प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर         
 
भूपृष्ठवर्णन, वा ता व र ण.- पृथ्वीवरील महासागर व जमीन यांनां सर्व बाजूंनीं हवेचें वेष्टण आहे. या वेष्टणास वातावरण अशी संज्ञा आहे. हवा जरी दिसत नाहीं तरी हवेंतील वायूंच्या विशिष्ट गुणामुळें, हवेच्या हालचालीनें व पृथ्वीच्या पृष्ठावर हवेचा दाब पडतो यामुळें तिचें अस्तित्व सहज लक्षांत येण्यासारखें आहे. वातावरण हें पृथ्वीचे दुसरे दोन भाग पाणी व जमीन यांपासून अलग नसून त्या दोन भागांस चिकटलेलेंच आहे व त्यामुळेंच तें पृथ्वीबरोबरच फिरतें. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती उंचीपर्यंत वातावरण पसरलें आहे हें खात्रीपूर्वक सांगतां येत नाहीं; तरी तें ५० मैल उंचीपर्यंत पसरलेलें असावें व त्या पलीकडे २०० पासून २५० मैलपर्यंत फारच विरळ स्थितींत तें असावें असें शास्त्रकारांचें म्हणणें आहे.

हवेतील वायूः- हवेमध्यें निरनिराळे वायू असतात, त्यांपेकीं नत्र (नायट्रोजन) आणि प्राण (ऑक्सिजन) हे मुख्य असून त्यांचें प्रमाण शेंकडा अनुक्रमें ७७ व २१ असें आहे. याशिवाय वाफ, कर्बालम्लवायु (कार्बानिक अँसिड गॅस) व अचेष्ट (अरगान) वगैरे वायू कमजास्त प्रमाणांत असतात. हवेचें पृथक्करण केल्यास निरनिराळ्या वायूंचें शेंकडा खालीं दिलेलें सर्वसाधारण प्रमाण आहे असें आढळून येतें: नत्र ७६.९५, प्राण २०.६८, वाफ १.४०, अचेष्ट, ०.९४, कर्बद्विप्राणिद ०.०४ आणि उज्ज, अम्न, ओझोन व नत्राम्ल हवेंत फारच थोड्या प्रमाणांत असतांत.

हवेचा दाब:- ज्याप्रमाणें धन किंवा पातळ पदार्थांवर गुरूत्वाकर्षणाचा परिणाम होऊन ते पृथ्वीकडे ओढले जातात त्याचप्रमाणें हवेच्या प्रत्येक परमाणूवर गुरूत्वाकर्षणाचा परिणाम होऊन ते पृथ्वीकडे आकर्षिले जातात व याचमुळें हवेला वजन प्राप्त झालेलें आहे. हवा आणि पाणी यांचें सारखेंच माप मोजून घेतल्यास हवा पाण्यापेक्षां सातशें त्र्याहात्तर पटीनें हलकी भरते. प्रत्येक घनफूट हवेचें वजन १.२९ औंस भरतें. हवा इतकी हलकी आहे तरी ती पुष्कळ मैल उंच पसरली असल्यामुळें  तिचें एकंदर दडपण भूपृष्ठावर बरेच पडतें. समुद्रपृष्ठाशेजारीं प्रत्येक चौरस इंचावर १४/३/४  पौंड हवेचें वजन पडतें. समुद्रपृष्ठापासून जसजसें उंच जावें तसतसें हवेचा थर कमी झाल्यामुळें हें वजननहि कमी होतें. हवेचें वजन अथवा दाब ज्या यंत्रानें मोजतात त्यास वायुभारमापक यंत्र म्हणतात. हवेचा दाब शेरांत किंवा पौंडांत मोजीत नाहींत; किती दाब आहे हें पाहणें झाल्यास वायुभारमापक यंत्रांतील कांचेच्या नळींत पारा किती इंच अथवा मिलिमीटर उंचीवर आहे हें पाहातात.

वायुभारमापकाची रचना:- एका कांचेच्या वाटींत पारा भरतात व एका बाजूनें बंद असलेली एक ३३ किंवा ३४ इंच लांबींची नळी पा-यानें भरून वरील वाटींत उलटी उभी करतात. वाटींतील पा-यावर एकीकडून हवेच्या थराचा व दुसरीकडून नळींतील पा-याचा दाब असतो. हवेचा दाब वाढल्यास वाटींतील पारा नळींत ढकलला जातो व हवेचा दाब कमी झाल्यास नळींतील काहीं पारा खालीं वाटींत उतरतो. त्याप्रमाणें हवेच्या दाबावर नळींतील पा-याची उंची मोजल्यास हवेचा दाब किती आहे हें सांगतां येतें. तयार केलेल्या यंत्रांत पा-याची वाटी व नळी हीं एका फळीवर भक्कम बसविलेलीं असतात आणि नळीशेजारीं इंचाची व मिलिमीटरची पट्टी बसवलेली असते. त्यामुळें उंची मोजण्यास त्रास पडत नाहीं. वायुभारमापक यंत्रें पुष्कळ प्रकारची असतात. परंतु बहुतेक सर्व वरील तत्त्वावरच बसविलेलीं असतात

प्रकाशः- पृथ्वीवर आपल्याला सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांच्याकडून प्रकाश मिळतो. त्यांतील सूर्याकडून मिळणारा प्रकाश मुख्य होय. हा प्रकाश आपल्याला पांढरा दिसतो. परंतु त्याचें पृथ्थक्करण केल्यास इंद्रधनुष्यांत दिसणा-या (अस्मानी, निळा, गर्दनिळा, हिरवा, पिंवळा, नारिंगी, आणि तांबडा अशा) सात रंगाचा मिळून तो झालेला असतो असें सिद्ध होतें. पृथ्वीवर हवा जर मुळीच नसती तर ज्या जागेवर प्रकाशाच्या लहरी पसरलेल्या असत्या तेवढ्याच जागेला उजेड मिळाला असता, परंतु हवेंतून येतांना प्रकाशाच्या लहरी हवेंतील सूक्ष्म कणांवर पडतात व त्यामुळें प्रकाश फांकला जाऊन कांहीं जागीं अंधार असावयाचा तेथें उजेड पोहोंचतो व सर्व वातावरणांत प्रकाश पडल्यामुळें आकाशांतील तारे दिवसां दिसेनासे होतात. त्याचप्रमाणें हवेंत जर मुळींच कोणत्याहि त-हेचे सूक्ष्म कण नसते तर आकाशाला कोणताच रंग आला नसता परंतु निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशाच्या लहरी हवेंतून येत असतांना निळ्या रंगाच्या लहरी (त्या आंखूड असल्यामुळें ) हवेत फार फांकल्या जाऊन आकाश निळे दिसतें. कित्येक वेळां हवेत मोठें कण असल्यास पिंवळ्या रंगाच्या लहरी सुद्धां फांकल्या जातात व आकाशाला पिंवळसर रंग येतो. कांहीं उंच असलेल्या ढगांत पाण्याचे जाड कण तयार होऊन त्यांवर पडणा-या सर्वच प्रकाशलहरींचें परावर्तन होतें. आणि ते ढग पांढरे शुभ्र दिसतात. सूर्यप्रकाशांतील निरनिराळ्या रंगांच्या लहरीमुळें आपल्याला आकाशांत पुष्कळ चमत्कार दृष्टीस पडतात त्यांपैकीं कांहीं पुढें दिले आहेत. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळीं इतर वेळेपेक्षां प्रकाशकिरणांनां आपल्यापर्यंत पोहोंचण्यास हवेच्या जाड थरांतून यावें लागतें व त्यामूळें फक्त नारिंगी व तांबड्या रंगाचे किरण आपल्यापर्यंत येतात. आणि बाकीचे परावर्तन पावतात आणि म्हणूनच सकाळीं व संध्याकाळीं सूर्याच्या बाजूला आकाश तांबडें दिसतें.

इंद्रधनुष्य:- आकाशांत ढग किंवा पाण्याचे पुष्कळ लहान लहान थेंब असतांना सूर्य ज्या बाजूला असतो त्याच्या उलट दिशेला निरनिराळ्या रंगांचा अर्धवर्तुलाकार पट्टा आकाशांत दिसतो, त्याला इंद्रधनुष्य असें म्हणतात. सूर्याचे पांढरे किरण पाण्याच्या थेंबांवर पडले म्हणजे ते आंत जातांना वक्रीभवन होऊन त्यांचे निरनिराळ्या सात रंगाचे किरण होतात व त्यांचे पाण्याच्या थेंबांच्या आंत पूर्ण परावर्तन होऊन बाहेर पडलेले किरण आपल्या डोळ्याकडे  येतात व त्यामुळें सूर्यप्रकाशांतील सात रंगांचा अर्धवर्तुलाकार पट्टा आपल्यला दिसतो (इंद्रधनुष्य पहा). एखादा पांढरा सूर्यकिरण आकाशांतील एका पाण्याच्या थेंबावर पडल्यास त्याचें पृथ्थक्करण होऊन सात रंग होतात. व ते सात रंगाचे किरण आपल्या डोळ्याकडे आल्यानें सातहि रंग आणि त्यांचा अर्धवर्तुळाकार झालेला पट्टा आपणांस दिसतो.   

संध्या:- सूर्योदयापूर्वीं आणि सूर्यास्तानंतर कांहीं वेळ पृथ्वीवर उजेड पडतो. त्यावेळेला संध्यासमय असें म्हणतात. क्षितीजाखालीं सूर्य असतांना त्याचे किरण हवेंत उंच ठिकाणीं असणा-या पाण्याच्या बारिक थेंबावर किंवा इतर कणांवर पडून परावर्तन पावतात. त्यामुळें हा उजेड पृथ्वीवर पडतो.

सूर्य आणि चंद्र क्षितिजाजवळ मोठे कां दिसतातः- सूर्य चंद्र क्षितिजाजवळ असतांना इतर वेळेपेक्षां मोठें दिसतात याचें कारण असें आहे कीं, आपल्यांत आणि सूर्य किंवा चंद्र यांमध्यें हवेचा थर यावेळीं जास्त असतो. त्यामुळें उजेड थोडा अंधुक होतो आणि सूर्य किंवा चंद्र असतात त्यापेक्षां दूर आहेत असें वाटून आपली भूल होते. म्हणून ते असतात त्यापेक्षां मोठे दिसतात कारण अंतराचा अंदाज काढूनच आपण कोणत्याहि वस्तूचा आकार ठरवितों.

सूय, चंद्र किंवा तारे क्षितिजाखालीं असतांना ते क्षितीजावर आहेत असें भासतात. हवा पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दाट असते आणि जसजसें वर जावे तसतशी ती पातळ होत जाते. याप्रमाणें पृथ्वीभोंवतीं हवेचे थर आहेत. त्यांमधून जातांना प्रकाशकिरणांचें वक्रीभवन होतें. व त्यामुळें क्षितिजाखालीं असलेले तारे वगैरे क्षितिजावर दिसतात.

मृगजळः- वालुका मैदानांत उन्हाचा प्रखर ताप पडला असतां दूर अंतरावर पाण्याचा तलाव किंवा सरोवर असावे असा भास होतो आणि या भासालाच मृगजळ असें म्हणतात. उष्ण प्रदेशांत उन्हाच्या प्रखर तापानें पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो व त्यामुळें त्या शेजारची हवा तापते व विरळ होते आणि वरची हवा दाटच राहते. दुरून येणा-या जिन्नसाच्या किरणांचें वक्रीभवन व परावर्तन होऊन आपल्या डोळ्याला त्या जिन्नसांची उलटी झालेली पडछाया दिसते व म्हणूनच त्या ठिकाणीं एखादा तलाव असावा असा भास होतो. एखाद्या ठिकाणाहून निघालेला किरण हवेच्या दाट थरांतून विरळ थरांत जातांना वक्रीभवन पावतो व त्याचें परावर्तन होऊन नंतर तो आपल्या डोळयाकडे येतो आणि डोळ्यासमोरची रेषा वाढविल्यास त्या रेषेवर मूळपदार्थ आहे असा भास होतो. याचप्रमाणें बाकीच्या किरणांचें वक्रीभवन आणि परावर्तन होऊन पदार्थाची पडछाया दिसते आणि म्हणूनच शेजारीं तलाव असावा असें वाटतें.

उष्णतामापक यंत्रः- हवेंतील उष्णता किती आहे हें समजण्याकरितां कांचेच्या नळ्यांचीं यंत्रें तयार केलेलीं असतात ('उष्णमानमापक यंत्र' पहा.)  

पृथ्वीच्या पाठीवरील ठिकाणांची उष्णता:-  पृथ्वीवर सूर्याची उष्णता ज्यामानानें मिळते त्यामानानें तिचे तीन भाग करतां येतात. ते असेः- उष्णकटिबंध, समशीतोष्णकटिबंध आणि शीतकटिबंध. पहिल्या भागांत सर्वांत जास्त उष्णता मिळते, तिस-या भागांत सर्वांत कमी उष्णता मिळते व दुस-या भागांत मिळणारी उष्णता दोहोंच्या दरम्यान असते. या प्रत्येक भागांत थंडीच्या दिवसांत उष्णता कमी असते व ती वाढत जाऊन उन्हाळ्यांत जास्तींत जास्त होते. व पुन्हां थंडीच्या दिवसापर्यंत कमी होत जाते. याचप्रमाणें रोज दुपारीं जास्त उष्णता व रात्रीं कमी उष्णता असा फरक होतो. याप्रमाणें नेहमीं उष्णतेचें मान नियमित रीतीनें कमीजास्त होणें हेंच साहजिक आहे. परंतु कांहीं कारणामुळें या नियमितपणाला बाध येतो तीं कारणें मुखतः-(१) वातावरणाची हालचाल, (२) महासागराचें सान्निध्य व (३) स्थलांची समुद्रसपाटी पासूनची उंची हीं होत.

वातावरणाच्या हालचालीचे परिणामः- कांहीं वारे विषुववृत्ताकडे वाहातात व तेथून हवा पृथ्वीच्या सपाटीपासून उंच वर जाते यामुळें विषुववृत्ताजवळील उष्णता कमी होऊन ती इतर भागांत वाटली जाते. उत्तर समशीतोष्ण कटिबंधांत वारे पूर्वेकडे वहात असल्यामुळें पश्चिम किना-यावर समुद्राकडून आलेली उष्ण हवा मिळते आणि पूर्व किना-यावर जमिनीवरून वाहत आलेली थंड हवा मिळते. या व इतर वाहणा-या वा-यांच्या योगानें उष्णमानांत फरक पडतो.

महासागराचें सानिध्य:- जमीन जितकी लवकर तापते किंवा होते तितक्या लवकर पाणी उष्ण किंवा थंड होत नाहीं. यामुळें महासागर, समुद्र अथवा सरोवरें यांचें पाणी उन्हाळ्यांत किंवा दिसतां जितकें तापावें तितकें तापत नाहीं आणि थंडीत किंवा रात्रीं जितकें थंड व्हावें तितकें होत नाहीं. याचा परिणाम समुद्रकांठीं किंवा सरोवराशेजारीं असणा-या प्रदेशावर होतो व तेथील उष्णता जितकी वाढावी तितकी वाढत नाहीं व जितकी थंड पडावी तितकी थंडीहि पडत नाहीं. याशिवाय महासागरांत उष्ण व थंड पाण्याचे प्रवाह असतात त्यांचाहि परिणाम समुद्रकांठावरील प्रदेशावर  होतो.

स्थलमानः- साधारणः डोंगराच्या माथ्यावर डोंगराच्या पायथ्यापेक्षां किंवा द-यांपेक्षां उष्णता कमी असते. तसेंच सूर्यप्रकाश डोंगराच्या ज्या बाजूवर पडत नाहीं तेथें ज्य बाजूवर प्रकाश पडतो त्यापेक्षां उष्णता कमी असते. अरण्याच्या सान्निध्याचाहि उष्णमानावर परिणाम होतो.

ॠतुमान व ॠतुमानाप्रमाणें उष्णतेंत होणारा फरकः- विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्णता कमी कमी होत जाते. विषुववृत्तापासून समांतर असलेल्या ठिकाणीं सारखीच उष्णता असावयास पाहिजे परंतु वर सांगितलेल्या कारणामुळें पृथ्वीवरील समोष्णरेषा अक्षांशाशीं समांतर नाहींत आणि नियमितहि नाहींत. ॠतुमानाप्रमाणें प्रत्येक स्थळांत निरनिराळा फरक पडल्यामुळें तर या समोष्ण रेषा फारच अनियमित होतात. कोणत्याहि स्थळीं वर्षांतील कमींत कमी उष्णता आणि जास्तींत जास्त उष्णता यांत जें अंतर असतें त्यास उष्णमानमर्यादा (टेंपरेचर रेंज) असें म्हणतात.

एखाद्या नकाशावर बारा महिने व उष्णतेचे अंश काढून त्यांवर निरनिराळ्या स्थळांच्या ॠतुमानाप्रमाणें होणारे फरक हे रेषा काढून दाखविल्यास हिवाळ्यांत थंडी कमी व उन्हाळ्यांत जास्त असते असें दिसून येईल. कांहीं ठिकाणीं उष्णतेंत ॠतुमानानें बराच फरक पडतो. परंतु कांहीं ठिकाणीं तो थोडा असतो. विषुववृत्ताजवळच्या किंवा महासागरावरील उष्णता दाखविणा-या रेषा फारशा वांकलेल्या नसतात परंतु त्याच समशीतोष्ण वृत्तांतील किंवा समुद्रापासून दूर असलेल्या ठिकाणच्या रेषा फार वांकलेल्या असतात. नकाशांतील रेषा नीट रीतीनें पाहिल्यास असें दिसेल कीं वर्षांतील सर्वांत मोठ्या दिवशीं जास्त उष्णता नसून त्यानंतर कांहीं दिवसांनीं ती वाढते. याचें कारण पृथ्वी तापून त्याचा परिणाम घडण्यास कांहीं काळ जावा लागतो, त्याचप्रमाणें डिसेंबर बावीस तारखेच सर्वांत लहान दिसत आहे तरी जास्त थंडी जानेवारींत किंवा फेब्रुवारींत असते. ॠतूंतील उष्णमान दाखविणा-या नकाशांत रोजचा फरक दाखविलेला नसतो. रोज पहाटे दोन वाजतां जास्त थंडी व दिवसां दोन वाजतां जास्त उष्णता असते.

समोष्णरेषा:- समोष्ण रेषांचे दैनिक, मासिक किंवा वार्षिक नकाशे काढितात. दैनिक नकाशांत कोणत्याहि स्थळांचें रोजच्या उष्णतेचें सरासरीचें मान दाखविलेलें असतें. त्याचप्रमाणें मासिक नकाशांत महिन्याचें व वार्षिक नकाशांत वर्षांतील सरासरीचें मान दाखविलेलें असतें. सारखी उष्णता असलेलीं स्थळें जोडणा-या रेषेस समोष्णरेषा असें म्हणतात. एखाद्या महिन्यांत न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, काश्मिर व पेकिनमधील उष्णता ५० डिग्री असल्यास त्या महिन्याच्या नकाशांत या ठिकाणांनां जोडणारी एक समोष्णरेषा दाखविली जाईल.

उष्णमान-मर्यादा (टेंपरेचर रेंज):- समोष्णरेषांच्या नकाशांत फक्त सरासरीची उष्णता कळते परंतु एकाच स्थळीं अति उष्णता आणि अति थंडी ह्यांत किती फरक आहे हें कळत नाहीं. कोणत्याहि जागेचें हवामान कळण्यास वरील फरक माहीत असणें अवश्य आहे. हे फरक दाखविणारीं कोष्टकें तयार करतात व त्यांनां उष्णमानमर्यादापट (टेंपरेचर रेंज टेक्स) असें म्हणतात. सेंटलुई व सॅनाफ्रान्सिस्कोमधील सरासरीचें उष्णमान ५५.७० डिग्री आहे. सेंटलुई येथील उष्णता ६० डिग्री व अति थंडी ५० डिग्री असल्यामुळें १० डिग्रीचेंच अंतर आहे. तेंच अंतर सॅनफ्रान्सिस्कोमध्यें ४७ डिग्री आहे. कारण तेथील अति उष्णता ७८ व अति थंडी ३१ असते आणि यामुळेंच या दोन्ही ठिकाणच्या हवेंत पुष्कळ फरक आहे. पृथ्वीवरील सर्वांत कमी उष्णता म्हणजे ९०० डिग्री ही सैबिरियांत एकदां नोंदली आहे व सार्वांत जास्त उष्ण ता १२७ डिग्री अल्जीरियांत नोंदलेली आहे.  

हवा अतिशय लवचिक असल्यामुळें  उष्णता कमी अधिक होताक्षणींच तिला गति मिळते ही गोष्ट विस्तव असलेल्या स्थलीं सहज दिसून येते. विस्तवामुळें, त्याच्याजवळचा हवेचा थर तापल्यामुळें तो प्रसरण पावून हलका होतो व त्यामुळें सहजच वर चढूं लागतो. अर्थातच त्याच्या जागीं थंड हवा येते व ती पुन्हां तापून वर जाते व पुन्हां थंड हवा येते अशा प्रकारें हवेचें परिभ्रमण सुरू होतें. ह्याच्या उलट खालील हवेचा थर थंडीमुळें थंड झाल्यास वरील उष्ण हवेचा थर खालीं येतो व तोहि थंड होतो. या साध्या उदाहरणाच्या ठिकाणीं आपण जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या थरांचें उदाहरण घेतलें तर ह्याच तत्त्वाप्रमाणें येथेंहि निरनिराळ्या हवेच्या हालचाली कशा सुरू होतात व चालू राहातात. हें आपल्या लक्षांत येईल.

