विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भिवंडी, ता लु का- मुंबई इलाखा, ठाणें जिल्ह्यांतील मध्यवर्ती तालुका. क्षेत्रफळ २४९ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें पाऊण लाख आहे. या तालुक्यांतील जमीन फार सुपीक असल्यामुळें तेथें दाट वस्ती आहे. पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे.
गांव- या तालुक्याचें मुख्य गांव. लोकसंख्या सुमारें दहा हजार. गांवांत मुसुलमानांची वस्ती बरीच आहे. येथें १८६५ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. या गांवचें व्यापारी दृष्ट्या महत्त्व वाढत आहे. व्यापाराचे जिन्नस तांदूळ, खारवलेले मासे, कापड, गवत, लांकूड वगैरे होत.