ध्वपातन पावतात.
ह्यांच्या अणूंमध्यें जर आपण अम्रमूलक किंवा उत्प्राणिल-मूलकाचा शिरकावा केला तर रंगद्रव्यें तयार होतात एक-अम्र-द्रव्यें किंवा यु-होडाईन द्रव्यें हीं गांधिल-एक-अमिनें व आसन्न-अम्र-अजीव-पदार्थाबरोबर द्दढीकृत केलीं असतां तयार होतात. यु-होडाईन-रंग-द्रव्यें पिंगट तांबडीं असून तीं कमजोर-अनाम्लाप्रमाणें क्रिया देतात. हीं अम्रें जोरकस अम्लांबरोबर तप्त केलीं असतां अम्र-मूलकांच्या जागीं उत्प्राणिल-मूलकांचा शिरकाव होऊन यु-होड नांवाचीं नवीन रंगद्रव्यें तयार होतात.
समरूप द्वि-अम्र-भान-अजीविन (सिमेट्रिकल-डाय-अँमिनो-फेनॅझाईन)याच्यापासून बोलीन रक्त नांवाचें रक्त-रंग-द्रव्य तयार करतात. आसन्न-भानिलिन-द्वि-आमिनाचें प्राणिदीकरण केलें असतां वरील रंग तयार होतो. हा रंग महत्वाच्या असून त्याचा उपयोग लोंकर व रंगबंधकरानें माखलेल्या कापसांत रंग देण्याकडे करतात.
दा रि न, १ फेनाइल अँसेटीन)- हें एक औषधि द्रव्य असून पर-दारिल-अम्न-भानिल हें पालश-इथिल-गंधकित व अल्कोहलयुक्त सोडा यांच्यासह १५०० पर्यंत तापविलें असतां तयार होतें. या पदार्थांशीं संबद्ध असलेले इतर बरेच पदार्थ औषधोपयोगी आहेत. वरील द्रव्य फार काळजीपूर्वक तयार करावें लागतें, नाहीं तर त्याच्याशीं बरेच अशुद्ध पदार्थ मिश्रण पावून तें तसेंच घेतलें गेल्यास मूत्रपिंडावर त्याचा वाईट परिणाम होतो.
हें औषध शरीरांत गेल्यावर प्रथमतः मज्जारज्जूच्या ज्ञानतंतूस आराम पाडतें. नंतर काळजाजवळील स्नायूवर ह्यांची क्रिया होऊन ते शिथिल बनतात. व त्यामुळें हदयाच्या क्रियेवरहि त्याचा परिणाम होतो. शरीराचें उष्णमान वाढलें असल्यास ह्या औषधाचा परिणाम ऊष्णता उत्पन्न करणा-या केंद्रावर होऊन उष्णता कमी कमी होत जाते.
क्ष य लि न (फेनॉल थेलिन.)- भानल (फेनाल) व क्षयिलिक-अनुज्जिद (थलिक अनहायड्राइड) जोरकस गंधकाम्लासह तप्त केलें असतां भानिल-क्षायिलिन तयार होतें त्याचें रंगहीन पापद्यांत स्फटिकीभवन होऊन पाण्यांत तें फारच थोड्या प्रमाणांत विद्रुत होतें. ह्याचें द्रावण पातळ दाहक अनाम्लामध्यें रक्त रंग युक्त होतें व हा रंग अम्लाच्या योगानें नाहींसा करतां येतो, म्हणूनच भानिल- क्षयिलिनाचा अम्लानाम्लूसूचक म्हणून उपयोग करतात.