विषुवृत्तावरील प्रदेशांत दिवसां सूर्याच्या उष्णतेनें हवेचे थर तापतात. त्यामुळें ते प्रसरण पावून विरळ व हलके होतात. ह्यामुळें ते वर चढूं लागतात व त्यांच्या जागीं शेजारच्या प्रदेशांतील थंड हवेचे थर येतात व अशा रीतीचें हवेचें परिभ्रमण सुरू होतें. ह्याचे चार भाग करतां येतातः- (१) जमिनीवरील आंत येणारे प्रवाह (२) वर जाणारा प्रवाह (३) उंच प्रदेशांतील बाहेर वाहणारा प्रवाह व (४) विषुवृत्तापासून अंतरावर खालीं स्थिर होणारे प्रवाह अशा त-हेचे वारे निरनिराळ्या खंडांत किंबहुना समुद्रकिना-यावर स्थानिक स्वरूपाचेंहि असूं शकतात. हवेचा थर तापला म्हणजे तो विरळ होतो व वरील थरांनां ढकलून वर चढतो. व त्यामुळें त्या ठिकाणच्या हवेचा दाब कमी होतो व तेथील हवेचा दाब मोजण्याच्या यंत्रात उतार होतो. जर हवेचा थर थंड झाला तर तो आकुंचन पावतो. व त्यामुळें जड होतो व हवेचा दाब मोजण्यांत चढ होतो. ह्यावरून हवेचा दाब व वारे ह्यांमध्यें किती निकट संबंध आहे हें लक्षांत येईल. आणि ज्या ठिकाणीं हवेचा दाबदर्शक यंत्र उतार दाखवितें त्या ठिकाणीं वारे वाहात जातात. वारे नेहमीं जास्त दाबाच्या ठिकाणाहून कमी दाबाच्या ठिकाणाकडे वाहतात.

वा-यांचें वर्गीकरणः- (१) ग्रहाचे अगर कायमवारे – (अ) व्यापारी वारे (आ) प्रतिव्यापारी वारे, (इ) विषुववृत्तावरील वारे, (ई) अक्षांशवारे, (उ) दर्यावरील वारे. (२) नियतकालिक ऋतुमानाचे वारे:- (अ) ऋतुमानाप्रमाणें, (आ) पावसाळी, (इ) मतलई, (ई) दैनिक, (उ) जमिनीवरील व समुद्रावरील, (ऊ) दर्यावरील वारे, (ॠ) डोंगर अगर द-यावरील वारे (ॠ) ग्रहणाचे वारे, (लृ) भरतीओहोटीचे वारे. (३)अनिश्चित, अगर अनियमित (अ) वादळाचे वारे (आ) रणांतील वारे (इ) धबधब्यामुळें उत्पन्न होणारे वारे.

(१)ग्रहांचे वारेः- पृथ्वी आपल्या आंसाभोंवतीं फिरत आहे व तिच्या निरनिराळ्या भागांवर सूर्यापासून अधिक प्रमाणंत उष्णता मिळते मुळें हवेंत गति उत्पन्न होऊन वारे वाहूं लागतात. व म्हणून त्यांनां ग्रहाचे वारे असें नाव दिलें आहे. तसेंच हे बहुतेक नेहमीं उत्पन्न होत असल्यामुळें  कायम स्वरूपाचे आहेत आणि पृथ्वीवरील वा-यांचे प्रवाह मुख्यतः त्याच्यावरच अवलंबून आहेत. ह्या प्रकारच्या वा-यांचे पुढील प्रकार आहेत.

व्यापारी वारेः- विषुवृत्तावरील भूपृष्ठावर (सूर्याचे किरण बहुतेक लंबरूपानें पडल्यामुळें) इतर भागापेक्षां सूर्याची उष्णता जास्त असते व त्यामुळें तेथील हवा तापून प्रसरण पावून वर जाऊं लागते. व शेजारील प्रदेशांतून थंड हवेचा प्रवाह आंत वाहूं लागतो. ह्यामुळें नेहमीं विषुवृत्ताकडे वारे वहात असतात. ह्या वां-याचा व्यापारी लोक प्रवासांत आपलीं जहाजें हांकण्याकरतां उपयोग करीत असत म्हणून ह्यांनां व्यापारीवारे असें म्हणतात.

हे वारे जरी विषुवृत्ताकडे वहात असले तरी पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळें हे थोडेसे वळतात. उत्तरेकडील वारे ईशान्येकडून आणि दक्षिणेकडील वारे आग्नेयीकडून  वाहातात असें दिसेल. हे वारे थंड प्रदेशांतून उष्ण प्रदेशांत वाहत जातात. म्हणून त्यांच्यांत पाण्याची वाफ जास्त राहूं शकते व अशी पाण्याची वाफ असलेले वारे उंच जमिनीच्या किना-यावर वाहू लागले तर तेथें पाऊस पडण्याचा संभव असतो.

प्रतिव्यापारी वारेः-विषुवृत्ताकडे भूपृष्ठावरून वारे वहात येतात तेव्हा हवा हलकी होऊन ती वातावरणांत त्या उंचीवर उलट दिशेकडे विषुवृत्तापासून दूर वाहूं लागते व ह्यासच प्रतिव्यापारी वारे म्हणतात हे बरेच उंच म्हणजे १०००० पासून १२००० फूट उंच असतात आणि म्हणून ह्यांचा जमिनीवरील भूपृष्ठावर कांहीं एक परिणाम होत नाहीं. उत्तरेकडील भागांत ईशानय दिशेकडे व दक्षिणेकडील प्रदेशांत आग्नेय दिशेकडे हे वाहात जातात.  ह्यांचें अस्तित्व ढगांच्या गतीवरून दिसून येतें.

शांत (विषुवृत्त) कटिबंधः-विषुवृत्तावरील उष्ण प्रदेशांत हवेचें परिभ्रमण सुरू असतें. परंतु तेथील हवेस आडवी गति नसते ह्यामुळें दक्षिण व उत्तर व्यापारी वा-यांच्या मधल्या प्रदेशांत बहुतेक वारा अगदीं पडलेला असतो. म्हणून ह्यास शीतकटिबंध असें नांव आहे. परंतु ही हवा तापत असल्यामुळें  तींत पाण्याच्या वाफेचें प्रमाण बरेंच असतें. ह्यामुळें ह्या प्रदेशांत दिवसा आकाश अभ्राच्छादित असतें व पाऊसहि जास्त पडतो.

(२) नियतकालिक किंवा ॠतुमानाचे वारेः- कांहीं ठराविक कालानंतर हवेत विशिष्ट त-हेचा फेरफार झाल्यामुळें कांहीं हवेचे प्रवाह उत्पन्न होताते आणि पुन्हां तेच ॠतू आले म्हणजे पुन्हां तशाच त-हेचा हवेंत फेरबदल होतो. ह्यांतील मुख्य फेरफार म्हणजे निरनिराळ्या ॠतूंत सूर्यापासून मिळणा-या उष्णतेंतील फेरफारामुळें व दिवस आणि रात्र ह्यांमुळें उत्पन्न झालेले असतात. ह्यामुळें ह्या वा-यांचें ॠतुमानाचे वारे व दिवस व रात्र ह्यांचे वारे असें वर्गीकरण करावें लागते. ह्यांतच ग्रहणापासून व भरतीओहोटीपासून उत्पन्न होणा-या वा-यांचा समावेश करण्यास हरकत नाहीं.

पावसाळी वारे (मान्सून):-  उत्तरायणांत मध्य कटिबंधात ज्या ठिकाणीं जमिनीचा भाग मोठा असतो त्या ठिकाणीं सूर्याचे किरण लंबरूपानें पडल्यामुळें तेथील जमीन व त्यामुळें हवा अतिशय तापते व वायुभारमापक यंत्रांत हवेचा दाब अगदीं कमी अंशावर असतो. व त्यामुळें शेजारच्या प्रदेशांतून म्हणजे समुद्रावरून जमिनीकडे वारे वहात येतात. त्याचप्रमाणें दक्षिणायनांत सूर्याचे किरण विषुववृत्ताच्या दक्षिणभागीं लंबरूपानें पडतात ह्यामुळें तेथील हवा तापून ती वर चढूं लागते व तिच्या जागीं उत्तरेकडील प्रदेशांतून वारे वाहतात.  ह्या दोन्ही त-हेच्या वा-यांस मोसमीवारे असें म्हणतात. हे वारे विशेषत: आशियाखंडाच्या दक्षिणेस मुख्यत्वेंकरून वाहातात. आशियाखंडांत हे पावसाळी वारे जून महिन्यापासून हिंदूस्थान व चीन देश ह्या देशांवरून वाहात असतात. हे हिंदी महासागरावरून अगदीं दक्षिणेकडून न येतां नैर्ॠत्य दिशेकडून येतात व हिवाळ्यांत ह्यांच्या उलट दिशेनें म्हणजे अशियाच्या मध्याभागांतून ईशान्य दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहात येतात. अशा त-हेचे वारे ऑस्ट्रेलियांतहि असतात. स्पेन देशांतहि मोठ्या प्रमाणावर हे वारे उत्पन्न होतात. सिलोन, हिंदुस्थान वगैरे देशांवरून वाहाणारे हे वारे हिंदी महासागरावरून येतांना त्यांतील पाण्याची वाफ ढगरूपानें घेऊन येतात व पावसात सुरवात करतात म्हणून ह्यास पावसाळी वारे म्हणण्यास हरकत नाहीं.

दैनिक वारेः- दिवसां सूर्याच्या उष्णतेनें जमिनीचा पृष्ठभाग पाण्यापेक्षां जास्त तापतो व त्यामुळें तेथील हवा विरळ व हलकी होऊन थर चढूं लागते व त्या जागीं समुद्रावरील थंड व जड हवा वाहात येते. ह्यासच दर्यावरील वारा किंवा खारा वारा असें म्हणतात. हा वारा सूर्य उगवून त्याच्या उष्णतेनें जमीन तापल्यावर दिवसां सुरू होतो व सूर्यापासून मिळालेली उष्णता बरीच कमी होईपर्यंत तो वाहात रहातो. रात्रीं समुद्रापेक्षां जमीन लवकर थंड होते. म्हणून जमिनीवरून वा-यांची झुळूक समुद्राकडे वाहू लागते. ह्यास मतलई अथवा जमीनीवरील वारा असें म्हणतात. हा मध्यरात्रींनंतर सुरू होऊन सकाळपर्यंत चालू राहतो. हे वारे अर्थांतच समुद्रकिना-यालगतच तेवढे असतांत. हे लांबवर आंतील प्रदेशांत पोहचत नाहींत. अशा त-हेचे वारे रोजच वाहतात. असें नाहीं तर उन्हाळ्यांत विशेषतः जास्ती वाहातात. मोठमोठ्या सरोवराशेजारींहि ह्या त-हेचे वारे वाहात असतात.

डोंगर व द-या ह्यांतील वारेः- अतिंशय डोंगराळ प्रदेशांत रात्रीं भूपृष्ठाजवळील हवा लवकर थंड होते व ती डोंगरावरून दरींत वाहूं लागते व ह्याच्या उलट दिवसा डोंगर अगोदर तापल्यामुळें तेथील हवा वर चढूं लागते व दरींतून वारा वर वाहूं लागतो.

ग्रहणाचे वारे व भरतीचे वारेः- हे फारसे महत्त्वाचे नाहींत. सूर्याच्या खग्रासग्रहणाच्या वेळेस वारा सुटतो त्याचें कारण सूर्याची उष्णता एकदम कमी होते हेंच असावें. त्याचप्रमाणें अतिशय भरती ज्या ठिकाणीं येते त्या ठिकाणीहि वारा सुटतो. पंरतु त्याचें कारण निश्चित सांगतां येणार नाहीं.

(३) अनियमित वारेः- याप्रकारच्या वा-यांचे मुख्य भेद आवर्त व प्रत्यावर्त हे होत.

आवर्त अथवा वादळें:– एखाद्या ठिकाणीं भोंवतालच्या प्रदेशापेक्षां हवेचा दाब कमी झाला म्हणजे तेथें भोंवतालच्या प्रदेशांतून हवा येऊं लागते. अशा रीतीनें चोहोंकडून वारे जोरानें येऊन वावटळ उत्पन्न होते, त्यास आवर्त किंवा वादळ म्हणतात. आवर्ताचे वारे विस्तीर्ण प्रदेशांतून भिन्न दिशांनीं येतात. म्हणून ते जेथें मिळतात तेथें वा-यांचा भोंवरा होऊन मोठें वादळ होतें. ह्या भोंव-याप्रमाणे फिरणा-या वावटळीची गति उत्तर गोलार्धांत घड्याळाच्या कांट्याच्या उलट व दक्षिण गोलार्धांत कांट्याप्रमाणेंच असते. हीं वादळें समुद्रावर उत्पन्न होत असल्यामुळें  त्यांत पाण्याची वाफ बरीच असते व हीं जेव्हां जमीनीवरून जातात तेव्हां तेथें पाऊस पडण्याचा संभव असतो. समुद्रकिना-यालगतच्या एखाद्या ठिकाणीं जवळ अशा त-हेचें वादळ येण्यापूर्वीं समुद्र शांत दिसतो. वारा पडलेला असून उष्मा फार होतो. वायुभारमापक यंत्रांत हवेचा दाब कमी दिसतो. लवकरच वारा जारानें वाहूं लागतो, आकाश अभ्राच्छादित होतें व नंतर पाऊस पडूं लागतो, वारा अधिक वादळी होतो व आपली दिशा बदलून वाहूं लागतो व व हवेचा दाब आणखी कमी होतो.  ह्या वादळाच्या मध्यावरील कांहीं भाग निरभ्र होतो. अशा वादळापासून पुष्कळ वेळां मोठमोठे अनर्थ होतात. कारण ह्या वादळांबरोबर वर समुद्रावर मोठमोठ्या लाटा उत्पन्न होतात व सखल किना-यावरील भागांत पाणी शिरून प्राणहानि होते. व तसेंच जहाजेंच्या जहाजें वादळांत सांपडून समुद्रतळीं जातात. हीं वादळें उष्णकटिबंधांतच उत्पन्न होतात. बंगालचा उपसागर, चिनी समुद्र व अटलांटिक महासागरांतहि अशा त-हेचीं वादळें होतात. ह्यांचें क्षेत्र कधीं कधीं एक हजार चौरस मैलहि असू शकतें. हें वादळ सुरवातीस लहान असून पुढें वाढत जातें. हीं वादळें एकाच ठिकाणीं रहात नसून वा-याबरोबर वाहात जातात. कधीं कधीं आवर्ताचें क्षेत्र फार लहान असतें. पण त्याचा जोर मात्र फार असतो. याच्या योगानें झाडें उपटून पडतात व इमारतीहि कोसळतात.

प्रत्यावर्तः- एखाद्या ठिकाणीं सभोंवारच्या प्रदेशापेक्षां हवेचा दाब जास्त झाला म्हणजे त्या ठिकाणाहून सर्व बाजूंस वारे वाहूं लागतात. व आवर्तच्या उलट स्थिती प्राप्त होते. ह्या त-हेच्या वादळास प्रत्यार्वत म्हणतात. ह्यांच्या योगानें ढग नाहींसे होतात व पाऊसहि जातो. त्यांतील वा-याचा वेग पुष्कळच कमी असतो. ह्या वा-यांची गति आवर्तांच्या वा-याच्या उलट दिशेस असते.

इतर दुय्यम वादळें:– मेघगर्जना (गडगडाट) पावसाळ्याच्या आरंभीं पाण्याच्या वाफेचे ढग असून ते वरचेवर वातावरणांत चढतात अशा वेळीं होतें. मेघांत विद्युत उत्पन्न होतें. अशा त-हेच्या वादळांत किंवा भूपृष्ठावर दोन निरनिराळ्या जातींची विद्युत् शेजारच्या ढगांत उत्पन्न झाली म्हणजे त्यांच्या संमेलनानें आवाज होऊन मेघगर्जना होतें. अशा वेळीं त्यांच्या संमेलनानें आवाज होऊन मेघगर्जना होते. अशा वेळीं भोंवरे किंवा वारे उत्पन्न न होतां फक्त वाफेच्या वर चढण्यानें जे मेघ तयार होतात त्यामुळें व हीं दोन्ही उत्पन्न होतात.

वाळंवटांती वावटळः– उन्हाळ्यांत एक ठिकाणची हवा तापून वर जाऊं लागली म्हणजे कधीं कधीं तिचा वेग व जोर इतका असतो कीं तिच्या बरोबर वाळवंटांतील वाळू वर ब-याच उंचीपर्यंत उडून जाते. अशा वावटळींत माणसें किंवा जनावरें सांपडून त्यांचा जीव गुदमरून प्राणहानि होते. त्याशिवाय पुष्कळ वेळां निरनिराळ्या त-हेचीं स्थानिक स्वरूपाचीं वावटळें उत्पन्न होतात व पुष्कळ त-हेचें नुकसान करतात. उदाहरणार्थ, ज्वालामुखीच्या स्फोटाच्या वेळीं, तसेंच बर्फाने कडे व प्रवाह व धबधब्याच्या जवळ असे स्थानिक वारे उत्पन्न होतात.

वायुवेगमापक यंत्र.- वारा किती वेगानें वहात आहे हें दाखविण्याचीं यंत्रें अनेक आहेत. त्यांपैकीं साधीं व चांगलीं डॉ. राबिन्सन या शोधकानें तयार केलीं आहेत. एका धातूच्या खांबावर दोन सळ्या काटकोनांत बसविलेल्या असतात  व ह्यांच्या प्रत्येक टोकाला चार पत्र्याच्या अर्धवर्तुळाकार वाट्या बसविलेल्या असतांत. वा-याचा दाब वाट्यांवर पडून हें चक्र हलू लागतें. वायूच्या वेगाप्रमाणें ह्याची गति कमी जास्त होत असते. ह्या सळ्यांची लांबी व वाट्यांचा आकार ठराविक ठेवावा लागतो. वाटीचा व्यास ९ इंच असतो व सळईची लांबीं २ फूट असते. वायूच्या वेगाचा तिसरा हिस्सा ह्यांची गति असते असें आढळून आलें आहे.

दहिंवरः- हवेमध्यें उष्णमानाप्रमाणें कमी अधिक पाण्याची वाफ असते व हवेंत राहूं शकणा-या सर्वांत जास्त वाफेचें प्रमाण ठराविक असतें. ह्या प्रमाणापेक्षां जास्त वाफ झाल्यास ती जलबिंदूच्या रूपानें खालीं पडूं लागते. एका घनफूट हवेंत उष्णमानाप्रमाणें पुढील प्रमाणांत पाण्याची वाफ मावूं शकते, ४०-३ ग्रेन, ५०-४ ग्रे.; ६०-६ ग्रे; ७०-८ग्रे.; ८०-११ग्रे. ह्यामुळें उष्ण हवा थंड होऊं लागली म्हणजे तीमधील अधिक वाफेचें रूपांतर होऊन जलबिंदू बनतात. रात्रीं जमीन थंड होत असतां जमिनीजवळची हवाहि थंड होत असते. थंड होणा-या हवेची वाफ धारण करण्याची शक्ति कमी होते म्हणून तिच्यांतील जास्त वाफेचे थेंब बनतात. व भूपृष्ठावर सांचतात; ह्यांसच आपण दव किंवा दहिंवर म्हणतों. ह्याशिवाय जमिनींतून किंवा झाडांच्या पानांतून जी पाण्याची वाफ बाहेर पडत असते तीहि घनीभूत होऊन तिचे थेंब बनतात. म्हणून सकाळीं गवतावर झाडांच्या पानावंर सर्वत्र दंब पडलेलें दिसतें.

हिमः- जेव्हां हवेचें उष्णमान ४ अंशापेक्षां खालीं जातें तेव्हां हे जलबिंदू भिजतात व ह्यांचें हिम बनतें. हिमालयपर्वतावर अशा त-हेचें बर्फ नेहमीं पडते व म्हणूनच त्यास हें नांव प्राप्त झालें आहे. थंड प्रदेशांत अशा त-हेचें हिम पडल्यामुळें पुष्कळ वेळां कांहीं झाडांची अगर पिकांची नुकसानी होते. दहिंवर किंवा हिम ज्या रात्रीं आकाश निरभ्र असेल तेव्हां जास्त पडतें; आभ्राच्छादित असतांना पडत नाहीं.

धुकें:- हवेंतील पाण्याची वाफ थंड झाली म्हणजे तिचे अतिशय सूक्ष्म कण बनतात; व ते इतके हलके असतात कीं जमिनीवर न पडतां धुराप्रमाणें हवेंत तरंगतांना दिसतात. ह्यासच आपण धुकें म्हणतों. हिवाळ्यांत आपण तोंडांतून उष्ण व ओलसर हवा बाहेर सोडली म्हणजे लागलीच त्यांतील वाफेचें घनीभवन होऊन धुकें बनतें. हीच क्रिया मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठावर चालू असते. समुद्रावरील हवेंत वाफेचें प्रमाण पुष्कळ असतें, अशा ठिकाणीं थंड वारे येऊं लागले म्हणजे धुकें उत्पन्न होतें. अटलांटिक महासागराचा कांहीं भाग ह्यामुळें विख्यात झाला आहे. मोठमोठ्या पर्वतांतील द-यांत धुकें फार बनतें. धुकें बनण्यास हवेंत धुळीचे वगैरे परमाणु असावे लागतात. म्हणजे त्यांच्याभोंवतीं घनीभवन लवकर होतें म्हणून मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांत धुकें जास्त असतें. ऊन पडूं लागलें म्हणजे धुकें नाहींसें व्हावयास लागतें, कारण उष्णतेमुळें त्याची वाफ होऊन हवेंत मिसळते. धुक्याचा आणखी एक प्रकार आहे, त्यांत पाण्याचे परमाणु जास्त मोठें असतात, मात्र पाऊस पडण्याइतके ते मोठे नसतात.

