विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भिलवाडा- राजपुताना, उदेपूर संस्थानांत हें एका जिल्ह्याचें मुख्य गांव आहे. हें उदेपूर शहरापासून ८० मैलांवर आहे. या गांवाचा या संस्थानांत दुसरा नंबर लागतो. लोकसंख्या दहा हजार. येथें पुर्वीं नाणीं पाडण्याची टांकसाळ होती. येथें लालडी व माणिक हीं रत्नें सांपडतात.