विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमाशंकर- मुंबई इलाखा, पुणें जिल्हा, तालुका खेड. यांत भोवरगिरी नांवाचें खेडें आहे, तेथें या नांवाचा किल्ला व महादेवाचें देऊळ आहे. भीमाशंकर हें एक सह्यादी पर्वताचें ३४४८ फूट उंचीचें शिखर आहे. येथें भीमानदीचा उगम आहे. येथील देऊळ नाना फडणविसानीं बांधिलें आहे.