ढग अथवा मेघः- वाफेचे परमाणू पुष्कळसे हवेंत उंच ठिकाणीं जमलेले असले म्हणजे त्यास आपण ढग म्हणतों. हे परमाणु कधीं कधीं धुक्यांतील परमाणूंएवढे असतांत तर कधीं कधीं त्यांच्या मोठमोठ्या पाण्याच्या थेंबांचे ढग झालेले असतात. व कधीं तर बर्फाच्या कणाचेच हे ढग झालेले असतांत. जेव्हां पाण्याची वाफ असलेली हवा थंड होते. त्यावेळीं ढग बनतात. उदाहरणार्थ जेव्हां दमट हवेचे थर पर्वताच्या माथ्यावर आढळतात त्यावेळीं ते थंड होऊन त्याचे ढग बनतात. व ते पर्वतांच्या शिखरांसभोंवतीं फिरत रहातात वर धुकें सांगितलें तेंहि ढगाचाच एक प्रकार होय. मात्र धुकें जमिनीजवळ असतें. व एक प्रकार होय. मात्र धुकें जमिनीजवळ असतें. व ढग हवेंत उंच असतात ढगांच्या निरनिराळ्या चमत्कारिक आकृती असतात. व त्यांचे ३।४ निरनिराळे मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ, पिच्छमेध (बारीक पिसाप्रमाणें किंवा पिंजलेल्या कापसाप्रमाणें दिसणारे) हे ढग सर्वांत उंच असतात व ते हिममय म्हणजे बर्फाच्या सूक्ष्म कणांचे असतात त्यांची उंची ५ मैल तरी असते. कधीं कधीं ८।१० मैलहि उंच असतांत. पावसाळ्यांत काळ्या ढगांच्यावर जे कापसासारख विरळ ढग दिसतात तेच हे होत.

हवेंतील पाण्याची वाफ अगर ओलावा मोजण्याचें यंत्र: -ह्या यंत्राचे पुष्कळ प्रकार आहेत, पण सध्या ब-याच ठिकाणीं उपयोगांत असणा-या यंत्राचें वर्णन पुढें दिलें आहे. दोन उष्णमानमापक यंत्रें घेऊन शेजारीं शेजारीं एका लांकडाच्या फळीवर बसविलेलीं असतात. ह्यापैकीं एकाच्या फुग्यास मलमलीच्या कापडाचा तुकडा कच्च्या सुतानें बांधलेला असतो. व हा दोरा त्याच्याचखालीं बसविलेल्या एका लहानशा भांड्यांत पाणी ठेवून त्यांत सोडलेला असतो. ह्या सुतामधून पाणी वर चढतें व कापड ओलें राहतें. हवेंत ज्या मानानें वाफ कमीजास्त असेल त्या मानानें ह्या ओल्या कापडांतील पाण्याची वाफ जास्त अगर कमी होत असते. जसजशी पाण्याची वाफ होते तसतसें उष्णमान कमी होतें व तें ह्या उष्णमानमापक यंत्रांत दिसतें. दुसरें साधें उष्णमानमापक यंत्र जें शेजारींच असतें त्यावरून हवेचें खरें उष्णमान कळतें. ह्या दोन उष्णमानांत जितका जास्त फरक असतो तितकी हवेंत वाफ कमी आहे असें समजतें.

हवामानशास्त्रः- आतांपर्यंत हवा, तिची हालचाल व तिचे गुणधर्म यांविषयीं माहिती सांगितली. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांवर किंवा कांहीं स्थळी वर्षांत ॠतुमानानें सर्वसाधारण हवेचे परिणाम काय होतात हें काढण्याच्या शास्त्रास हवामानशास्त्र म्हणतात. निरनिराळ्या स्थळांचें हवामान कसें आहे हें समजण्यास त्या स्थळांच्या हवेंत उष्णतेचें व वाफेचें प्रमाण दिवस व ॠतुमानानें कसें बदलतें हवेचा दाब किती असतो, पाऊस केव्हां व किती पडतो, त्याचप्रमाणें वारे कोणत्या वेळीं कसे वाहतात या गोष्टीची माहिती मिळवावी लागते. ज्या स्थळांचें हवामान सारखें असतें अशांचा एक भाग याप्रमाणें पृथ्वीच्या पाठीवरील सर्व प्रदेशांचे वेगळाले भाग पाडतां येतात. पावसाचा सारखेपणा, समुद्राचें सन्निध्य किंवा पर्वतांचें सन्निध्य यांपैकीं कोणत्याहि विशिष्ट गोष्टीवरून प्रदेशांची विभागणी करतां येते. परंतु पृथ्वीच्या प्रत्येक कटिबंधांत हवेचें पुष्कळ साम्य असल्यामुळें  कटिबंध हेच मुख्य भाग ठेवून त्यांचे पुढें पोटभाग करण्याची नेहमींची पद्धत आहे. हे कटिबंध तीन असून त्यांचीं नांवें उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, व शींतकटिबंध अशीं आहेत.

उष्णकटिबंधः- या कटिबंधात विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंचा २३ १/२ अथवा ३० अक्षांशापर्यंतच्या प्रदेशांचा समावेश होतो. म्हणजे पृथ्वीच्या निम्यापेक्षां जास्त पृष्ठभाग याच कटिबंधात येतो. उष्णकटिबंधांतील हवेंत एका एकीं विशेष फेरबदल बहुतकरून होत नाहीं. ॠतुमानाप्रमाणें व दिवसांतील निरनिराळ्या वेळीं होणारे फेरफार नियमित रीतीनेंच होतात. दिवस आणि रात्री सारख्याच तासांच्या असतात. अति उष्ण प्रदेश विषुववृत्ताजवळ नसून त्याच्या उत्तरेस १० अक्षांशावर आहे, कारण विषुववृत्ताजवळील प्रदेशांत नेहमीं जोराचे पाऊस पडतात. म्हणून तेथें फार उष्णता वाढत नाहीं. परंतु दहा अक्षांश उत्तरेकडे गेल्यास सूर्याची प्रखरता विषुववृत्तावर असते तितकीच असून पाऊस फार नसतो. त्यामुळें येथें सर्वांत जास्त उष्णता असते. उष्णकटिबंधांत ५९ अशांच्या खालीं उष्णता बहुतेक जात नाहीं व जास्त उष्णता १२० किंवा १२२ अंशापर्यंत सुद्धां जाते. वायूचा भार देखील प्रत्येक ठिकाणीं नियमित ठिकाणीं कमी जास्त होतो. त्यामध्यें मोठाले हलकावे क्वचितच आढळतात. उष्णकटिबंधात हवेच्या मानानें चार भाग करतातः-(१) विषुववृत्ताचा प्रदेश (२) व्यापारी वा-यांचे पट्टे (३) पावसाळी पट्टे (४) डोंगरी प्रदेश

विषुवृत्ताचा प्रदेश:- हा म्हणजे पृथ्वीच्या कक्षेपासून दहा अक्षांश उत्तरेस व दहा अक्षांश दक्षिणेस असलेल्या भागाचा पट्टा होय. या भागांत हवेंतील उष्णता वर्षांतून दोनदां जास्त व दोनदां कमी होते, त्याचप्रमाणें सूर्य उत्तरायणांत मध्यावर येतो तेव्हां आणि दक्षिणयनांत मध्यावर येतो तेव्हां असे २ पावसाळे असतात. त्यांना विषुवृत्ताचे पावसाळे म्हणतात. दोन पावसाळ्यांमध्यें दोन कोरडे ॠतू येतात. परंतु पावसाळेच इतके लांबतात  कीं, कोरडे दिवस फाच थोडे असतात. अगदीं उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या भागांत दोन पावसाळे फारच थोड्या दिवसांच्या अंतरानें येत असल्यानें एकच पावसाळा व एकच कोरडा ॠतू असतो. याप्रमाणें दोन पावसाळ्यांचा जो एकच पावसाळा होतो त्याला उष्णकटिबंधाचा पावसाळा म्हणतात. हा पावसाळा चार महिने असतो.

व्यापारी वा-यांचे पट्टेः- या भागांत समुद्रसपाटीजवळ असलेल्या प्रदेशांत वारे शांत असतात.  पाऊस झिमझिम येतो किंवा मुळींच नसतो आणि उष्णतेंत फारच थोडा बदल होता. याच भागांतील जे वालुकामय प्रदेश आहेत त्यांत उष्णतेचें प्रमाण फारच झपाट्यानें बदलतें. दुपारीं जर ११०० किंवा ११५० अंश उष्णता असली तर त्याच रात्रीं ती ३२० अंशापर्यंत उतरते. या पट्टयांतील वा-याच्या बाजूच्या डोंगराळ प्रदेशांत पाऊस पडतो. अशा पावसाला व्यापारी वा-याचा पाऊस असें म्हणतात. व तो हिंवाळ्यांत पडतो.

पावसाळी पट्टेः- यांमध्यें हिंदुस्थान आशियाखंडाचा पूर्वभाग व त्याच्या आसपास असणारीं बेटें येतात. या प्रदेशांत उन्हाळ्यानंतर चार महिने पावसाळा असतो. व उन्हाळा पावसाळा व हिंवाळा असे मिळून वर्षाचे तीन भाग होतात. उन्हाळ्यांत समुद्रावरून वाहणारे वारे वाफेनें भरलेले असतात व ते जमिनीवर आल्यावर त्यांची गति कमी झाल्यामुळें त्यांतील वाफ पावसाच्या रूपानें खालीं पडते व डोंगराळ प्रदेश वाटेंत असल्यास त्या ठिकाणीं फारच पाऊस पडतो. या पावसास मन्सून पाऊस म्हणतात. हा एकदम एका दिवसांत सुरू होतो.

डोंगराळ प्रदेश:- उष्णकटिबंधातील डोंगराळ भागांत इतर भागांपेक्षां उष्णता कमी असते. एकंदरीनें उष्णकटिबंधांतील निरनिराळ्या त-हेचे पावसाळे ही त्यांतील विशिष्ट गोष्ट आहे. या कटिबंधांत आकाश नेहमीं निरभ्र नसतें व विषुववृत्तावर तें नेहमींच ढगांनीं भरलेलें असतें. ढगांचा गडगडाट पुष्कळ चालतो. आणि पावसाळ्यांच्या सुरवातीस व शेवटीं विजाहि पडतात. ऊन पडत असलें म्हणजे प्रकाशानें डोळे दिपतात व कित्येक वेळां त्यापासून बराच त्रास होतो.

समशीतोष्ण कटिबंधः- पृथ्वीचा जवळ जवळ अर्धा पृष्ठभाग या कटिबंधांत येतो. दक्षिण भूगोलार्धांतील समशीतोष्ण कटिबंध आणि उत्तर भूगोलार्धांतील समशीतोष्ण कटिबंध यांच्यामध्यें पुष्कळ फरक आहे. दक्षिण गोलार्धांतील भाग बहुतेक महासागरांनींच व्यापिला असल्यामुळें तेथील हवा सर्व भागांवर बहुतेक सारखी व समशीतोष्ण आहे. परंतु उत्तर गोलार्धांत हवेमध्यें वरच्यावर फार बदल होतात, आणि निरनिराळ्या देशांत सारखीच हवा नसते, अति थंडीचीं व अति उष्णतेचीं ठिकाणें याच कटिबंधांत आढळतात. या भागांत बहुतेक पश्चिम वारेच असतात. व ते हिंवाळ्यांत फार जोरानें वहातात. पाऊस सर्वसाधारण बरा म्हणजे तीस ते ऐंशी इंच पडतो व आकाश पुष्कळ वेळां ढगांनीं आच्छादिलेलें असतें. या भागांत चार ॠतू असतात. उष्णतेच्या हवेच्या मानानें उत्तर गोलार्धांतील समशीतोष्ण कटिबंधाचे (१) उष्ण कटिबंधाला लागून असलेला पट्टा (२) किना-यांचा भाग, (३) समुद्रापासून दूर असलेला प्रदेश व (४) डोंगराळ प्रदेश असे ४ भाग करतात.

शीतकटिबंधः- उत्तर व दक्षिण ध्रुवाशेजारच्या प्रदेशाचा या कटिबंधांत समावेश होतो. हा प्रदेश पृथ्वीच्या सर्व भागाचा आठ शतांश होईल येवढाच याचा विस्तार आहे. वर्षांतून एक वेळ तरी २४ तासांचा दिवस आणि २४ तासांची रात्र या प्रदेशांत असते. आतांपर्यंत शीतकटिबंधांतील हवेसंबंधीं फारशी माहिती नसे परंतु आतां तिच्याविषयीं बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. या ठिकाणीं उष्णता फारच कमी असते. उन्हाळ्यांतील उष्णता बर्फ वितळण्याइतकी देखील नसते. उन्हाळ्यांत जेथें जेथें बर्फ वितळतें तेथें शेवाळवर्गांतील वनस्पती उगवलेल्या आढळतात. दक्षिण शीतकटिबंधांत ३२ अंशाच्यावर उष्णता जातच नाहीं. उत्तर कटिबंधांत जास्तींत जास्त उष्णता ३५ ते ५० अंश होते व कमी म्हणजे- ५० पर्यंत जाते. केप आर्मिटेज मध्यें १६ मे १९०३ रोजीं दुपारीं ६७.७ अंश उष्णता असल्याचें नोंदलेलें आहे. विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत पाऊस कमी कमी होत जातो. ध्रुवाजवळच्या प्रदेशांत पाण्याची वाफ फारशी होत नाहीं. आणि उन्हाळ्यांत जो कांहीं पाऊस पडतो तो बर्फाच्या रूपानेंच पडतो. पश्चिमेकडील वारे वहातात. परंतु हवा बहुतेक शांत असते. दिवस व रात्री फार मोठाल्या असतांत. रात्रीचा अंधेर संध्याकाळ फार लांबल्यामुळें तसेंच चंद्र, व तारे व आरोरा यांच्या उजेडानें पुष्कळ कमी होतो.

हिंदुस्थानांत जितके निरनिराळ्या हवामानाचे भाग आहेत. तितके दुस-या कोणत्याहि देशांत सांपडणें कठिण आहे. हिंदुस्थानांत ४००-४५० इंच पाऊस पडणारीं ठिकाणें आहेत. त्याचप्रमाणें वर्षांत २-३ इंचच पाऊस पडणारींहि ठिकाणें कांहीं आहेत १८६१ सालीं आसाममधील चिरापुंजी येथें ९०० इंच पाऊस पडला अशी नोंद आहे, तर सिंधच्या कांहीं भागांत पाऊस मुळींच पडला नाहीं. अशी एक नोंद आहे. वर्षांतील कांहीं महिने असा पाऊस पडतो कीं, संबंध देश धुपून चालला आहे असें वाटतें, तर आकाश निरभ्र व हवा स्वच्छ आहे असें कित्येक महिने जातात. यांचें कारण हिंदुस्थानांत उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध यांतील हवेचें मिश्रण झालेलें आहे. त्याचप्रमाणें येथें मन्सून आहेत. वर्षांतील कांहीं महिने जमिनीवरचे कोरडे वारे वहातात तर बाकीच्या महिन्यांत समुद्राकडून येणारे वाफेनें भरलेले वारे येतात.

हिंदुस्थान हें एक अक्षांशापासून ३५ अक्षांशांपर्यंत पसरलेलें एक मोठें द्वीपकल्प आहे. याच्या पश्चिम किना-यावर डोंगर असून जमिनीची उंची पूर्वेकडे समुद्रापर्यंत कमी होत जाते. याच्या उत्तरेस मध्य हिंदुस्थानचें पठार आहे. नंतर सपाट प्रदेश असून एकदम हिमालयपर्वताची ओळ लागते. हिंदुस्थानच्या वायव्येस व ईशान्येलाहि पर्वताच्या रांगा आहेत. म्हणजे तीन बाजूंनीं समुद्राचें वेष्टण व चवथ्या बाजूस उंच डोंगर आहेत या परिस्थितीमुळें हवेंतील खालच्या थरांच्या हालचालीच्या बाबतींत हिंदुस्थान देशाचा मध्यअशियाशीं कांहीं संबंध रहात नाहीं. दक्षिणेकडून निघालेले वारे मध्यहिंदुस्थांनांत येऊन थबकतात. व मध्यहिंदुस्थानांतून जमिनीवरच वारे निघून दक्षिणेकडे समुद्रावर पसरतात.

मन्सूनः- हिंदुस्थानांत जे दोन मोसम किंवा मन्सून आहेत. त्यांपैकीं ईशान्य मोसमाला कोरडा म्हणतां येईल व नैर्ॠत्य मोसमाला ओला मोसम म्हणतां येईल. कोरड्या मोसमचे दोन भाग केल्यास पहिल्या भागांत विशेष थंडीचे महिने जानेवारी व फेबु्रवारी हे येतात व दुस-या भागांत उन्हाळ्याचे मार्च, एप्रिल मे व जूनचा कांहीं भाग इतके दिवस येतात. ओल्या मोसमचेहि दोन भाग करतां येतात. पहिल्यांत जून व जुलै, आगष्ट व सप्टेंबर हे महिने येतात आणि यालाच खरा मोसम म्हणतां येईल . कारण या महिन्यांत हिंदुस्थानच्या बहुतेक भागांत बराच पाऊस पडतो. आक्टोबरपासून पावसाचें क्षेत्र कमी कमी होत जाऊन तो दक्षिणेच्या बाजूस सरकतो व डिसेंबरमध्यें तो हिंदुस्थानच्या हद्दीच्या बाहेर विषुवृत्ताकडे ओढला जातो. थंडीच्या दिवसांस पंजाबांत आक्टोबरमध्यें सुरवात होतें व ती पूर्वेकडे व दक्षिणेकडे पसरत जाऊन, डिसेंबर अखेरपर्यंत सर्व हिंदुस्थानभर पडते. जानेवारींत वारे पश्चिमेकडून सुरू होऊन बंगालकडे जातात. व बंगालच्या आखाताकडून परत फिरून पूर्वकडे अरबी समुद्राकडे जातात.

पश्चिम घाटामुळें समुद्रकांठच्या जिल्ह्यांनां यांचा संसर्ग होत नाहीं. मध्यभाग, व-हाड व खानदेश हे भाग उलट दिशेनें वाहाणा-या वा-यांच्यामध्यें सांपडल्यामुळें तेथील हवेंत वरच्यावर फरक होतात.

सर्व हिंदुस्थानभर हवा स्वच्छ असून आकाश निरभ्र असतें. परंतु याच वेळेस उत्तर हिंदूस्थानमध्यें हवेच्या वरच्या थरांत दक्षिणेकडील हवा येऊन मिसळते व त्यामुळें कांहीं वादळें होतात. याचा परिणाम असा होतो कीं उत्तर व मध्यहिंदुस्थान राजपुताना मध्यप्रांत व तसेंच कारोमांडल किना-याचे कांहीं भाग यांवर मधून मधून पाऊस पडतो. कोरड्या मोसमच्या दुस-या भागास मार्चपासून सुरवात होते. तेव्हांपासून उष्णता वाढत जाते व हवेचा दाब कमी होत जातो. हवेचा दाब कमी झाल्यामुळें समुद्राकडून आंत येणा-या वा-यांनां सुरवात होते, व कांहीं ठिकाणीं स्थानिक वारे सुटतात. या दिवसांत फारशीं वादळें होत नाहींत. परंतु कांहीं धुळीचीं वादळें(डस्ट-स्टार्म) होतात. बंगाल व आसाममध्यें कांहीं वादळें होऊन पाऊसहि पडतो. मुंबई इलाखा, मध्यप्रांत वगैरेंमध्यें क्वचित गारा पडतात परंतु बहुतेक हवा कोरडी असते.

ओला किंवा नैॠत्य मोसमचा पहिला भाग अथवा पावसाळा यांतील हवामान दक्षिणेकडील समुद्रावरील हवामानावर अवलंबून असतें. पावसाळा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो व यावर हिंदुस्थानच्या पांचषष्ठांश भागाची  सुस्थिति अवलंबून असल्यामुळें हा फार महत्त्वाचा ॠतू आहे. दक्षिणेकडून येणारे वारे समुद्रावरून आल्यामुळें त्यांतील हवा वाफेनें भरलेली असते. व ते जमिनीवरून वाहुं लागलें कीं पाऊस पडूं लागतो. मेमध्यें हिंदुस्थानांत उष्णता पुष्कळ असून हवेचा दाब कमी झालेला असतो. त्यामुळें हे पावसाळी वारे हिंदुस्थानाकडे वाहिले जातात. हलक्या हवेबरोबर वर वर चढतात. ही स्थिती आगष्ट-संपेपर्यंत चालू राहते. दक्षिणेकडील पावसाळी वारे हिंदुस्थानपर्यंत आल्यावर त्यांचे प्रथमतः भाग दोन होतात. एक भाग अरबी समुद्राकडे  जातो व दुसरा बंगालच्या उपसागराकडे जातो. अरबी समुद्राकडील वारे प्रथमतः मुंबई इलाख्यांतील पश्चिम घाटाकडे येऊन वर चढूं लागतात. त्यामुळें ते थंड होऊन बरेचसें पाणी तेथेंच पडतें. नंतर हे वारे तसेच पूर्वेकडे बंगालच्या उपसागरांत जातात व जातांना दक्षिण हिंदुस्थानांत पाऊस पाडीत जातात. अरबी समुद्राकडील वारे उत्तरेकडेहि जातात. त्यावेळीं काठेवाड, कच्छ व राजपुतान्यांत थोडा पाऊस पडतो. व अरवली डोंगरावर बराच पडतो. हे वारे तसेच उत्तरेकडे हिमालयापर्यंत जातात. बंगालच्या उपसागराकडे गेलेल्या वा-यांचा बराच भाग आसाम व ब्रह्मदेशाकडे जातो. राहिलेला भाग बंगालकडे जाऊन गंगासिंधुथडीच्या मैदाना(इंडो –गँजेटिक प्लेन) वर जातो. याला वाटेंत डोंगर न लागल्यामुळें त्यांतील पाऊस सर्व ठिकाणीं सारखा वाटला जातो. मेपासून आक्टोबर अखेरपर्यंत हिंदुस्थानांत सरासरीनें पुढीलप्रमाणें इंच पाऊस पडतो. मे २.६० जून ७.१० जुलै ११.२५ आगष्ट ९.५२ सप्टेंबर ६.७८ आक्टोबर ३.१५ एकंदर ४९.४०.

