विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भिंद- ग्वाल्हेर संस्थानांतील ईशान्येकडील जिल्हा. क्षे. फ. १५५४ चौरस मैल. लोकसंख्या ४ लक्ष. या जिल्ह्याचे चार परगणे (मिंद, महगवान, लहार व भांदर) आहेत. जमीन सुपीक आहे. नद्या चंबळा, सिंद वगैरे आहेत. या जिल्ह्याचें मुख्य ठाणें भिंद हें होय. हें ग्वाल्हेर भिंद रेल्वेवर असून प्राचीन काळीं चव्हाण जातीच्या भादौरिया शाखेची राजधानी होती. तें १८ व्या शतकांत शिंद्याच्या हातीं आलें. येथें कापूस व पितळेचीं भांडीं यांचा व्यापार चालतो.