विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीष्माष्टमी- माघशुल्क अष्टमीला भीष्माष्टमी म्हणतात; या दिवशीं भीष्म दिवंगत झाले. या दिवशीं सर्वांनीं-जीवत्पितृकांनीं सुद्धां-त्यांच्या तृप्त्यर्थ तर्पण करावें असें पुराणांत सांगितलें आहे व त्याप्रमाणें करण्याचा प्रघातहि दृष्टीस पडतो. भीष्म ब्रम्हचारी असल्यानें त्यानां कोणी तर्पण देण्याला राहणार नाहीं म्हणून ही सार्वजनिक तर्पणाची चाल पडली असावी असें वाटतें.