कोरडा मोसम सप्टेंबर महिन्याच्या शेवटीं सुरू होतो. यावेळीं पावसाचें क्षेत्र कमी होऊं लागतें व दक्षिणेच्या बाजूस जाऊं लागतें. दिवसां उष्णता जास्त होते व रात्रीं थंडीहि जास्त पडते. बंगालच्या उपसागराकडील वारे पश्चिमेकडे वळतात. आणि त्यामुळें मद्रास व मुंबई इलाख्यांतील दक्षिणेकडील कांहीं भागांवर पाऊस पडतो. निरनिराळ्या ॠतूंत सरासरीनें पुढीलप्रमाणें इंच पाऊस हिंदुस्थानांत पडतो. हिंवाळा (जानेवारी व फेबुवारी) ०.९९ उन्हाळा (मार्च ते मे) ४.५८ पावसाळा (जून ते सप्टेंबर) ३४.६५ पावसाळ्यानंतर (आक्टोबर ते डिंसेबर) ४.९५ व एकंदर ४५.१७.

प्रांतवारी दरसालीं सरासरीनें पाऊस पूढें दिल्याप्रमाणें इंच पडतो. बलुचिस्तान ८.६६ वायव्यसरहद्द (नार्थवेस्ट) १०.२४  गंगासिंधुथडी (इंडो –गँजेटिकप्लेन) ३०.८९ गुजराथ २७.६४ दक्षिण (डेक्कन) २९.६८ पूर्व किनारा (दक्षिण) ५१.५९.

उष्णता मोजण्याकरितां उष्णमानमापक यंत्रें भिंती नसलेल्या छपराखालीं ठेविलेलीं असतात. या छपराखालून हवा मोकळी वाहते परंतु यंत्रावर ऊन पडत नाहीं. यंत्रें जमिनीपासून चार फूट उंचीवर ठेवण्याचा प्रघात आहे. जास्तींत जास्त उष्णता उत्तर हिंदुस्थानांत मे महिन्यांत असते. सिंधच्या उत्तर भागांत सर्वांत जास्त उष्णता असते. जाकोबाबाद गांवीं शेजारीं कालवे व झाडी आहे तरी ११७ ते १२६ अंश उष्णता उन्हाळ्यांत बहुतकरून असते. व त्याच्या आसपासच्या गांवीं ती १३० पर्यंत जात असावी असा अंदाज आहे. जाकोबाबाद डेराइस्माईखान, जोधपूर, मुलतान, लाहोर व आग्रा वगैरे ठिकाणीं १२० वर उष्णता पुष्कळ वेळ नोंदलेली आहे. सर्वांत जास्त थंडी डिसेंबर व जानेवारी महिन्यांत सकाळीं ५-३० च्या सुमारास असते. फार थंडीचीं कांहीं उदाहरणें खालीं दिलीं आहेत.

गांव उष्णमान तारीख
पेशावर २५.७  १९ डिसेंबर १८७८
रावळपिंडी २३.९ २८ डिसेंबर १८७८
डेराइस्माईलखान २६.८ ९ जानेवारी १८७६

हिंदुस्थानांतील हवामानाचे पट दररोज सरकारमार्फत प्रसिद्ध होतात. हिंदुस्थानांत सर्व जिल्ह्याच्या व तालुक्यांच्या ठिकाणीं व त्याचप्रमाणें इतर महत्त्वाचीं ठाणीं आहेत तेथें हवामान, पाऊस, उष्णता वगैरे माहिती रोज सकाळीं आठ वाजतां नोंदून प्रत्येक प्रांताच्या मुख्य ठिकाणीं तारेनें पाठविली जाते. या महितीचे प्रत्येक प्रांताचे पट व कोष्टकें रोज प्रसिद्ध होतात. प्रांताप्रमाणें सर्व हिंदुस्थानाचेहि पट व कोष्ठकें महत्त्वाच्या ठिकाणच्या महितीचे रोज प्रसिद्ध होतात. नमूद केलेली  माहिती प्रसिद्ध करण्याच्या ठिकाणीं गेली म्हणजे तींत कांहीं ठराविक दुरूस्त्या करावयाच्या असतात, त्यांच्यावरून पट छापिला जातो. वायुमाफक यंत्र पा-याचें असल्यास हवेच्या दाबाची जी नोंद असते तीमध्यें दोन दुरूस्त्या करतात. यंत्रांतील पारा उष्णतेप्रमाणें वरखालीं होतो. त्यासंबंधाची पहिली दुरूस्ती असते व समुद्रपाटीपासून सर्व गांवें सारख्याच उंचीवर नसतात तेव्हां उंचीमुळें हवेच्या दाबांत झालेला फरक काढून मग निरनिराळ्या ठिकाणच्या हवेच्या दाबाची तुलना केली जाते. वायुभारमापक यंत्र पा-याचें नसल्यास पहिल्या दुरूस्तीची जरूर पडत नाहीं. परंतु कोणतेंहि यंत्र असलें तरी तें कलकत्त्यास ठेविलेल्या यंत्राशीं ताडून त्या यंत्रानें नोंदलेल्या माहितींत जरूर असलेला फेरफार केला जातो. नंतर प्रांताच्या किंवा हिंदुस्थानच्या नकाशावर समदाबाचीं ठिकाणें जोडून रेघा काढतात व याच रेघांनां समदाबरेघा असें म्हणतात. कोष्टकाच्या पहिल्या सदरांत दिलेल्या तारखेची सकाळीं ८ वाजतां नोंदलेला व मुख्य ठिकाणीं वर सांगितल्याप्रमाणें दुरूस्तम केलेला हवेचा दाब दिलेला असतो. दुस-या सदरांत पूर्वींच्या २४ तासांत झालेला फरक देतात. तिस-या सदरांत वा-याची दिशा व चवथ्यांत वा-याची चोवीस तासांत दर ताशीं असलेली गति देतात. नकाशावर वायूची दिशा बाणांनीं दाखवितात व बाणांनां शेपट्या असतांत. त्या पटांत दिलेल्याप्रमाणें गति दाखवितात. ज्या ठिकाणीं वायूला गति नसेल त्या ठिकाणीं फुली मारतात. पांचव्या सदरांत त्या दिवसाच्या सकाळीं ८ वाजतांची उष्णता, सहाव्यांत पूर्वींच्या चोवीस तासांतील सर्वांत जास्त व सातव्यांत सर्वांत कमी उष्णता, आठव्यांत जास्त व कमी उष्णतेचा मध्य आणि नवव्या सदरांत आदल्या दिवसाच्या उष्णतेचा मध्य  व त्या दिवसाच्या उष्णतेचा मध्य यांतील फरक देतात. दहाव्या सदरांत हवेंतील ओलाव्याचें प्रमाण व अकराव्यांत चोवीस तासांत झालेला फरक असतो. हवेंतील ओलाव्याचें प्रमाण वाढल्यास पाऊस येण्याचा संभव असतो.

नेहमीं उष्णता वाढली म्हणजे हवेंतील ओलाव्याचें प्रमाण कमी होतें बाराव्या सदरांत आकाशांतील ढगांचें प्रमाण शून्य असतें म्हणजे ढग मुळींच नाहींत. व दहा म्हणजे आकाश पूर्ण अभ्राच्छादित आहे असा अर्थ असतो. यावरून जे आंकडे दिलेले असतात. ते ढगांचें कोणतें प्रमाण दाखवितात हें सहज कळतें. तेराव्या सदरांत पूर्वींच्या चोवीस तांसातील आठ वाजता मोजलेला पाऊस चवदाव्यांत जून पहिलीपासून त्या दिवसापर्यंतचा एकंदर पाऊस पंधराव्यांत नेहमींचा जून पहिलीपासून त्या दिवसापर्यंतचा सरासरी पाऊस आणि सोळाव्यांत सरासरीपेक्षां जास्त किंवा कमी किती ही माहिती असते. नकाशावर पाऊस दाखवितांना ज्या ठिकाणचा पाऊस दाखवावयाचा असतो. तेथें एक वर्तुळ काढतात व त्या वर्तुळांत किती इंच किंवा इंचाचा भाग पाऊस आहे हें दाखवितात. एखाद्या ठिकाणच्या हवामानासंबंधीं विशेष कांहीं सांगावयाचें असल्यास तें सतराव्या सदरांत देतात. पटाच्या पहिल्या पानावर पटांतील नकाशांत व कोष्टकांत दिलेल्या माहितीवरून निघणारें अनुमान व पुढील भविष्य थोडक्यांत दिलेलें असतें.

आरोग्य व कटिबंध यांचा संबंध:– फार पूर्वींपासून हवेचा व रोगांचा कांहीं तरी संबंध असावा अशी लोकांची समजूत आहे. कांहीं रोग उष्ण देशांत असतात व कांहीं थंड देशांत असतात कांहीं उन्हाळ्यांत जोर करतात तर कांहीं थंडीच्या दिवसांत आपला अम्मल चालवितात. कित्येक रोग समुद्रकिना-यावर असतात. परंतु उंच डोंगरावर ते कधींच होत नाहींत. धुकें व अभ्राच्छादित आकाश रोगांनां पोषक होतें. परंतु स्वच्छ व मुबलक हवा आणि सूर्यप्रकाश यापूढें त्यांचा जोर टिकत नाहीं या सर्व गोष्टींचा विचार केल्यास लोकांची समजूत सकारण आहे असेंच म्हणावें लागेल. परंतु अमुक एक रोग थंड देशांतच होतो, उष्ण देशांत होत नाहीं किंवा आकाश आभ्राच्छादित असतांना होतो, एरव्हीं होत नाहीं असें म्हणणें बरोबर होणार नाहीं. कारण या बाबतींत माहिती गोळा करणें झाल्यास उष्णता, हवेंतील वाफ, वारा, सूर्याचा प्रकाश या सर्वांचा परिणाम त्या एका रोगावर काय होतो हें शोधिलें पाहिजे. आणि तसें करणें ही गोष्ट फार कठिण आहे. म्हणून आातांपर्यंत काढलेलीं कित्येक अनुमानें खोटीं  ठरतात.

हवेचा प्रत्यक्ष परिणाम रोगांच्या जंतूवर व माणसांच्या प्रकृतीवर होतो. जेव्हां हवेंत जोर झाल्यानें एखाद्या रोगाच्या जंतूंनां जोर येतो. व कित्येक माणसांची प्रकृति या जंतूंचा प्रतिकार करण्यास समर्थ नसते त्यावेळीं या विशिष्ट रोगाची सांथ पसरते. पृथ्वीवरील निरनिराळ्या कटिबंधांतील रोगांच्या वेगळाल्या यादी काढणें शक्य असलें तरी तें अगदीं बरोबर होणार नाहीं. कारण पुष्कळ रोग बहुतेक ठिकाणीं अढळूं शकतात. तेव्हां रोगांची यादी देण्याऐवजीं निरनिराळ्या कटिबंधांतील लोकांच्या प्रकृतीवर तेथील हवेचा काय परिमणाम होतो हें दिलें पाहिजे.

उष्ण कटिबंधात उष्णतेचें मान जास्त असतें आणि त्या बरोबरच कित्येक वेळां हवेंतील वाफेचें प्रमाणहि जास्त असतें. या दोहींचा शरीरावर असा परिणाम होती कीं श्वासोच्छवासाची गति वाढते. नाडीची गति कंचित् मंदावते, अन्नपचनाची क्रिया मंदावते आणि आळस व थकवा येतो. कांहीं रोग विशेषतः उष्णकटिबंधांतच आढळतात. म्हणून त्यांनां उष्णकटिबंधिक रोग असेंच म्हणतात. त्यांपैकीं विशेष महत्वाचे सूर्याची लूक, हिंवताप, आमांश पीतज्वर पटकी किंवा महामारी वगैरे आहेत.

समशीतोष्ण कटिबंधांतील हवेचा मनुष्याच्या शरीरावर होणारा परिणाम उष्ण कटिबंध व शीत कटिबंधांतील हवेच्या परिणामाच्या दरम्यान असल्यामुळें  त्या कटिबंधाला मिळलेलें नांव योग्य आहे. शरीरांतींल इंद्रियांच्या क्रिया उष्ण किंवा थंड कटिबंधापेक्षां या कटिबंधांत जास्त हेलकावे न खातां चालतात. या कटिबंधातील हवेंत वरच्यावर फरक होत असल्यामुळें  तेथील लोकांनां त्यांची संवय होऊन त्यांच्या शरीरावर हवेच्या फरकाचा फारसा परिणाम होत नाहीं. परंतु उष्ण कटिबंधांत असा फरक बाधतो. उन्हाळा कडक नसतो. परंतु थंडीचें माना बरेंच कडक असतें. त्यामुळें विशेषतः हवेंत वाफेचें मान जास्त असल्यामुळें  घसा व फुफ्फुसांना त्रास होतो. आणि त्यामुळें त्या इंद्रियांचे आजार होतात. विशेषतः थंडीच्या दिवसांत फुफ्फुसदाह, इन्फ्लुएन्झा, डांग्या खोकला वगैरे आजारांनां जोर येतो. थंडींत लोक उबारा करूंन घरांत कोंदट हवा करून राहातात व रोजच्या रोज स्नान करीत नाहींत म्हणून स्पर्शजन्य रोगांचा प्रसार हिवाळ्यांत जास्त होण्याचा संभव असतो. उन्हाळ्यांत हिवाळ्यांत जास्त होण्याचा संभव असतो. उन्हाळ्यांत या कटिबंधांत अन्नपचनाचे विकार, हिंवताप विषमज्वर वगैरे रोग इतर वेळेपेक्षां जास्त प्रमाणांत असतात.

शीत कटिबंधांत थंडी फारच कडक असते. त्या प्रदेशांत स्पर्शजन्य रोगांचा फारसा प्रसार होत नाहीं. याचें कारण कडक थंडी, व लोकांचें दळणवळण कमी असतें. या प्रदेशांत गोठून मरण्याचा मात्र फार संभव असतो, या कटिबंधांत चव व वास जरा कमी होतात, नाक वाहतें, झोंप जास्त येते, त्याचप्रमाणें अपचन केंस जाणें, कांतडीच रंग पिंवळट किंवा फिकट होणें, बाहेरच्या कोरड्या थंड हवेमुळें फुफ्फुसांतून वाफ बाहेर जाऊन कोरड पडणें वगैरे विशेषच असतें. उष्ण कटिबंधांतील वाळूच्या मैदानांसारख्या या बर्फमय मैदानांत घशाला पाण्याचा शोष पडतो.

पृथ्वीचें कवच.- पृथ्वीवरील कांहीं खाणी एक मैलापेक्षां जास्त खोल आहेत. त्यांतील उष्णतेसंबंधानें जो अनुभव आहे त्यावरून दर साठ फूट खोलीला एक अंश (फारन हीट) उष्णता वाढते व याप्रमाणें उष्णता वाढत गेल्यानें साधारण वीस मैल खोलीवर सर्व खडक द्रवरूपांतच असले पाहिजेत असें अनुमान निघतें. कांहीं शास्त्रज्ञांच्या मतानें पृथ्वीच्या उदरांत अतिशय उष्णता असून तेथील खडक द्रव स्थितींत आहेत परंतु कांहींच्या मतानें उष्णता जरी पुष्कळ असली तरी पृथ्वीच्या वरील भागाच्या दाबामुळें आंतील भाग द्रव न होतां घन स्थितींतच आहे. हा मतभेद एके बाजूस ठेवला तर दोन गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. असें म्हणण्यास हरकत नाहीं, पृथ्वीच्या उदरांत उष्णता पुष्कळ आहे, व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी वीस मैल खोलीपर्यंतचा भाग घन आहे. ह्य घन भागालाच पृथ्वीचें कवच म्हणतात.

पृथ्वीवरील खडकः- खडक अग्न्यत्पन्न जलजन्य व मूलरूपांतरीभूत असें तीन प्रकारचे असतात पृथ्वीचा पृष्ठभाग थंड झाला तेव्हां तयार झालेले खडक हल्लीं ज्वालामुखीं तून बाहेर पडून निघालेले खडक अग्युत्पन्न त-हेचे होत. हे प्रथमतः द्रव स्थितींत असतात. आणि थंड होऊन घन स्थितींत जातांना त्यामध्यें खनिज पदार्थांचे स्फटिक तयार होतात. ह्या खडकांचा रंग ह्यांतील स्फटिकांच्या रंगावर तयार झालेले असतात. नद्या, नाले किंवा ओढे वाहुं लागले म्हणजे जमिनीवरील खडकांचे ठिसूळ भाग व माती वाहून जाते. व शेवटीं हे सर्व समुद्रतळावर किंवा एखाद्या सरोवरांत सांठून त्यांचे तेथें थर तयार होतात. थर दाबले गेल्यानें त्यांचे खडक बनतात. कित्येक वर्षांनीं समुद्राचा व सरोवराचा तो भाग भरून त्या ठिकाणीं जमीन तयार होते. खडक नेहमीं थरांचे बनलेले असतांत. तिस-या त-हेचे खडक मूळचे अग्नुत्पन्न किंवा जलजन्य असून नंतर त्यांत उष्णतेनें किंवा दाबानें फरक होऊन त्यांचें स्वरूप पालटतें; अशा खडकांनां मूलरूपांतरीभूत खडक म्हणतात.

पृथ्वीचें कवच हवा व पाणी या दोन वेष्टणांच्या आंत आहे तरी त्याचा एक एकचतुर्थांश भाग समुद्रपाटीच्या वर आहे; याच भागाला जमीन म्हणतात. याचें क्षेत्रफळ सरासरी ५,५०,००,००० चौरस मैल आहे. जमिनीच्या बहुतेक भाग उत्तर गोलार्धांत असून त्याचीं निमुळतीं टोंकें उत्तर ध्रुव आणि विषुवृत्ताच्या समान आंतरावर दक्षिणेच्या बाजूला आलेलीं आहेत. बहुतेक जमीन उत्तर गोलार्धांत कां असावी याचें कारण कांहीं कळत नाहीं. व हल्लींची स्थिति पहिल्यापासून असावीं असें वाटतें. समुद्राचे खोल तळ पाण्यावर व जमिनीचीं खंडें पाण्याखालीं कधीं नसावींत असें दिसतें. उपसागारांचा आणि जमिनीच्या खंडाचा कसा संबंध येतो हें अमेरिकेच्या नकाशाकडे पाहिलें असतां स्पष्ट कळून येतें. पॅसिफिक महासागर अटलांटिकपेक्षां मोठा आहे. त्यामुळें पॅसिफिकच्या बाजूसच उंच पर्वत आहेत. केपहार्नपासून आर्क्टिक महासागरापर्यंत जी पर्वतांची ओळ आहे त्याच ठिकाणीं जमीन फार उचलली गेली असून पूर्वेकडे मोठालीं पठारें, सपाट जमिनी व नंतर अटलांटिकचा मोठा खोल उतार लागतो प्रत्येक खंडांतील उंच सखल भाग सपाट केल्यास प्रत्येक खंडाची समुद्रसपाटीपासून उंची खालीं दिल्याप्रमाणें येते.

खंड क्षेत्रफळ (चौरस मैल) सर्वसाधारण (उंची फूट)  सर्वांत जास्त (उंची फूट)
यूरोप ३७,००,००० १०३२ १८,५००
आशिया १,६४,००,००० ३३१३ २९,०००
आफ्रिका १,११,००,००० २१६५ १८,८००
आस्ट्रेलिया ३०,००,००० १०१७ ७,२००
उत्तर अमेरिका ७६,००,००० २१३२ १८,२००
दक्षिण अमेरिका ६८,००,००० २१३२ २२,४००
सर्व खंडें मिळून ५,५०,००,००० २४२१ २९,०००

      
जमिनीवरील सर्वांत उंच ठिकाण हिमालयांतील गौरीशंकराचें शिखर २९००० फूट उंच आहे. सर्वांत खोल परंतु पाण्याखालीं नसलेला भाग मृतसमुद्राचा किनारा समुद्रसपाटीपासून १३०० फूट खोल आहे. व जमिनीवरील पाण्याखालीं कास्पियन समुद्राचा तळ ३००० फूट खोल आहे. पृथ्वीच्या कवचांत व पृष्ठभागावर जे फेरबदल होतात. याला पृथ्वीच्या उदरांतील हालचाली, वारे, नदी, नाले इत्यादि मुख्य कारणें आहेत.

पृथ्वीची उष्णता जसजशी कमी होत जाते तसतसा तिच्या आंतील भाग आकारानें लहान होतो. व म्हणून वाळूं लागलेल्या फळावर जशा सुरकुत्या पडतात. तशा सुरकुत्या पृथ्वीवर पडतात. आणि कवचाचा  कांहीं भाग उचलला  जातो. व कांहीं खालीं ओढला जातो, अशा त-हेचे फरक पूर्वीं झालेले आहेत व अजूनहि होत आहेत. अशीं उदाहरणें पुष्कळ दाखवितां येतात. हा फरक इतका सावकाश होत असतो कीं, तो तेथील राहणा-या लोकांच्या लक्षांत येणें शक्य नाहीं. मद्रास किना-यावरील पुष्कळसा भाग पूर्वीं समुद्रांत होता असें सिद्ध करणें फारसें कठिण पडणार नाहीं. बोथनियाच्या आखातांत हल्लीं जमीन वर उचलली जात आहे. स्टॉकहोम शेजारीं गेल्या शतकांत जमीन १८ १/२ इंच उचलली गेली आहे. इंग्लंड, स्वीडन, जपान वगैरे ठिकाणीं पूर्वीं जमिनीवर केलेले रस्ते हल्लीं समुद्रांत गेलेले पाण्याखालीं आढळतात. मुंबई बंदर तयार होत असतांना आब्याचीं वगैरे जमिनीवर उगवणारीं झाडें जागच्या जागींच उभीं असलेलीं समुद्राच्या पाण्यांत सांपडलीं यावरून जमीन कांहीं ठिकाणीं वर येते व कांहीं ठिकाणीं खालीं जात असतें असें सिद्ध होतें. या गोष्टीमुळेंच पृथ्वीवरील मोठाले पर्वत व द-या तयार झाल्या आहेत. भूकंपानें पृथ्वीच्या कवचाचे भाग पुष्कळ वेळां खालीं वर ढकलले जातात. हे फरक एकदम होत असल्यामुळें  लोकाच्या तेव्हांच लक्षांत येतात. १८१९ सालीं कच्छाचें रण भूंकपानेंच खालीं गेलें. वरील दोन कारणांनीं ज्याप्रमाणें समुद्रसपाटीपासून जमिनीची उंची कमी जास्त होते त्याप्रमाणें ज्वालामुखीपर्वतामुळेंहि झाल्याचीं पुष्कळ उदाहरणें आहेत.

