विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भुइया- अथवा भुइन्यार. ह्या नांवाची एक रानटी जात आहे. यांची लोकसंख्या सुमारें ८॥ लाख आहे. बहुतेक या लोकांची वस्ती छोटा नागपूर व संताळ परगणे यांत आहे. भुइया हा शब्द संस्कृतांतून भूमि शब्दापासून झाला आहे. बंगल्यांतील कांहीं विवक्षित जातींस भुइया असें म्हणतात. कांहीं ठिकाणीं एकाच जातीस हें नांव देण्यांत आलें आहे. हे लोक छोटानागपूर व ओरिसाच्या संस्थांनातून आले असा कांहींचा तर्क आहे. सिंगभूम, रांची, मानभूम या भागांतून त्यांस हो, मुंडा, ओराओना वगैरे लोकांनीं हांकलून दिलें असावें. यांच्या दैवताचें नांव रिखमुन अथवा रिखिआसन आहे. भुमिया जातहि यांच्यांत मोडते.