विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमा- दक्षिणहिंदुस्थानांतील एक नदी. ही भीमाशंकराजवळ सह्याद्री पर्वतांत उगम पावून पुणें, सोलापूर विजापूर या जिल्ह्यांतून वहात जाऊन पुढें निजामच्या राज्यांत जाऊन रायचुरा पासून १६ मैलांवर कृष्णेस मिळते पहिले ४० मैल हिचा प्रवाह एका दरींतून जातो. रांजणगांवाजवळ हीस मुळामुठा या नद्या मिळतात व तेथेंच घोडनदी हिला मिळते. टेंभुर्णी जवळ हिला निरा मिळते. याखेरीज दुस-या हिला मिळणा-या नद्या माण व सिना (अहमदनगराजवळ) या होत. या नदीच्या कांठीं पंढरपूर हें क्षेत्र आहे. या नदीला भीमरथा, भीमरथी अशींहि नांवें आहेत.