वारे, पाऊस, नदी, नाले वगैरेंचें काम सदा चालूं असतेंच. वारे नेहमीं मंद असतांत. तरीसुद्धां खडकांवर भुगा झाला कीं, तो एका जागेकडून दुस-या जागेकडे नेण्याचें काम सदा चालूं असतेंच. परंतु तोच वारा झपाट्यानें वाहूं लागल्यास मोठाले दगड, झाडें, घरें उचललीं जाण्याची पाळी येते. पाऊस, नदी किंवा नाले यांच्या तडाख्यांत कोणताहि खउक सांपडल्यास त्याचा कधींना कधीं तरी भुगा होऊन तो वाहून नेला जाणारच. दगड कठिण व पाण्याचा जोर कमी असल्यास जास्त दिवस लागतील, इतकेंच काय तें; परंतु भुगा हा होणारच. याचा कारणांनीं ओहोळ, द-या, खोरीं, खिंडीं पडतात. वारे, नद्या, यांच्या वाहण्यानें नेहमीं खडकांचा भुगा होण्यापलीकडे कांहीं होत नाहीं असें नाहीं. वा-याच्या योगानें पुष्कळ वेळां वालुकेच्या  टेंकड्या तयार होतात. तसेंच नद्यांतील वाळू व गाळ सरोवरांत किंवा समुद्रांत सांठून त्यांचे खडक तयार होतात. वनस्पती व प्राणी यांचे सुद्धां खडक नाहींसे करण्याचें व तयार करण्याचें काम चालूं असतें. झाडांचीं मुळें व त्यांतून बाहेर पडणारीं अम्लद्रव्यें खडकांचा नाश करतात. परंतु कित्येक वेळां दगडाखालीं किंवा वाहून आलेल्या वाळूखालीं दडपून गेल्यानें त्यांचे खडक तयार होतात. प्रवाळ बेटें हीं तर प्राण्यांच्यामुळें खडक तयार झाल्याचीं स्पष्ट उदाहरणें आहेत.

समुद्रसपाटीपासून ५००-१००० फुटांपेक्षां कमी उंचीवर मैदानें असतांत. हीं पुष्कळ वेळां समुद्राकांठालाच असतात, तर कित्येक वेळीं समुद्रापासून दूरवर पसरलेलीं असतांत. पृथ्वीवरील सर्वांत मोठें मैदान इंग्लंडच्या मध्यभागीं सुरू होऊन मध्य यूरोप व मध्य अशियांतून आर्क्टिक महासागरापर्यंत जातें. या मैदानाच्या पश्चिमभागांस स्कँडिनोव्हिया, स्कॉटलंड, वेल्स व स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीचीं पठारें आहेत. उत्तरेच्या बाजूस हें मैदान आर्क्टिक समुद्राच्या तळाकडे उतरतें व दक्षिण बाजूस कॅस्पियन समुद्राच्या तळापर्यंत म्हणजे समुद्रसपाटीच्या खालीं ३००० फूट जातें. उरल पर्वतामुळें या मैदानाचे पूर्व व पश्चिम असें दोन भाग झाले आहेत. अमेरिकेच्या पूर्व किना-यावर एक मैदानाची रुंद पट्टी आहे. मिसिसिपी, अँमेझॉन व ला फ्लाटा वगैरे नद्यांच्या मुखापासून बरेंच वरपर्यंत मोठालीं मैदानें आहेत. कांहीं वर्षांपूर्वींचीं मैदानें समुद्राखालीं गेलीं आहेत. मैदानें साधारणतः नद्यांच्या प्रवाहमार्गांवर आणि पर्वत व समुद्र यांच्या दरम्यान असल्यामुळें  डोंगरांतून वाहून आलेली वाळू, रेती व माती मैदानावर पसरलेली आढळते.

समुद्रापासून ५०० ते १००० फुटांपेक्षां जास्त उंच असलेल्या जमिनीच्या सपाट प्रदेशास पठार म्हणतात. पठारें साधारणतः डोंगराच्या शेजारीं आढळतात. व पुष्कळ वेळां पठारें डोंगराचा पायथाच असतांत. बहुतेक प्रत्येक खंडांत पठारें आहेत. मध्य आशियांत हिमालयाच्या उत्तरेस हजारों चौरस मैलांचें उंच पठार आहे. महाराष्ट्रांत पर्वतभेगांतून ज्वालामुखीरस बाहेर येऊन २००० फूट उंचीचें व २,००,००० चौरस मैलांचें एक मोठें पठार झालें आहे. कित्येक वेळां पठारावरच डोंगर असतात. उत्तर अमेरिकेंत ४००० ते ५००० फूट उंचीच्या पठारावर आठ व दहा हजार फूट उंचीचा रॉकी पर्वत आहे. पठारें तीन कारणांनीं होतातः- (१) मूळची सपाट जमीन जशीच्या तशीच वर उचलली गेल्यामुळें; (२) मूळचे डोंगराचे सुळके पडून डोंगराचा खालचा भाग सपाट झाल्यामुळें किंवा (३) ज्वालामुखीरस भेगांतून बाहेर येऊन त्यांचे थर झाल्यामुळें. पहिल्या प्रकारचें उदाहरण म्हणजे रॉकी पर्वताचें पठार हें होय. नॉर्वेचा बराच भाग दुस-या त-हेनें झालेला आहे व हिंदुस्थानांतील महाराष्ट्र हें तिस-या त-हेचें उदाहरण आहे पठारें संपतात त्या ठिकाणीं विशेषतः समुद्राच्या बाजूस कडे तुटलेले असतात. पठारें उंच असल्यामुळें  त्यांत डोंगराप्रमाणें पाणी वाहून ओहोळ व द-या तयार होतात.

डोंगर हा शब्द जमिनीवरील उंचवट्यांना लावतात. डोंगराच्या पुष्कळ मैल पसरलेल्या रांगांना पर्वत म्हणतात व लहान उंचवट्यांना टेंकड्या म्हणतात. पर्वत किंवा डोंगर चार प्रकारचे असतात.

पृथ्वीच्या आंतील भाग अति उष्ण व द्रव्य स्थितींत आहे असें मागें सांगितलेंच आहे. पृथ्वीची उष्णता जशी कमी होत जाते तशी ती संकोच पावून तिचा आकार लहान होतो परंतु वरचें कवच आकरांत कमी न झाल्यामुळें त्याचे सुरकृत्यासारखे पडदे पडतात. हि क्रिया मंद गतीनेंच चालली असल्यामुळें  ती सहजगत्या लक्षांत येत नाहीं. पृथ्वीवरील कोणताहि डोंगर या कारणानें फार जलद वर आला असेल असें मुळींच दिसत नाहीं. अमेरिकेंतील पॅसिफिक महासागराकडील किनारा व जपान बेटें आजमितीस बरींच झपाट्यानें वर येत आहेत. तरी सुद्धां या ठिकाणीं मनुष्यांनां राहातां येणार नाहीं अशी स्थिति होत नाहीं. या ठिकाणीं बरेच वेळां भूकंपाचे धक्के बसतात. व क्वचित प्रसंगीं ज्वालामुखी पर्वातच्या स्फोट होतो. या त-हेनें तयार झालेल्या पर्वतांच्या फार लांब रांगा असतात. अमेरिकेंतील दक्षिणेकडे केपहॉर्नपासून उत्तरेकडे आलास्कापर्यंत पसरलेल्या रांगा हिमालयापर्वत अथवा आल्प्सपर्वत अशा त-हेनेच तयार झालेले आहेत. या पर्वतांच्या रांगा समांतर असतात.  मध्यभागीं सर्वांत उंच रांगा व त्यांच्या दोन्हीं बाजूंस लहान रांगा अशी बहुतेक स्थिती असते. पर्वतांच्या दोन रांगांमध्यें मोठालीं खोल खोरीं असतात. कवचाला सुरकुत्यासारखे पदर पडून उंचवटे व त्यांमध्यें खोलगट जागा तयार होत असतांनाच उंच भाग धुवून वाहून नेण्याचें काम व खोलगट भाग भरून काढण्याचें काम चालूं असतें. नाहींतर हल्लीं आहेत यापेक्षां पुष्कळच उंच पर्वत पृथ्वीवर असते. कवचाचा लाटांसारखा आकार होतांना खडकांचे थर वांकतात परंतु कित्येक वेळां खडक न वांकतां त्यांनां मोठाल्या भेगा पडतात. कवचाच्या लाटा कित्येक वेळां अगदीं जवळ जवळ उंच असतात, तर कित्येक वेळां पुष्कळ दूर दूर व उंचीला फारच लहान अशा असतात. दुस-या प्रकारांत उंच पर्वत तयार होत नाहींत आणि एकदम उतार अथवा चढ अशा ठिकाणीं द्दष्टीस पडत नाहींत.

ज्वालामुखींतून जो रस बाहेर येतो त्यायोगें अगदीं लहान टेंकड्यांपासून एटनासारखे मोठाले डोंगर तयार होतात. रस सर्व बाजूंस पसरून थंड झाल्यानें त्याला शंकूसारखा आकार येतो. शंक्वाकार डोंगराच्या बाजूंस नवीं तोंडें फुटून पुष्कळ वेळां मूळ आकार बदलतो. त्याचप्रमाणें पाण्यानें पुष्कळ ओहोळ तयार होऊन तेहि पुन्हां खडकाच्या रसानें भरतात, त्यानेंहि मूळ आकार बदलतो. कित्येक वेळां एक दोन तोंडें फुटण्याऐवजीं मोठी भेग पडून तींतून रस बाहेर येऊन दूरवर पसरतो. या रसाचे थर रचले जाऊन थंड होतात व मागाहून त्यांमध्यें खिंडी पडतात व शेवटच्या बाजूस कडे तुटून मधला भाग डोंगर बनतो. यूरोपांतील उत्तर-पश्चिम भाग, महाराष्ट्र आबिसीनिया वगैरे ठिकाणीं अशाच त-हेनें डोंगर बनलेले आहेत. मूळ जमिनीचा भाग पाण्यानें वाहून आलेल्या वाळू, रेती वगैरेंनीं झालेला असो अगर ज्वालामुखीच्या रसांच्या थरांनीं झालेला असो, तो जर समुद्रसपाटीपासून बराच उंच असेल तर वाहाणा-या पाण्यामुळें मऊ भाग निघून जाऊन टणक भाग शिल्लक राहिल्यानें त्याचा डोंगर बनतो. कित्येक वेळां वरील त-हेनें झालेल्या डोंगराचा कांहीं ठिकाणचा भाग वाहून जाऊन कठिण खडकांचे सुळके उभे राहतात. या सुळक्यांनां शिखरें असें म्हणतात.

पाण्याचा पुरवठा:- जमिनीवरील जें पाणी जमिनींत मुरत नाहीं, किंवा ज्याची वाफ होऊन जात नाहीं असें वाहणारें पाणी व त्याबरोबर बरीचशी वाळू, माती वगैरे समुद्रांत किंवा सरोवरांत नेण्याचें काम नद्या करतात. पाऊस, वितळलेलें बर्फ व झरे यांच्यापासून नद्यांनां पाणी मिळतें. ज्या मोठाल्या नद्या ब-याचा प्रांतांतून व देशांतून वहात जातात त्यांनां नेहमींच पाणी असतें. परंतु लहान नद्या स्थनिक पावसावर अवलंबून असतात. त्यांनां पावसाळ्यांत भरपूर पाणी येतें. पण इतर वेळीं पाण्याचा ओघ फारच लहान होतो. किंवा आटून जातो. साधारणतः नद्यांनां पावसाळ्यामध्यें पूर येतो. नाईल नदी अबिसीनियापासून ईजिप्तमध्यें येते. अबिसिनियांत वसंत ॠतूत पाऊस पडतो. त्यामुळें इंजिप्तमध्ये नाईल नदीला उन्हाळ्यांत पूर येतो. तसेंच गंगा नदीला एप्रिलमध्येंच पूर येतो. याचें कारण हिमालयांतील बर्फ वितळून उन्हाळ्यांत गंगेचें पाणी वाढतें. याप्रमाणें बर्फाच्छादित डोंगरातून येणा-या नद्यांनां उन्हाळ्यांत पूर येतात. याशिवाय एकाएकीं पूर आल्याचीं उदाहरणें पुष्कळ आढळतात. सिंधु नदीला असे पूर येतात. एखादा ग्लेशिअर किंवा डोंगराचा कडपा पडून सिंधूस मिळणा-या लहान नद्यांपैकीं एखादी नदी अडविली जाते. परंतु पाणी पुष्कळ सांठलें म्हणजे हा बांध फुटून नदीला पूर येतो व त्यापासून पुष्कळ नुकसान होतें. अशा त-हेचा एक मोठा अपघात १८४१ सालीं झाला होता असें मेजर अँबटनें लिहिलेलें आहे. पूर आला असतांना गंगेचें पाणी ३०-३२ फूट व नाईलचें ३५ फुट उंच चढतें. पाऊस किंवा वितळणा-या बर्फावरच जर नद्या अवलंबून असल्या तर समुद्राला पोहोचण्यापूर्वींच त्या कोरड्या झाल्या असत्या, निदान अवर्षणाच्या दिवसात तरी त्यांचें पाणी कांहीं खड्डे सोडून बाकी सर्व ठिकाणीं संपलें असतें. परंतु तसें न होण्याचें कारण असें आहे कीं, बहुतेक नद्यांनां त्याच्या प्रवाहांत असलेल्या झ-यांच्या पाण्याचा पुरवठा होतो.

जेवढें पाणी नद्यांत येतें तेवढें सगळें समुदास जाऊन मिळत नाहीं. त्यांपैकीं कांहीं भाग वाफेच्या रूपानें हवेंत जातो, व कांहीं जमिनींत मुरतो व साधारणतः एकचतुर्थांश भाग समुद्रास जाऊन मिळतो. यासंबंधाने कांहीं आकडे खालीं दिले आहेत. पाऊस एक भाग धरल्यास त्यापैकीं खालीं दिलेल्या पाण्याचा भाग समुद्रास मिळतो.

नदी पाऊस भाग
ओहिओ ०.२४
मिसोरी ०.१५
मिसिसिपी ०.३५
एल्ब ०.२५
सीन ०.३३
इंग्लंडमधील नद्या ०.२५ ते ०.३३


नद्यांच्या प्रवाहाचा वेग त्यांतील पाण्याचा लोट, व ज्या खडकांवरून नद्या वाहतात. त्या खडकांचा उतार यावर अवलंबून आहे. पाण्याचा लोट वाढल्यास किंवा खडकाचा उतार जास्त असेल त्या ठिकाणीं पाण्याचा वेग वाढतो. नद्या बहुधां डोंगरात लहान प्रवाहाच्या स्वरूपांत निघतात. नंतर त्यांनां इतर ओढे, नाले मिळाल्यामुळें त्यांनां मोठ्या नद्यांचें स्वरूप येते. डोंगरांत पावसाळ्यांत पाण्याचे ओहोळ प्रवाहांत आल्यामुळें नद्या एका खडकावरून दुस-या खडकावर आपटत फार जोरांत खालीं येतात. व द-यांत आल्यावर त्याचा जोर कमी होतो. द-यांत वांकडीं वळणें घेत ब-याच वेगानें त्या मैदानात येतात. मैदानांत आल्यावर मात्र त्याचा वेग बराच संथ होतो. यूरोपांतील -हाईन, -होन व डॅन्यूब; हिंदुस्थानांतील गंगा सिंधु; अमेरिकेंतील मिसिसिपी व अँमेझॉंन आणि आफ्रिकेंतील नाईल व नायगरा  या जगांतील मोठ्या नद्या आहेत. व त्यांचे प्रवाह वर सांगितल्याप्रमाणें बदलतात. नदीचा उतार दाखविणारा नकाशा काढल्यास असें दिसेल कीं नदी प्रथमतः बहुतेक उतार उतरून येते व नंतर सपाट जमिनीवरून वाहाते. यामुळेंच नदीचा प्रवाह प्रथम फार झपाट्याचा असतो, तोच पुढे मंद होत जातो. नदीचा एकंदर उतार काढण्यासाठीं नदीच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीला नदीच्या लांबींनें भागतात. पण या नदीच्या सरासरीनें काढलेल्या उताराचा विशेष उपयोग होत नाहीं. पृथ्वीवरील मोठ्या नद्यांचा उतार सरासरीनें मैली दोन फुटांपेक्षां कमी आहे. मिसोरी नदीचा प्रवाह बराच जोराचा आहे व त्याचा उतार मैलास २८ इंच या प्रमाणांत आहे. थेम्स नदीचा उतार मैलास २१ इंच, नाईलचा ५.५ इंच व यूरोपांतील बहुतेक नद्यांचा २४ इंच आहे. जहाजें जाण्यायेण्याला मैलास १० इंचांपेक्षां जास्त उतार चालत नाहीं. नदीला निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळा वेग असतोच परंतु एका ठिकाणींच नदीच्या निरनिराळ्या भागांत वेग सारखा नसतो. कांठाच्या बाजूला व तळाशीं घर्षण असल्यामुळें  नदीच्या तळापेक्षां पृष्ठभागीं व कडेपेक्षां मध्यभागीं पाण्याला जास्त वेग असतो त्याचप्रमाणें नदी खोल आणि अरुंद जागेंतून जशी जोरांत जाते तशी रूंद व उथळ जागेवरून जात नाहीं. साधारणतः नदीचा वेग ताशीं ११/४ मैल असतो. व जास्तींत जास्त म्हणजे १८ ते २० मैलापेक्षां जास्त असत नाहीं.

नदीच्या पाण्यांत विरघळलेले व तरंगणारे असें दोन प्रकारचे पदार्थ असतात. त्यांचें प्रमाण प्रदेश व ॠतुमानावर अवलंबून असतें. हे पदार्थ खडकांतील खनिज पदार्थच होत. केनसिंगटनपाशीं थेम्स नदीच्या पाण्याचें पृथक्करण करून असें कळलें कीं, त्या ठिकाणीं थेम्स नदी रोज १५०२ टन किंवा वर्षांत ५४८२३० टन खनिज पदार्थ वाहून नेते. टी मेलार्ड रीड यानें हिशेब करून असें काढलें आहे कीं, दरवर्षीं इंग्लंड व वेल्समधील नद्या ८३.७०,६३० टन खनिज घन पदार्थ विरघळलेल्या स्थितींत वाहून नेतात. म्हणजे १३००० वर्षांत जमिनीवरील एक फुटाचा थर या रीतीनें नाहींसा होतो. बोहेमियामध्यें एल्ब नदीमुळें वीस हजार मैल क्षेत्रफळांतील पदार्थ वाहून नेले जातात. तेथील पुष्कळ वर्षें रोजची तपासणी करून असें आढळलें कीं दरवर्षीं या नदींतून ६,००,००,००,००० क्यूबिक मीटर पाणी, ६२,२६,८०,००० किलोग्रॅम विरघळलेले पदार्थ व ५४,७१,४०,००० किलोग्रॅम तरंगणारे पदार्थ वाहून नेले जातात. पृथ्वीवरील सर्व नद्यांचें प्रमाण काढल्यास साधारणतः १००० भाग पाण्यांत, दोन विरघळलेले पदार्थ असतात. म्हणजे ५००० वर्षांत प्रत्येक नदी आपलें पात्र भरून जमिनीवरील पदार्थ समुद्रांत ओतते. पदार्थ ढकलून किंवा वाहून नेण्याचें काम नेहमीं चाललें असतेंच. परंतु या कामांत नदीची कांहीं बाबतींत विलक्षण शक्ति द्दष्टीस पडते. नदीला पूर आला म्हणजे मोठाले खडक सहजच लांबवर नेले जातात. मिसिसिपी नदीचा फार बारकाईनें अभ्यास करूंन हिशेब केलेले आहेत. त्यावरून मिसिलिपी नदी दरवर्षीं ७५,००,००,००० क्यूबिक फूट गाळ व वाळू मेक्सिकोच्या आखातांत टाकते. या नदीच्या पाण्यांत १/२५०० भाग तरंगणारे पदार्थ असतांत. मिसिसिपी नदीनें वाहून किंवा विरघळून नेलेल्या पदार्थांचा ढीग एका चौरस मैलावर केल्यास त्यांची उंची २६८ फूट होईल. गंगानदी आपल्या पाण्याच्या १/५१०  वजन गाळ वाहून नेते. १८७५ सालीं नाईल नदीच्या पाण्यांत  १/२० गाळ होता.

नदीच्या पाण्यांत नुसता खडकापासून तयार झालेला गाळ असतो. असें नाहीं तर झाडें, मुळें, फांद्या वाहात येऊन त्यांचीं बेटें होऊन तरंगूं लागतात. तीं कित्येक वेळां इतकीं मोठालीं होतात कीं जहाजांचें जाणेंयेणें बंद होतें. एखाद्या वेळीं पाण्याच्या लोंढ्याच्या धक्का असून तीं फार लांबवर नेलीं जातात. गंगानदीमध्यें अशा त-हेचीं बेटें होऊन गंगानदीच्या मुखापासून तीं ५०-६० मैल समुद्रांत वाहून गेल्याचीं उदाहरणें नोंदलेलीं आहेत.

एका ठिकाणचे खडक खोदून त्यांचा भुगा करून दुसरीकडे नेऊन त्यांचा साठा करणें हें नद्यांचें काम सदोदित चालत असल्यानें पृथ्वीच्या पृष्ठभागावर पुष्कळ फेरबदल होतात. त्यांपैकीं जे विशेष महत्वाचे आहेत त्यांची थोडक्यांत हकीकत पुढें दिली आहे.

