विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भुइनमाळी- आसामांतील ह्या जातीची लोकसंख्या (१९११) ३५२३८ आहे. सिलहट्मधील ही जात स्थानिक व दाट वस्तीची असून ह्या जातीचे लोक हारिस लोकांचे नातेवाईक असावे. ह्या जातीचे बरेचसे लोक आतां शेतीचा, भोयांचा व तळीं विहिरी खोदण्याचा धंदा करतात.