नदी कठिण खडकावरून वहात असल्यास पाण्याचा ज्या ठिकाणीं जोर असतो त्या ठिकाणीं खडक कापल्यासारखा खोल जातो व नदी त्या भागांतून वाहाते. तेव्हां अशा ठिाकाणीं नदीचें पात्र अरुंद व खोल असतें. एकदां नदी याप्रमाणें बरीच खोल गेल्यावर तिचा उतार व त्यामुळें तिच्या पाण्याचा जोर कमी होतो व दोन्ही बाजूंचे खडक ढासळूं लागतात. व कांहीं वर्षांनीं पात्र थोडें रुंद होऊं लागतें. मूळचा खडक किंवा जमिनीचा भाग मऊ असल्यास पृष्ठभाग सबंधच एकसारखा झिजतो. म्हणून त्या ठिकाणीं नदीचें पात्र रुंद व उथळ असतें.

कुंडेः- नदीचें पाणी जोरानें वहात असतांना वाटें खडक लागल्यास पाण्याचा कांहीं भाग उलट फिरतो व पुन्हां खडकावर जातो. याप्रमाणें पाणी फिरूं लागून भोंवरे तयार होतात. भोंव-यांत वाळू किंवा दगड नेहमीं असतात व ते पाण्याबरोबर फिरून खालील खडकावर एकसारखें घर्षण होतें व त्यामुळें खडकांत लहान मोठे खळगे होतात. हे प्रथमतः अगदीं द्रोणाएवढाले जरी लहान असले तरी कित्येक वर्षें घर्षण चालून त्यांचीं मोठाली कुंडें बनतात हीं पुष्कळ वेळां पुरूष दीड पुरूष खोल व दोन तीन हात रुंद असतात. बरींचशीं कुंडें एकमेकापाशीं असल्यास त्यांच्यामधील भिंतीसारखा भाग झिजून जाऊन तीं सर्व एक होऊन त्यांचा मोठा डोह बनतो. ही कुंडें व हे डोह सर्व लहान मोठ्या नद्यांतून द्दष्टीस पडतात.

धबधबेः- नद्यांचें पाणी कित्येक वेळां उंच कड्यावरून खालीं पडतें, असें पाणी ज्या ठिकाणीं पडतें त्या ठिकाणास धबधबा म्हणतात. हे कडे मूळचे असतांत किंवा पुढच्या बाजूचा ठिसूळ व मऊ खडक वाहून जाऊन मागील खडक पूर्वीं होता त्याच उंचीवर राहिल्यानें नवीन कडे तयार होतात. कड्यावरून पाणी खालीं पडतांना पाण्याला पुष्कळ जोर असल्यानें कड्याचा खडक कापला जातो व दरसालीं धबधबा मागें जाऊन खडकांत नालाच्या आकाराची खिंड तयार होते. अमेरिकेंतील नायगराच्या धबधब्याची खिंड ७ मैल लांब व २८० ते ४८० यार्ड रुंद आहे. ही खिंड दरसालीं एक लांबींत वाढत असावी व धबधब्याचें वय ३५००० वर्षें असावें असा अंदाज आहे. धबधब्याची खोली २०० ते ३०० फूट आहे. सर्वांत मोठा धबधबा कारवारमध्यें आहे. या ठिकाणीं सरस्वती नदी एकदम १००० फूटांवरून उडी घेते. याला गिरसप्पाचा धबधबा म्हणतात. कॅप्टन न्यू बोल्ड म्हणतो कीं या धबधब्यांतून पावसाळ्यांत दर सेंकेदास ४६००० घन फुट पाणी पडतें. आल्प्स पर्वतांतील केरॉसोली धबधबा गिरसप्पापेक्षां उंच आहे परंतु त्यांत पाणी कमी असतें. व नायगाराला पाणी पुष्कळ असतें, परंतु त्याची उंची फारच कमी. एकंदरींत उंची व पाण्याचा सांठा असें दोन्ही जमेंत घेतल्यास गिरसप्पाचा धबधबा जगांतील सर्व धबधब्यापेक्षां मोठा आहे असें म्हटले पाहिजे. गोकाक येथील घटप्रभेचा धबधबा १७५ फूट उंच आहे. धबधबब्याच्या मागील बाजूस नदीची रुंदी २५ यार्ड आहे परंतु ज्या ठिकाणीं पाणी पडतें त्या ठिकाणीं ७० यार्ड रुंदी आहे. पावसाळ्यांत दर सेकंदाला १६००० घनफूट पाणी पडतें. कावेरीचा धबधबा ३०० फूटच उंच आहे. परंतु त्याला गिरसप्पापेक्षां जास्त पाणी असतें. हिंदुस्थानांत पुष्कळ लहान मोठे धबधबे आहेत; यांपैकीं सर्वांत उंच धबधबा चेरापुंजीपाशीं खासी डोंगरावर आहे; त्याची उंची १८०० फूट आहे.

नदीचा ओघ नेहमीं उतार असेल त्या बाजूला जातो. वाटेत जरी लहान उंचवटा आला व दुस-या बाजूस जरा जास्त उतार असला तर पाणी त्या बाजूस वहाते. अशा त-हेने नदी एकसारखे वळसे घेत वहात जाते. वहातांना ज्याठिकाणी पाण्याला जोर असेंल त्या ठिकाणचे खडक फोडणें व त्यांचा चुरा वाहून नेणें व ज्या ठिकाणीं पाण्याला जोर कमी होईल त्या ठिकाणीं खडक, माती, वाळू आणून रचणें हें काम सदोदित चालू असतें; याच कारणानें बहुतेक नद्यांचे कांहीं ठिकाणीं तीर वाहून गेलेंले पडलेले असतात; तर कांहीं ठिकाणीं दरसालीं वाळू व मातीचे ढीग येऊन पडतात. कोणतीहि नदी बारकाईनें तपासल्यास हीं उदाहरणें द्दष्टीस पडतील. गंगा नदी किंवा सिंधु नदी दरसालीं हिमालयपर्वत खणून त्याची वाळू खालील प्रदेशावर पसरवितात. या वाळूनें उत्तर हिंदुस्थानाचा मोठा भाग व्यापिलेला आहे व ती इतकी खोल आहे कीं तिच्या तळाशीं अजून जातां आलें नाहीं.

नदीच्या प्रवाहाचा जोर कमी होऊं लागला कीं त्यांतील वहावत जाणारे पदार्थ खाली पडूं लागतात. आणि म्हणूनच नदीच्या तळाशीं किंवा तीरावर वाळू व गाळ सांठतो. नदी जर एखाद्या सरोवरास मिळाली तर तिचा वेग दोन पाण्यांची गांठ पडल्याबरोबर एकदम पुष्कळच कमी होतो. तेव्हां प्रथमतः मोठाले दगड खालीं बसतात. व प्रवाह जसजसा पुढें जाईल तसतशी वाळू, बारीक रेती, व शेवटीं बारीक माती खालीं बसते. नदीच्या तोंडाभोंवतीं या पदार्थांची एक पंख्यासारखी आकृति होते.

नदीप्रवाहाबरोबर वहात जाणारे पदार्थ प्रथमतः जरी नदीच्या पात्रांत कांठांवर किंवा एखाद्या सरोवरांत सांठले तरी आज ना उद्यां शेंवटीं ते समुद्रात येऊन मिळणारच. समुद्रांत नदीचें पाणी शिरल्याबरोबर खारट व जड पाण्यावर तरंगूं लागतें व त्यांतील गाळ लागलीच खालीं बसूं लागतो व त्याचा नदीच्या मुखाशीं एक दांडा तयार होऊं लागतो.  नदीला पूर आल्यास हा दांडा ढकलला जातो परंतु इतर वेळीं समुद्र व आपल्या लांटांनीं वाळू आणून दांड्याची उंची वाढवितो. हे दांडे शेवटीं इतके वाढतात कीं जहाजाचें जाणेंयेणें बंद पडतें. मिसिसिपीच्या दांड्यांसंबंधानें असें सांगतात कीं एका दांड्याचें क्षेत्रफळ एक चौरस मैल आहे, व त्याची उंची ४९० फूट आहे व दरसालीं हा दांडा वाढतच असतो. मिसिपीचे जे दांडे आहेत त्यांवर चिखलाचे गोळे सांठल्यासारखे जमतात. व त्यांतून पेट घेणा-या वायूंचे फूत्कार बाहेर येतात. हे गोळे बरेच मोठें क्षेत्रफळ व्यापतात. व त्यांची उंची समुद्राच्या पाण्यावर १८ फूटपर्यंत चढते. परंतु नदीला पूर आला म्हणजे ते एकदम वाहून जातात. वाहून आलेला झाडपाला कुजून त्याचेच हे वायू तयार होत असावेत असें वाटतें.

मुख प्रदेश (डेल्टा)- नद्या समुद्राला मिळण्यापूर्वीं बहुतेक सपाट जमिनीवर येतात. त्या ठिकाणच्या व त्यांच्या सुरवातीच्या स्थितींत पुष्कळ फरक पडतो. सुरवातीला गाळ वाहून नेण्याचें काम झपाट्यानें चाललेलें असतें परंतु तोंडाशेजारच्या जमिनीवर तोच पसरला जाऊन इतका वाढतो कीं नदीला समुद्रास जाऊन मिळणें कठिण पडतें. नदीला फांटे फुटून ते जो मार्ग मिळेल त्या मार्गानें समुद्राकडे जातात. हे फांटे गाळानें भरले कीं नवीन फांटे व नवीन तोंडें फुटतात. अशा त-हेनें या गाळाला नदीचा फांट्यांनीं व्यापिलेला एक त्रिकोणाकृति जमिनीचा भाग तयार होतो, व याला मुखप्रदेश असें म्हणतात. कित्येक वेळां या मुखप्रदेशांत किंवा त्याशेजारीं इतका गाळ सांठतो कीं नदीचे कांठ भोंवतालच्या जमिनीपेक्षां उंच होतात. इतकेंच नव्हे तर नदीचें पात्र सुद्धां उंचवट्यावरून वाहूं लागतें. कलकत्ता शहराचें पाणी नदीकडे न वाहातां उलट दिशेला वाहतें. इटलींतील पो नदी अशींच भोवतालच्या प्रदेशापेक्षां उंच आहे. नाईल नदीला पूर्वीं सात तोंडें होतीं, त्यांपैकीं आता दोनच आहेत व बाकीचीं बुजून जाऊन त्या ठिकाणीं तळीं व सरोवरें झालीं आहेत नाईल नदीच्या मुखप्रदेशाची समुद्रकांठाकडील लांबी १८० मैल आहे व समुद्रकांठापासून मूळ नदी जेथें दुभंग होते तेथपर्यंत ९० मैलांचें अंतर आहे.

मिसिसिपीच्या मुखप्रदेशाचें क्षेत्रफळ १२३०० चौरस मैल आहे व तो दर वर्षीं समुद्राच्या बाजूला वाढत जात आहे. गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखप्रदेखाचें क्षेत्रफळ ५०,००० ते ६०,००० चौरस मैल आहे व ४८१ फूट खोल गेलें तरी जमिनीवरील वाळू व पुरलेल्या वनस्पतीच सांपडतात परंतु सम्रुद्रांतील वनस्पती किंवा प्राणी मुळींच सांपडत नाहींत. बंगालमधील सुंदरवन ज्या ठिकाणीं आहे त्या ठिकाणीं पूर्वीं समुद्र होता परंतु गंगेंतून येणा-या वाळूनें ती जागा हल्लींच्या स्थितींत आहे. आणखी वाळू सांठून सुंदरबनाची दलदलीची स्थिति जाऊन तेथें कांहीं वर्षांनीं कोरडी जमीन होईल. कलकत्ता, डाक्का वगैर भागसुद्धां याचप्रमाणें तयार झालेले आहेत.

झ रेः- पावसाचें पाणी जमिनीवर पडल्यावर नदी, नाल्यांच्या वाटें वहात समुद्रास मिळतें, त्याचप्रमाणें वाफेच्या रूपानें आकाशांत जातें व कांहीं जमिनींत झिरपतें व शोषून घेतलें जातें. याप्रमाणें जमिनींत गेलेलें पाणी खालीं जातें, व ज्या ठिकाणीं मार्ग सांपडले त्या ठिकाणीं झ-यांच्या रूपानें बाहेर पडतें. म्हणूनच सखल प्रदेशांत किंवा द-याखो-यांत झरे आढळतात. कित्येक वेळां बाहेर पडण्यास वाट न मिळाल्यामुळें पाणी जमिनींत कोंडल्यासारखें राहातें व त्याला बाहेर जाण्यास वाट करून दिली तर पाणी जोराने वर येतें. फ्रान्समधील ऑर्टाइस प्रांतांत प्रथमतः अशा त-हेनें पाण्यास वाट देऊन कायम वाहणारे झरे काढले म्हणून त्यांनां आर्टेशियन विहिरी म्हणतात. ज्या ठिकणीं खालीं आणि वर पाणी न शोषून घेणारा खडक व मध्यें मऊ खडक अशी स्थिति असते व मऊ खडकांत पामी येण्यास मार्ग असतो अशा ठिकाणीं या विहिरी खोदतां येतात.

हिंदुस्थानांतील कांरजाच्या किंवा आर्टेशियन विहिरीः- आर्टेशियन पाणी, पावसाचें जें पाणी जमिनींत मुरतें तें  कित्येक सच्छिद्र व ज्यांतून पाणी पाझरेल अशा मातींत व खडकांत सांठून राहतें. या पाण्यावरील खडक पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत जर सच्छिद्र असला तर त्या पाण्याच्या सांठ्याला ग्राऊंड वाटर किंवा सबसॉईल वाटर असें म्हणतात. अशा ठिकाणीं जमिनींत खड्डा खणिला तर तो लागलीच पाण्यानें भरून येतो परंतु कांहीं ठिकाणीं पृथ्वीच्या पृष्ठभागाचा खडक सच्छिद्र नसतो आणि त्याच्या खालचा खडक इतक्या लांबवर पसरतो. कीं तो कोठें तरी पृष्ठभागीं येतो. अशा वेळीं सच्छिद्र खडकांतील पाणी दाबाखालीं असतें. व त्यावरच्या खडकांत भोंक पडल्यास पाणी कांरजासारखें पृष्ठभागीं येतें. या दुस-या प्रकारच्या पाण्याच्या सांठ्यांनां आर्टेशियन पाणी म्हणतात. कांहीं आर्टेशियन पाण्याला खालून पाझर असतो तर काहींनां नसतो.

अग्न्युत्पन्न खडकांतील मोठाल्या भेगांतून कित्येक वेळां आर्टेशियन पाणीं सांपडतें परंतु साधारणतः या खडकांतून सांपडत  नाहीं सर्व त-हेच्या जलोत्पन्न खडकांतून मात्र आर्टेशियन पाणी सांपडण्याचा संभव असतो. जलोत्पन्न खडक एका बाजूनें वर उचलले जाऊन त्याच्या पृष्ठभागाला उतार येतो त्यावेळीं पाणी एकाद्या ठिकाणीं सांपडेल किंवा नाहीं हें सुद्धां बहुतेक सांगतां येतें. परंतु ते जर सपाटच असले तर मात्र प्रत्यक्ष खणून पहिल्याखेरीज खात्रीनें कांहींच सांगता येत नाहीं.

पॅरिसच्या आसपास आर्टेशियन पाण्याचा सांठा ज्या खडकांत आहे तो खडक पॅरिसपासून कित्येक मैल अंतरावर पृष्ठभागीं येतो त्यामुळें तेथील आर्टेशियन पाण्याचा सांठा पॅरिसमध्यें पडणा-या पावसावर अवलंबून नसतो. हीच स्थिती इतर आर्टेशियन पाण्यांची असते. त्यामुळें ज्या ठिकाणीं आर्टेशियन विहिरी असतात त्या ठिकणीं पाऊस पडत नाहीं. तरीसद्ध विहिरांनां पाणी मुबलक असूं शकतें.

आर्टेशियन पाणी फार खोल जाऊन वर येतें यामुळें यांत कोणत्याहि रोगोच जंतू नसतात व म्हणून हें पाणी पिण्याला चांगलें असतें याशिवाय पिकांकरितां या पाण्याचा उपयोग अनपेक्षित त-हेनें कांहीं ठिकाणीं झालेला आहे. उत्तर अमेरिकेंत कांहीं ठिकाणीं व सहाराच्या वालूकामय मैदानांत पिकांना देण्यासारखें पाणी सांपडल्यामुळें सर्व निर्जल वनांतून अशा त-हेचें पाणी सांपडेल अशी चुकीची समजूत कित्येकांची होण्यापर्यंत मजल गेली आहे.

हिंदुस्थांनात विशेषतः ज्या ठिकाणीं पाऊस २० ते ४० इंचांपेक्षां जास्त पडत नाहीं अशा ठिकाणीं कित्येक वर्षें पाऊस न पडल्यामुळें पिकें बुडण्याचा संभव असतो तेव्हां अशा ठिकाणीं आर्टेशियन पाण्याचा सांठा आहे किंवा नाहीं हें शोधण्याकरितां कांहीं प्रयत्न झालेले आहेत. त्यासंबंधीं थोडीशी माहिती पुढें दिली आहे. हिंदुस्थानांतील जो भाग मूळच्या अग्न्युत्पन्न खडकांनीं व्यापिला आहे त्या ठिकाणीं आर्टेशियन पाणी सांपडण्याचा मुळींच संभव नाहीं, म्हणून बाकीच्याच भागीं प्रयोग करून पाहिले आहेत. कित्येकजण पूर्वीं सांगितल्याप्रमाणें सबसॉइल वाटर आणि आर्टेशियन पाणी असे जमिनींतील पाण्याचे दोन भाग करतात. परंतु तशा त-हेचा फरक खालीं दिलेल्या प्रयोगांत केलेला नाहीं. क्वेटा शहराभोंवतीं टेकड्या असून शहर मैदांनांत आहे या ठिकाणीं पाऊस पंधरा वीस इंचच पडतो परंतु ज्यावेळीं पाऊस पडतो त्यावेळीं तो जोरांत पडून पाण्याचे ओहोळ सुरू होतात व त्याबरोबर डोंगरांतील सुटलेले कडपे, दगड वगैरे खालीं मैदानाच्या बाजूला ढकलेले जातात परंतु डोंगराची उतरंड संपल्यावर पाण्याचा जोर कमी होऊन मोठाले दगड थबकतात. व पाण्याच्या ओढ्यांना फांटे फुटून हे लहान फांटे मैदानांत उतरतात. लहान ओघाबरोबर दगडांचे गोटे व वाळू मैदानावर पसरून त्यांचा थर होतो .यावरच 'लोएस' नावांच्या वा-यानें आणलेल्या दगडांच्या बारीक कणांचा थर बनतो. ''लोएस'' नांवाच्या थरांवर पाण्यांतून वहात आलेला चिकण मातीचा गाळ बसला म्हणजे एक घट्ट थर तयार होतो. गोट्यांच्या आणि वाळूच्या थरांतून पाणी सहज वाहतें. परंतु घट्ट थरांतून मात्र पाणी इकडचें तिकडे जात नाहीं. वाळूचे व गोट्यांचे थर टेंकड्यांपर्यंत पसरले असल्यामुळें त्यांत पाणी नेहमींच सांठण्याचा संभव असतो. अशा प्रकारचे थर क्वेटाच्या मैदांनात असल्यानें तें ठिकाण आर्टेशियन विहिरी खणण्यास योग्य आहे. वरील सांगितलेले थर फार अव्यवस्थित रीतीनें पसरलेले असल्यामुळें खात्रीनें अमुक ठिकाणीं पाणी लागेलच असें सांगतां येत नाहीं; तरी प्रयोग करून पाहिल्यास ब-याच ठिकाणीं पाणी सांपडतें. वरचे बाजूस प्रथमतः ७५ ते १२५ फुटांचा 'लोएस' चा थर लागतो व त्या खालीं पाणी असलेला वाळूचा थर ५ पासून १०० फूट खोलपर्यंत आढळतो. वरच्या थरांतून खालच्या थरापर्यंत नळ घातल्यास पाणी जोरानें वर येऊं लागतें.

ज्याप्रमाणें क्वेटाचें मैदान वालुकामय आहे तसेंच फार मोठ्या  प्रमाणावर गंगेचें वालुकामैदान आहे व क्वेटासारखेंच या ठिकाणीं वाळूचे व चिकण मातीचे थर एकावर एक निरनिराळ्या त-हेनें पसरले असल्यामुळें त्या मैदानांत आर्टेशियन विहिरी सांपडावयला पाहिजेत. यासंबंधीनें मेडलीकॉटेचें असें म्हणणें आहे कीं, डोंगराच्या आसपास ज्या ठिकाणीं वाळूच्या वगैरे थरांनां उतार असतो अशा ठिकाणीं आर्टेशियन पाणी सांपडण्याचा संभव असतो, त्यामुळें हिमालयाच्या पायथ्यापासून फार दूरवर गेल्यास सपाटी लागते व तेथें आर्टेशिन पाणी सांपडणें कठीण जातें. ह्याच कारणमुळें १८३६ सालीं कलकत्त्यास व १८७७ सालीं भिवाजीस पाडलेल्या भोंकांतून पाणी मिळालें नाहीं लखनौस १८९० सालीं जें भोंक पाडलें त्याला ११८९ ते १२०२ फूट खोलीच्या दरम्यान पाण्याचा सांठा लागला  व तो इतक्या दाबाखालीं होता कीं त्याचें पाणी पृष्ठभागीं येऊन जमिनीवर वाहूं लागलें सुंदरबनांत १८८७ सालीं शेजारीं पिण्याकरितां गोडें पाणी खोल जमिनींत सांपडते किंवा नाहीं हें पाहाण्याकरितां एक भोंक पाडलें होतें त्यांत १७३ फूट खोलीवर पाणी लागलें. एकंदरींत आतांपर्यंत प्रयोग जरी थोडे झाले आहेत तरी असें म्हणतां येईल कीं, गंगेच्या वालुकामय मैदानांत दक्षिणेच्या बाजूस आर्टेशियन पाणी फार करून सांपडणार नाहीं परंतु उत्तरेच्या बाजूस अशा त-हेचें पाणी सांपडण्याचा पुष्कळ संभव आहे.

जिऑजिकल सर्व्हेचे पूर्वींचे डायरेक्टर ग्रीस बॅच यानीं एका रिपोर्टांत असें म्हटलें आहे कीं, गुजराथमध्यें आणि पंचमहाकालाचा जो डोंगराळ प्रदेश आहे यांत कांहीं खोरीं वालुकायम असलीं तरी त्या भागांत आर्टेशियन पाणी सांपडण्याचा संभव नाहीं. त्याचप्रमाणें कच्छ आणि काठेवाड यांमध्यें आर्टेशियन पाणी फारसें नसेल व असलेंच तरी तें काढण्याचा  प्रयोग करणें इतक्या खर्चाचें होईल कीं त्यापेक्षां साध्या विहिरी खणूनच फायदा होईल. यावरील दोन्हीं भागांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशांत मात्र प्रयत्न करण्यास पुष्कळ वाव आहे. येथें पाण्याचे दोन थर आहेत, त्यांपैकीं एक ६०-७० फूट खोलीवर व दुसरा १००-१२५ फूट खोलीवर असावा. -हेडेनबर्गच्या मतें खंबायताच्या आखाताच्या बाजूस आर्टेशियन पाणी सांपडण्यासारखी तेथील खडक व वाळू यांची स्थिती दिसते. गुजराथेंतील तृतीययुगांतील (टार्शिअरी) खडकांचे जे थर आहेत त्यामध्यें क्षार पदार्थ जागाजागीं मिसळलेले आहेत. त्यामुळें कित्येक वेळां विहिरीचें प्रथम गोडें असलेले पाणी पुष्कळ वेळां मागाहून मचूळ किंवा खारें होतें. अलीकडे कित्येक खा-या विहिरीच्या बुडांत भोंकें पाडून प्रयोग केलेले आहेत. त्यावरून असें वाटतें कीं, खा-या विहिरींच्या बुडाशीं चिकण मातीच्या थर लागतो त्याच्याखालीं गोड्या पाण्याचा थर आहे. चिकण मातीच्या थरांत भोंक पाडल्यास विहिरीचें पाणी वाढतें व बहुतेक वेळां पूर्वींच्या पाण्याचा खारेपणा कमी होतो.

महाराष्ट्रांत 'डेक्कन ट्रॅप' नांवाचा अग्न्युत्पन्न खडक आहे. त्याच खडकाचा कांहीं भाग काठेवाड, गुजराथ मध्यहिंदुस्थान वगैरेकडे आहे. साधारणतः या खडकाचे थर अगदीं सपाट असतात. व या खडकांतील पाणी बहुतेक त्यामधील भेगा व चिरांमधून वाहाते, व या विहिरींना याच पाण्याचा पुरवठा असतो. महाराष्ट्रांत या खडकाचे जे मोठाले व जाड थर आहेत त्यांवरून त्यांत आर्टेशिअन पाणी असावेसें वाटत नाहीं. परंतु बारीक रीतीनें शोध केल्यास कित्येक ठिकाणीं त्या थरांनां थोडा कां होईना परंतु उतार आहे अशा जागा सांपडण्याचा संभव आहे. कटिवाडांत तर त्यांच्या पूर्व स्थितींत फरक होऊन कांहीं ठिकाणीं ते तिरपे आहेत. याशिवाय 'ट्रॅप' च्या थरांच्यामध्यें कित्येक ठिकाणीं 'इंटरट्रॉपियन' नांवाचे जलोत्पन्न खडक आहेत व त्यामध्यें पाणी सांठण्यासारखीं त्यांची रचना आहे. त्याप्रमाणें ट्रॅपच्या प्रदेशांतील कांहीं भागांत वाळूचा खडक सांपडतो. हा खडक म्हणजे 'ट्रॅप' पूर्वींच्या वाळूच्या खडकांच्या ज्या टेंकड्या त्यांचीं हीं शिखरें होत. तेव्हां यावरील तीन प्रकारांपैकीं कोणत्याहि एका प्रकारच्या खडकांची मांडणी ज्या भागांत असेल त्या ठिकाणीं प्रयोग करून आर्टेशियन पाणी सांपडतें किंवा नाहीं हें पहिल्यापासून बरीच माहिती मिळण्याचा संभव आहे.

झ-यांच्या पाण्याची उष्णत:- ज्या झ-यांचें पाणी फार खोले गेलेलें नसतें त्यांची उष्ण्ता आसपासच्या प्रदेशाच्या उष्णतेइतकीच जवळ जवळ असते. परंतु पुष्कळ वेळां ती जास्त किंवा कमीसुद्धां असते. ज्या झ-यांचें पाणी हिमाच्छादित डोंगरांतून किंवा वितळणा-या बर्फांतून येतें त्यांची उष्णता फार कमी म्हणजे पाणी गोठण्याइतकीं असते(०० सेंटीग्रेड) परंतु कित्येक झ-यांचें पाणी कढत असतें ही उष्णता वाढण्यास पाण्याच्या मूळ सांठ्याच्या आसपास कांहीं रासायनिक क्रिया तरी चालू असते किंवा पृथ्वीच्या उदरांतील उष्णतेनें पाणी तापलें जातें. दुसरें कारण असल्यास पाणी जितकें खोल जाईल तितकें तें जास्त कढत बाहेर येतें.

कोकणांतील ठाणें, कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांत अशात त-हेचे पुष्कळ ऊन पाण्याचे झरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांतील ऊन पाण्याच्या बारा झ-यांची हकीकत डॉ. मेंन व रा. स. रा. परांजपे यांनीं प्रसिद्ध केली आहे, त्यावरून खालील माहिती दिली आहे. या बारा झ-यांपैकीं एका झ-याची उष्णता ९६० फॅरन हीट आहे. व दोहोंची ११०० पेक्षां कमी आहे; बाकी सर्वांची १२०० पेक्षां जास्त उष्णता असून एकाची १४२० व दुस-या एकाची १५६० उष्णता आहे. झ-यांच्या पाण्याला गंधकासारखा थोडासा वास येतो. परंतु त्यामध्यें गंधक नाहीं. पाण्याच्या उष्णतेवरून तें बरेंच खोल जाऊन वर येत असावें असें दिसतें. कित्येक झ-यांतून वायूंचे बुडबुडे येतात. त्यांच्या पृथक्करणावरून त्यांत हवेच्या मानानें नायट्रोजन जास्त व आक्सिजन पुष्कळ कमी आहे झ-याच्या पाण्यांतील क्षारांचें प्रमाण दर एक लाख पाण्याच्या भागांत ३६ पासून २०० पर्यंत आहे व सरासरीनें १०० आहे. थांबून थांबून पावसाळ्यांत वाहणारे झरे उन्हाळ्यांत बंद पडतात अशा त-हेचीं पुष्कळ उदाहरणें आहेत, परंतु कित्येक झरे दर पावसाळ्यांत न वाहातां कांहीं दिवस झाले कीं एकदम सुरू होतात व त्याचप्रमाणें कांहीं काळ वहात राहून एकदम बंद पडतात. अशा झ-यांचा प्रवाह ज्या मूळ ठिकाणांतून निघतो. त्या ठिकाणीं सांठा भरला कीं झरा वाहूं लागतो व झरा ज्या नळीसारक्ष्या वाटेनें निघतो ती सायफनसारखी असल्यामुळें  पाण्याचा सांठा संपेपर्यंत झरा वहात राहून एकदम बंद पडतो कोंककणांत राजापूरजवळ असलेले अशा त-हेचे झरे प्रसिद्ध आहेत.

प्रवाह कांहीं नियमित दिवस चालून नंतर नियमित दिवस बंद पडतो असें नाहीं व तो अमक्याच महिन्यांत सुरू होतो. असेंहि म्हणतां येणार नाहीं. या झ-यांच्या पाण्याची उष्णता २९ पासून ३२ अंश सेंटिग्रेड असते त्यांतील प्रत्येक लाख पाण्याच्या भागांत २८ ते ३७ भाग क्षारांचें प्रमाण असतें.

गोड्या पाण्याचे व खा-या पाण्याचे असे झ-यांचे २ वर्ग करतां येतात. पहिल्या वर्गांत पिण्याला ज्यांचें पाणी योग्य आहे अशा प्रकारचे झरे येतात. त्यांची उष्णता सभोंवतालाच्या हवेच्या उष्णतेपेक्षां किंचित कमी असते. पाण्यांत हवेंतील वायू व कांहीं क्षार असतात परंतु क्षारांचें प्रमाण दहा हजार पाण्याच्या भागांत जास्तींत जास्त दहा भाग क्षार व एकदशांश भाग सेंद्रिस पदार्थ असें असतें.

खा-या पाण्याच्या झ-यांचें पाणी गार, कढत किंवा आधण आल्यासारखेंहि असतें. परंतु उष्णतेचा क्षारांच्या प्रमाणाशीं फारसा संबंध जोडतां येईलच असें म्हणतां येणार नाहीं. या झ-यांत दर हजार भाग पाण्यांत एक ते तीनशें भाग क्षार सांपडतात. कांहीं झ-यांत खटकर्बित (कॅलशियम कार्बोनेट), लोह, मग्न (मॅग्नेशियम) आणि सिंधुगंधकित (सोडियम सल्फेट) किंवा सिंधुहरिद (सोडियम क्लोराईट) यांपैकीं एखादा पदार्थ ब-याच  जास्त प्रमाणांत सांपडतो. त्यामुळें त्या पदार्थावरूनच झ-याला नावं पडतें. कांहीं झ-यांनां गंधकाचा वास येत असतो. कित्येक झ-यांच्या पाण्यानें स्नान करण्याकरितां आजारी लोक लांब लांब प्रदेशांतून येतात. या स्नानानें त्यांनां बरें वाटतें असेंहि म्हणतात. पाण्याच्या झ-याशिवाय राकेलचे झरेसुद्धां कांहीं प्रदेशांत असतात व त्याच प्रदेशांत राकेलच्या खाणी सांपडतात.

जमीनीवर पाण्यानें भरलेले मोठाले खळगे आहेत, त्यांनां सरोवरें म्हणतात. पूर्व व पश्चिम गोलार्धाच्या उत्तर भागांत आणि उष्ण कटिबंधांत सरोवरें पुष्कळ आहेत. सरोवरें गोड्या पाण्यांची व खा-या पाण्याचीं अशीं दोन प्रकारचीं असतात.

गोड्या पाण्याचीं सरोवरें:- यूरोप आणि अमेरिकेच्या उत्तरेकडील कांहीं भागांतील सरोवरें जुन्या हिमनद्यांनीं पाडलेल्या खळग्यांत असून तीं अव्यवस्थित रीतीनें पसरलीं आहेत. त्यांपैकीं कांहीं डोंगराच्या माथ्यावर कांहीं डोंगराच्या उतारावर तर कांहीं मैदानांवर आहेत. परंतु बहुतेक इतर सरोवरें द-यांतून व पाणी वाहाण्याच्या मार्गावरच झालेलीं आहेत. त्यांपैकीं कांहीं इतकीं मोठीं आहेत कीं त्यांनां सरोवरें म्हणण्याऐवजीं समुद्र म्हणण्यास हरकत नाहीं. हीं सरोवरें तीन त-हांनीं तयार होतात. पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीनें तसेंच जमिनीच्या एखाद्या भागावर सारखा पाण्याचा प्रवाह असल्यानें मोठाले खळगे होऊन ते पाण्यानें भरून गेल्यामुळें किंवा एखादा पाण्याचा प्रवाह कांहीं कारणानें थोपविल्यामुळें सरोवरें तयार होतात.

खा-या पाण्याचीं सरोवरे:- यांपैकीं कांहीं सरोवरांचें पाणी खारट असतें व त्यांत सिंधुहरिद (मीठ=सोडियम क्लोराइड) मॅग्नहरिद(मॅग्नेशियम क्लोराइड) मग्नेगंधकित (मॅग्नेशियम सल्फेट) व खटगधंकित (कॅलशियम सल्फेट हे क्षार असतात. आणि कांहीं सरोवरांचें पाणी कडवट असतें. खारीं सरोवरें दोन प्रकारचीं असतात (१) कित्येक सरोवरांत बाहेरून पाणी येतें परंतु पाणी बाहेर वाहून जाण्यास मार्ग नसतो. त्यामुळें पाण्याबरोबर आलेले क्षार सरोवरांतच राहातात. व पाणी मात्र वाफेच्या रूपानें निघून जातें (२) इतर खारीं सरोवरें मूळचा समुद्राचाच भाग कांहीं कारणामुळें वेगळा होऊन झालेलीं असतात मूळ कारण कोणतेंहि असलें तरी शेवटीं सरोवरांतील पाणी आटून त्यांतील क्षारांचें प्रमाण दर सालीं वाढत जाऊन हीं खा-या पाण्याचीं सरोवरें तयार होतात.

जमिनीवरील पाण्याच्या योगानें झालेलीं सरोवरें:- हीं जरी खारट किंवा कडवट पाण्याचीं असतात तरी त्यांचा समुद्राशीं केव्हांच संबंध आलेला नसतो. या सरोवरांतून बाहेर प्रवाह जात नसल्यानें त्यांतील क्षार वाढून हीं तयार झालेलीं असतात. उत्तर अमेरिकेंत व मध्य अशियांतील अशीं सरोवरें आहेत. उटा नांवाचें जें मोठें क्षारसरोवर उत्तर अमेरिकेंत आहे त्याचें वर्णन गिल्बर्ट नामक भूगर्भशास्त्रेवेक्त्यानें केलें आहे तें असें- हें सरोवर पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीने झालेलें आहे. याचें क्षेत्रफळ २००० चौरस मैल आहे व तें समुद्रसपाटीपासून ४२४० फूट उंच आहे. परंतु पूर्वीं याचें क्षेत्रफळ १९७५० चौरस मैल असावें असें दिसतें.  सरोवराभोंवतीं उंच टेकड्या आहेत. त्यांवर पूर्वींच्या पाण्याचा खुणा आहेत. त्यावरून सरोवराचें पाणी प्रथमतः बरेंच उंचपर्यंत असून त्यांतून पाणी वाहाण्यास तोंड होतें. पुढें पाणी आटून खालीं गेल्यावर पाणी बाहेर जाणें बंद झालें व क्षाराचें प्रमाण वाढलें. हल्लीं पाणी खारट आहे व इतकें दाट झालें आहे कीं त्यावर मनुष्य सहज तरंगतो. अमेरिकेच्या नेवाडा प्रांतांतील 'बिगसोडालेक' नांवाचें सरोवर वरील त-हेनेंच झालेलें आहेत. त्यांतील क्षाराचें प्रमाण तर दर दहा हजार भाग पाण्यांत १२९ भाग क्षार असें आहे.

लोणार सरोवरः- व-हाडांतील बुलढाणा जिल्ह्यांत लोणार सरोवर आहे. त्याच्याभोंवतीं टेंकड्या आहेत त्यांची उंची ४०० फूट आहे. या तीनचारशें फूट खोल खळग्याच्या बुडाशीं पाण्याचा सांठा आहे. त्याला बाहेर जाण्यास मार्ग नसल्यानें तेथें खा-या पाण्याचें सरोवर झालें आहे. त्याचा व्यास १ मैल आहे. त्यामध्यें सिंधुहरिद (सोडियम क्लोराइड) व सिंधुकार्बित (सोडियम कार्बोनेट) हे क्षार आहेत.

समुद्रापासून झालेलीं सरोवरें:- जमिनीच्या हालचालीच्या योगानें समुद्राचा एखादा भाग अगदीं निराळा होतो. व पुढें त्यांतील पाणी आटून तें मूळ समुद्राच्या पाण्यापेक्षां फारच खारट होतें. काळ्या समुद्राचा एका फांटा पूर्वीं उत्तरेस असावा व त्याचेच निरनिराळे भाग होऊन कास्पियन समुद्र, आरल समुद्र आणि मृतसमुद्र झाले असावे असें दिसतें. कास्पियन समुद्राचें क्षे. फ. १८००००० चौ. मै. आहे व खोली ३००० फूटपर्यंत आहे. खालील कोष्टकांत १००० भाग पाण्यांत क्षाराचें किती प्रमाण आहे हें दिलें आहे.

क्षार कास्पियन समुद्र वाळूनजिक उटाचें सरोवर मृतसमुद्र
सिंधूहरिद (सोडि. क्लो) ८.५२ ११८.६२ ७८.५५
मग्नहरिद (मॅग्ने) ०.३० १४.९० १४५.८९
खटहरिद (कॅल्शि) ... ... ३१.०७
पालाशहरिद (पोटॅ) किंचित अंश ०.८६ ०.५८
मग्नस्तंभिद (मॅग्ने.ब्रो) ... ... १.३७
खटगंधकित (कॅल्शि.स) १.०७ ०.८५ ०.७०
खटकर्बित    (कॅल.कार्बो) ०.०५५ ५.३६ ...

हि म किं वा ब र्फ.- उष्णतेचें मान ० सेंटिग्रेडपर्यंत खालीं गेल्यास पाणी गोठून त्याचें बर्फ होतें थंड प्रदेशांत व पर्वतांच्या उंच शिखरावर पुष्कळ वेळां पावसासारखें हिम पडतें.  व कित्येक ठिकाणीं तें गारांच्या रूपानें पावसाबरोबर पडतें. पृथ्वीवरच पाणी गोठून नद्या व सरोवरें बर्फमय झालेलीं थंड देशांत द्दष्टीस पडतात. तयार केलेलें बर्फ दगडासारखें कठिण होतें परंतु आकाशांतून पडणारें हिम कापसासारखें मऊ व विरळ असतें परंतु त्याचा कोठेंहि ढीग तयार झाल्यास तें घट्ट होऊं लागतें बर्फाचे किंवा हिमाचे कण षट्कोणी स्फटिकाचे असतात.

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणांत जसें वर जावें तसें उष्णतेचें मान कमी होत जाऊन शेवटीं शून्य अंश सेंटिग्रेटच्य खालीं जातें. म्हणून ह्या उंचीच्य वर पाणी नेहमींच गोठलेल्या स्थितींत असतें. म्हणून ज्या कल्पित रेषेच्या वर पाणी नेहमींच हिम स्थितींत असतें तिला हिमरेषा म्हणतात. हिमरेषा ध्रुवाशेजारीं अगदीं पृथ्वीच्या पृष्ठभागावरच असतें परंतु जसजसें विषुववृत्ताकडे उष्ण प्रदेशांत यावें तसतशीं ती उंच जाऊं लागते. स्कँडिनेव्हियामध्यें ती ३००० फुट उंच आहे. आल्प्समध्यें ८५८० फूट व हिमालयांत १९००० फूट उंच आहे.

हिमनद्या:- उंच पर्वतांच्या शिखरांवर एकसारखें बर्फ पडून त्याचे ढीग होत असतात. ढिगांतील वरच्या बर्फाच्या खालच्या थरावर दाब पडल्यामुळें खालच्या थरांतील बर्फ वितळूं लागतें. हें वितळलेलें बर्फ दाब कमी असेल अशा भेगांतून बाहेर पडून पुन्हां घट्ट होतें. डोंगराच्या शिखरावर उतारावर व उंच ठिकाणीं असलेल्या द-यांतून असाच प्रकार एकसारखा चालून खालच्या भागांतील बर्फ हलके हलके घसरूं लागतें व वरून पडणा-या बर्फाचा दाब कायम राहिल्यामुळें बर्फाचे प्रवाह सुरू होतात. याच बर्फाच्या प्रवाहांनां हिमनद्या म्हणतात. हिमालय, आल्प्स वगैरे पर्वतांवर हिमनद्या पुष्कळ असतात. यांची गति फार मंद असल्यामुळें  ही प्रवाह आहे असें कळण्यास मुद्दाम कांहीं खुणा करून शोधून काढावें लागतें. रोजची गति २ किंवा ३ फुटांपासून जलद वाहणा-या प्रवाहांची २४ फूट व क्वचित प्रसंगीं ४८ फूट असतें. हिमालयांत ज्या हिमनद्या आहेत त्या सर्वांत मोठी नदी यार्कंद व तिबेटच्या मध्यें काराकोरम पर्वतावर आहे. हिची लांबी ३६ मैल आहे. हिमनद्या खालीं उतरून त्यांनां उष्णता मिळाली कीं बर्फाचें पाणी होऊन त्यांतून साध्या पाण्याचे प्रवाह सुरू होतात.

सिंधु, गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा उगम हिमनद्यांच्या मुखापासूनच झालेला आहे. उंच पर्वतावरून निघणा-या हिमनद्यांनां नीट उतार न मिळाल्यास त्या कित्येक वेळां कड्यावरून वाहूं लागतात. अशा ठिकाणीं बर्फाचे मोठाले कडपे पडून हिमशिलांचा वर्षाव होत राहतो.

शीत कटिबंधांत व विशेषतः उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळ बर्फाच्छादित जो प्रदेश असतो त्यांतून हिमनद्या निघून समुद्रांत वहात जातात. बर्फ पाण्यापेक्षां हलकें असल्यामुळें  तें वर येण्याचा प्रयत्न करतें व हिमनद्या कांहीं अंतर समुद्रांत गेल्यावर त्यांचे टेंकड्यासारखे बर्फाचे भाग कडाकड तुटून एकदम वर येतात. बर्फ जरी पाण्यापेक्षां हलकें असलें तरी तें फार हलकें नसल्यानें त्याचा १/११ भाग पाण्यांवर व बाकीचा म्हणजे वरच्याच्या दसपट भाग पाण्याखालींच असतो. या बर्फाच्या टेंकड्यांनां हिमशृंगें म्हणतात. हिमंशृंगें ध्रुवाकडून विषुववृत्ताकडच्या दिशेला जातात. व वाटेंत उष्णतेनें वितळून नाहींशीं होतात. समुद्रांत हिमशृंगें वहात असतांना त्यांच्यापासून जहाजांनां धोका बसण्याचा संभव फार असतो. हिमशृंगाभोंवतीं तीं धुकें पसरलेलें असतें त्यामुळें जहाजें नकळत त्यावर जाऊन आपटतात. अशा त-हेनें पुष्कळ जहाजें बळी पडल्याचीं उदाहरणें आहेत. थंड प्रदेशांत नद्यांचें आणि तळ्याचें पाणी थंडींत गोठतें. पृष्ठभागाचें पाणी थंड झालें म्हणजे जड होतें. व बुडाशीं जातें व खालचें पाणी वर येतें. याप्रमाणें पाणी वर खालीं होऊन सर्व थंड होतें. परंतु पाणी ४ अंश सेंटिग्रेडला त्याच्या वरच्या किंवा खालच्या उष्णतेच्या पाण्यापेक्षां जड असतें, म्हणून ४ अंश उष्णतेचें पाणी तळाशीं गेलें म्हणजे वर येत नाहीं. याप्रमाणें सर्व पाणी चार अंश झाल्यावर पृष्ठभागचें पाणी चार अशंखालीं जातें व शून्य अंश उष्णता झाली म्हणजे पृष्ठभागाच्या पाण्याचें बर्फ होतें. बर्फाची जाडी दोन, तीन फूट झाली कीं खालच्या पाण्यांतील उष्णता लवकर कमी होत नाहीं. यामुळेंच पृष्ठभागावर बर्फ असतांना खालीं पाण्यांत मासे जिवंत राहूं शकतात पुष्कळ वेळां उन्हाळ्यांत पावसाबरोबरोच गारा पडतात. परंतु त्या कशा तयार होतात व पडतात यासंबंधानें खात्रीलायक माहिती किंवा कारणें शास्त्रज्ञांनां अद्यपि देतां येत नाहींत.

म हा सा ग र आ णि स मु द्र.- पृथ्वीचा जवळ जवळ चतुर्थांश भाग(२/१००) महासागरांनीं व्यापिलेला आहे. महासागर पृष्ठभागीं एकमेकांस मिळतात. परंतु बुडाशीं ते निरनिराळे आहेत व त्याप्रमाणें त्यांनां निरनिराळीं नावें आहेत. महासागरांची सरासरीची खोली ८००० हात किंवा अडीच मैल आणि सर्वांत जास्त खोली सहा मैल आहे. हा जास्त खोली कोणत्याहि पर्वताच्या उंचीपेक्षां अधिक आहे.

समुद्राची खोली आणि पृष्ठभागाचें क्षेत्रफळ कळल्यावर समुद्रांत एकंदर पाण्याचा सांठा किती आहे हें काढणें कठिण नाहीं. समुद्रसपाटीवर जेवढी जमीन आहे तिच्या पंधरापट पाणी समुद्रांत आहे. पृथ्वीवरील डोंगर समुद्राच्या खड्ड्यांत घालून सर्व जमीन सपाट केली तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दोन मैल जाडीचा पाण्याचा थर होईल.

पृथ्वीच्या सुरवातीपासून नद्या, ओढे, समुद्रास मिळत असल्यामुळें पृथ्वीवरील प्रत्येक पदार्थ थोड्याबहूत प्रमाणांत समुद्रांत सांपडणरच. समुद्राचें पाणी सर्व ठिकाणीं खारट असतें. परंतु हा खारटपणा कांहीं ठिकाणीं कमी जास्त होतो. तांबड्या समुद्रास कोणतीच नदी मिळत नाहीं व उष्णतेनें तेथील पाणी आटतें, यामुळें तेथील पाणी फार खारट असतें परंतु बाल्टिक समुद्रास पुष्कळ नद्या मिळतात. आणि थंडीमुळें तेथील पाणी आटत नाहीं म्हणून तेथील पाणी कमी खारट असतें. जमिनीपासून बरेंच दूर असलेल्या पाण्यांत शेंकडा साडेतीन घन पदार्थ सांपडतात. समुद्राच्या पाण्यांतील सर्व घन पदार्थ काढून त्याचा एके ठिकाणीं ढीग केल्यास पृथ्वीवरील जमिनीच्या भगाच्या एकपंचमांश तो होईल. या घन पदार्थांचें पृथक्करण पुढीलप्रमाणें आहेः- सिंधुहरित (सोडियम क्लोराईड = मीठ) ७७.७६ मग्न हरिद (मॅग्नेशियम क्लोराईड) १०.८० मॅग्नेगंधकित (मॅग्नेशियम सफ्लेट)४.७३ खटगंधकित (कॅलशियम सल्फेट) ३.६१ पालाशगंधकीत (पोटॅशियम सल्फेट) २.४६ मग्नस्तम्भिद (मॅग्नेशियम ब्रोराईड) ०.२२ खटकर्बित कॅलशियम कार्बोनेट) ०.३४ एकूण १००.००.

समुद्राचा तळः- जमिनीवर ज्याप्रमाणें डोंगर द-या, खोरीं व पठारें आणि ज्वालामुखीं पर्वत आहेत त्याप्रमाणें ते समुद्रांतहि आहेत. परंतु जमीन आणि समुद्राचा तळ यांमध्यें एक विशेष फरक आहे, तो असा कीं जमिनीवर नद्या, नाले यांच्या वाहाण्यानें वा-याच्या हालचालीनें व समुद्रांच्या लांटाच्या तडाख्यानें अव्यवस्थितपणा व खडबडीतपणा आलेला असतो परंतु समुद्राच्या तळाशीं स्थिरता असल्यानें खडबडीतपणा वाढत नाहीं. इतकेंच नव्हे तर जमिनीवरून वाहून आलेला किंवा समुद्रांतील मेलेल्या प्राण्याच्या पासून झालेला गाळ सर्व तळावर पसरत असल्यामुळें  पूर्वींच्या खडबडीतपणा भरून काढून तळ सपाट करण्याकडे प्रवृत्ति असते. परंतु समुद्रांत इतक्या मोठ्या द-या आहेत कीं, त्या भरून येणें शक्यच नाहीं. आणि म्हणूनच हल्लीं असलेले पर्वत व द-या अस्तित्वांत आहेत. ज्या ठिकाणीं ज्वालामुखी पर्वतांचीं टोकें आहेत त्या ठिकाणीं एकदम खोल उतार व पर्वताच्या आजूबाजूस उभे चढ असतात. समुद्राकांठापाशीं तळ खडबडीत असतो.

कांहीं वर्षांपूर्वीं खोल समुद्रात विशेष महत्वाच्या गोष्टी असतील किंवा तेथें झाडे आणि प्राणी यांची वस्ती असेल अशी कल्पनाच नव्हती. परंतु विद्युतसंदेशाकरितां तारा टाकण्याचें काम चालू असतांना समुद्रांत पुष्कळ खोल प्राण्यांचीं व झाडांची वस्ती आहे. असें कळलें व तेव्हांपासून समुद्राच्या तळाच्या अभ्यासाला सुरवात झाली. समुद्राची खोली काढणें, तेथील उष्णमान जाणणें, त्या ठिकाणीं असणा-या पाण्यांची मातीची झाडांची माहिती करून घेणें हीं कामें करण्याकरितां निरनिराळ्या सरकारांनीं आपलीं जहाजें पाठविलीं व त्यामुळेंच तळासंबंधीं जी आज माहिती आहे ती मिळूं शकला. समुद्राची खोली मोजण्याकरितां लोंखडाच्या बारीक तारेचा उपयोग करतात. तारेच्या टोंकाला एक पोकळ नळी बांधलेली असते, आणि नळी समुद्राच्या तळाशीं जावी म्हणून ती, तोफेच्या जड गोंळ्यास भोंक पाडून त्यांत बसविलेली असते. गोळा तळाशीं टेकला कीं तो तेथेंच टाकून देतां यावा अशी व्यवस्था केलेली असते. तारेला अडकविलेली नळी खालीं जात असतांना त्यांतून पाणी वर येतें परंतु नळी वर ओढतांना तिचें खालचें तोंड बंद होतें म्हणून समुदाच्या तळाचें पाणी या नळींतून वर काढतां येतें. नळीच्या बुडाला मेण लावून ठेवतात. त्याला समुद्राच्या तळची माती व इतर पदार्थ चिकटून येतात. तारेला अंतरावअंतरावर उष्णामानमापक  यंत्रें बांधलेलीं असतात. व तार वर येत असतांना तीं उलटीं व्हावींत अशी तजवीज केलेली असते, त्यामुळें समुद्राच्या निरनिराळ्या खोलीचरचें उष्णमान नोंदलें जातें. एक पुष्कळ लांबींची चौकट करून तिला जाळें बांधतात. व ही चौकट समुद्राच्या तळाशीं पोहोंचल्यावर तेथील जमिनीवरून पुष्कळ वेळां इकडे तिकडे ओढतात. या जाळ्यांत लहान व फार हालचाल न करणारे प्राणी सांपडतात परंतु मोठाले व चपळ प्राणी मिळूं शकत नाहींत.

समुद्रतळाशीं सांपडणारे पदार्थः- समुद्रतळावर दोन त-हेचे पदार्थ सांपडतात. जमिनीवरून वाहून आलेले दगड, माती व त्याचप्रमाणें ज्वालामुखी पर्वतांतून वाहून आलेले दगड बहुतेक काठाच्या आसपास आढळतात. परंतु बहुतेक तळ समुद्रातील मृत प्राण्यांच्या शरीरांनीं भरलेला असतो. या प्राण्यांमध्यें समुद्रपृष्ठभागीं राहाणा-या फोरॅमिनीफेरा व त्यांतहि ग्लाबिजेरिना जातीच्या प्राण्यांचीं शरीरेंच विशेषतः असतात. हे प्राणी सूक्ष्म असतात. समुद्रतळाची माती एक त-हेच्या चिखलासारखी दिसते. परंतु सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिल्यास ती वरील प्राण्यांचीं शरीरें व त्यांचें तुकडे यांची मिळून झाली आहे असें स्पष्ट दिसून येतें. ज्याला चॉक व खडू म्हणतात. तो या प्राण्यांच्या शरीराचाच झालेला असतो. १२००० किंवा १५००० फुटांपेक्षां जास्त खोलीच्या ठिकाणीं ग्लॉबिजेरिनांच्या कवचांतील बराचसा भाग (कॅलशियम कार्बोनेट) समुद्राच्या खा-या पाण्यांत विरघळला जातो म्हणून शिल्लक राहिलेल्या बिनविरघळणा-या पदार्थांची एक प्रकारची माती तयार होते. त्याला तांबडा चिखल (रेड क्ले) असें म्हणतात. या चिखलांत पुष्कळ वेळां इतर प्राण्यांच्या शरीरांचे भाग, दगडाचे तुकडे व उल्का पाषाणाचे भाग सांपडतात.

समुद्रातील प्राणीः- समुद्रांत जे प्राणी राहतात त्यांचे तीन भाग करतां येतील - (१) समुद्राच्या पृष्ठभागाजवळ राहणारे (२) समुद्राकाठाशीं जमिनीच्या सान्निध्याला राहणारे व (३) खोल समुद्राच्य तळाशीं राहणारे.

समुद्राच्या पृष्ठभागाजवळ राहणा-या प्राण्यांमध्यें सारखेपणा बराच द्दष्टीस पडतो. पाण्याच्या उष्णतेंत फारसा फरक पडत नाहीं व जो पडतो तो फार मंदगतीनें पडतो; त्याचप्रमाणें समुद्राचें पाणी सारखें हलत असल्यानें सगळीकडे सारखीच उष्णता राहून सर्व ठिकाणाच्या पाण्यांत सारखेपणा बराच असतो. या सारखेपणाचा परिणाम असा झाला आहे कीं, तेथील प्राण्यांनां थोडा सुद्धां फरक सहन होत नाहीं. गल्फस्ट्रीममध्यें उष्णकटिबंधांतील प्राणी आढळतात. हें वादळामुळें जर थंड पाण्यांत वाहून गेले तर ते जगूं शकत नाहींत. समुद्रांतील प्राण्यांत पोहणारे वहात जाणारे किंवा वहात जाणा-या वस्तूंवर चिकटून बसणारे असे निरनिराळे प्राणी असतात. परंतु शरीरानें जे मोठे असतात त्यांच्याखेरीज बाकी सर्व वा-यानें किंवा प्रवाहानें वहात जातात.

जमिनीच्या सान्निध्याला असणा-या प्राण्यांत व जमिनीवरील प्राण्यांत थोडेंसें साम्य असतें. उष्णमानाप्रमाणें निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळे प्राणी आढळतात. अन्नसामुग्रीवर कांहीं प्राण्यांचें अस्तित्व कमीजास्त प्रमाणांत द्दष्टीस पडतें. पोंवळीं तयार करणारे प्राणी ज्या ठिकाणीं अन्नाचा पुरवठा प्रवाह करुं शकतात अशाच ठिकाणीं वाढतात. जमिनीच्या सान्निध्याला सुद्धां पोहणारे, वहाणारे, खडकाला चिकटून असणारे व चिखलांत आणि मातींत भोकें करून राहणारे असे सर्व त-हेचे प्राणी असतात.

पाण्याच्या फार दाबाखालीं राहणारे प्राणीच फक्त समुद्राच्या तळाशीं असतात. त्यांनां वर काढल्यास ते चिरकतात त्यांचे डोळे बाहेर येतात, पोटाचे भाग तोंडांतून बाहेर येतात, व त्यांचें जगणें अशक्य होतें. समुद्राच्या तळाशीं पुष्कळ त-हेचे प्राणी असतात. त्यांमध्यें कित्येक समुद्रांतील मासे वगैरे इतर प्राण्यांप्रमाणें दिसणारेहि असतात. समुद्राच्या तळाशीं उष्णमानांत फरक होत नसल्यामुळें तेथील प्राण्यांनां उष्णतेंत थोडा सुद्धां फरक सहन होत नाहीं. हे सर्व प्राणी स्वतः पेक्षां लहान असणा-या प्राण्यांवर आपली उपजिविका करतात. त्याचप्रमाणें समुद्रांतील प्राणी मेले म्हणजे त्यांचीं शरीरें या प्राण्यांनां इतर प्राण्यांप्रमाणें प्राणवायूची जरूर असतेच. ध्रुवाकडून थंड पाण्याचे जे प्रवाह विषुववृत्तकडे जातात त्यांतील प्राणवायु या प्राण्यांनां मिळत असला पाहिजे. कांहीं झालें तरी अन्न व प्राण यांचा मुबलक पुरवठा नसल्यानें समुद्रतळाशीं प्राण्यांची फारशी वस्ती वाढण्यास वाव नाहीं.

रंगः- समुद्राच्या पाण्याचा रंग कांठाजवळ हिरवट असतो परंतु हा कांहीं पाण्याचा खरा रंग नसतो. किना-यापासून दूर असलेल्या पाण्याचा रंग निळा असतो व तेथील पाणी इतकें पारदर्शक असतें कीं, पांढरा पदार्थ बराच खोल असला तरी तो दिसतो. बहुतेक बाजूंनीं जमिनीनें वेष्टिलेल्या समुद्राच्या पाण्याला कित्येक वेळां तेथील मातीमुळें किंवा झाडामुळें विशिष्ट रंग येतो. तांबड्या समुद्रांत पुष्कळ वेळां तांबूस रंगाचा तबंग द्दष्टीस पडतो. व पिवळ्या समुद्रांत होत आगहो नदीतून पिंवळी माती येऊन पाण्याला पिंवळट रंग येतो. कित्येक वेळां शांत रात्रीच्य वेळीं समुद्राचें पाणी चकाकल्या सारखें दिसतें. काजव्याप्रमाणें चकाकणारे जे पुष्कळ सूक्ष्म प्राणी पाण्यावर तरंगतात त्यांचा हा परिणाम असतो. यांस फास्फेरसन्स असें म्हणतात.

उष्णता:- समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याची उष्णता कटिबंधावर अवलंबून आहे. परंतु ३ हजार फूट खोलीवर सूर्याच्या उष्णतेचा फारसा परिणाम होत नाहीं. ध्रुवाकडील पाण्याची हालचाल ज्या समुद्राच्या पाण्यांत येऊन पोहोंचते तेथील खोल पाण्याची उष्णता पाणी गोठण्याइतकी कमी असते. अटलांटिक महासागरांत विषुववृत्तांत पृष्ठभागीं ८०० अंश (फॉरन हीट) उष्णता असते परंतु १८०० फूट खोलीवरील पाण्याची उष्णता ४०० अंशच असते. हीच स्थिति इतर ठिकाणीं असते आणि तेथील हवा सारखीच असल्यामुळें सर्व महासांगरांत खोल ठिकाणीं वस्ती करणारे प्राणी व झाडें सारखींच असतात. पृष्ठभागाची उष्ण्ता कटिबंधावर अवलंबून तर असतेच परंतु त्याशिवाय समुद्रांतील पाण्याचे प्रवाह असतात त्यांवर आणि जमिनीच्या सान्निध्यावरहि अवलंबून असते. पाणी लवकर उष्ण किंवा थंड होत नसल्यामुळें थंडीच्या व उन्हाळ्याच्या आणि रात्रीच्या व दिवसाच्या उष्णतेंत फारसा फरक पडत नाहीं.

उजेडः- समुद्रांत फार खोल सूर्याचा उजेड जाणें शक्य नाहीं, तरी सुद्धां तेथील प्राण्यांचे डोळे चांगल्या स्थितींत असल्याचें दिसतें. अंधारांत राहिल्यानें प्राणी आंधळे होतात असा अनुभव आहे तेव्हां समुद्रांत खोल कांहीं तरी उजेड असावा असा अंदाज होतो. हा उजेड बहुतेक फास्फरेसन्स असावा कारण समुद्रतळाचे खरडून काढलेले पदार्थ रात्रीच्या वेळीं वर काढल्यास ते सर्व चकाकतात. यावरून हा अंदाज खरा ठरतो.

विषुववृत्तापाशीं पृष्ठभागाचें पाणी तापत जातें आणि ध्रुवाकडील थंड पाण्याचे प्रवाह समुद्राच्या तळांतून वहात विषुवृत्तापर्यंत येऊन नंतर पृष्ठभागीं येतात. याप्रमाणें पाण्याची एकसारखी हालचाल चालू असते. कित्येकवेळां समुद्रांत मोठाले उंचवटे असल्यामुळें  ध्रुवाकडील प्रवाह सरळ वाहू शकत नाहीं. उत्तरअटलांटिक महासागरांत एक उंचवटा आहे म्हणून स्कॉटलंड व ग्रीनलंडमध्यें एक खलगा आहे ,त्या मार्गानें उत्तरध्रुवाकडील प्रवाह अटलांटिकमध्यें येतो, उत्तरेकडील थंड प्रवाह भूमध्यसमुद्रांत येऊं शकत नाहीं, त्याचप्रामणें तांबड्या समुद्रांतहि असा प्रवाह येत नसल्यामुळें येथील उष्णता कित्येक वेळां १०६० अंशांपर्यंत जाते. उत्तरेकडून येणा-या थंड प्रवाहाबरोबर  कित्येक वेळां बर्फाचे डोंगरासारखे कडपे येतात त्यांवर जहाजें आदळून त्यांचा नाश झाल्याचीं पुष्कळ उदाहरणें आहेत. दक्षिणोत्तर प्रवाहाशिवाय पूर्वपश्चिम  प्रवाह आहेत. वा-यामुळें समुद्राच्या पृष्ठभागीं पाण्याला गति मिळतें. विषुववृत्तापाशीं व्यापारी वारे नेहमीं पश्चिमेकडे वहातात. म्हणून येथील पाणीहि पश्चिमेकडे वहातें. याचमुळें समुद्रपृष्ठभागीं पश्चिमेकडे वहाणारे मोठाले प्रवाह उत्पन्न होतात. आफ्रिकेच्या पश्चिमेस विषुववृत्तापाशीं दोन प्रवाह निघतात. एक नैॠत्येकडे जातो, व दुसरा वायव्येकडे जातो. हा दुसरा प्रवाह कॅरीबियन समुद्रांतून मेक्सिकोच्या आखातांत शिरतो व तेथें आखातांत फेरा घेऊन बाहेर पडतो आणि ताशी मैल या वेगानें अमेरिकेच्या किना-याला संमातर उत्तरेकडे जातो. नंतर केपहाटेरासपाशीं पूर्व दिशेस वळून यूरोपच्या पश्चिमेभागाकडे जातो. हा प्रवाह उष्ण पाण्याचा असल्यामुळें  इंग्लंड, फ्रान्स, डेनमार्क व नॉर्वे येथील हवा असावी त्यापेक्षां उष्ण असते. या प्रवाहाना गल्फस्ट्रीम असें नांव आहे यांचाच कांहीं भाग दक्षिणेकडे वळून स्पेन व आफ्रिकेच्या बाजूनें पुन्हां मूळ स्थानाकडे जातो. आणि म्हणून या प्रवाहाचें एक चक्र पुरें होतें. अशा त-हेचे प्रवाह दक्षिण अटलांटिक, पॅसिफीक व हिंदी महासागरांतहि आहेत (बंगालच्या उपसागरांत नेहमीं दक्षिणेकडून उत्तरेकडे पाण्याचा प्रवाह असतो परंतु हिवाळ्यांतील चार महिने वा-याची दिशा फिरल्यामुळें पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे वहातो) प्रवाहांच्या चक्रांच्या मध्यभागीं हालचाल कमी असल्यामुळें  त्या ठिकाणीं पुष्कळ वनस्पती वाढतात. त्यामध्यें पुष्कळ समुद्रप्राण्यांचीं वस्ती होते. प्रवाहाखेरीज समुद्राचें पाणी वा-यामुळें एकसारखें  हालत असतें. लाटा उत्पन्न होऊन त्या कांठावर, येऊन आदळतात व तेथील खडकांचा चुराडा करतात. हें काम नेहमींच चालूं असतें. मधून मधून वादळामुळें व कित्येक वेळां धरणीकंपाच्या योगें मोठमोठाल्या लाटा उत्पन्न होऊन समुद्राकाठांवर आदळतात याचाच कांहीं भाग दक्षिणेकडून वळून स्पेन व आफ्रिकेच्या बाजूनें पुन्हां मूलस्थानाकडे जातो आणि म्हणून या प्रवाहाचें एक चक्र पुरें होतें. अशा त-हेचे प्रवाह दक्षिण अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरांतहि आहेत.

दररोज समुद्राच्या पाण्याला ओहोटी व भरती येते. प्रत्येक दोन भरतींमध्यें किंवा दोन ओहोटींमध्यें १२ तास २५ मिनिटांचें अंतर असतें. म्हणजे २४ हतास ५० मिनिटांत दोनदां भरती व दोनदां ओहोटी येते. चंद्रहि २४ तास ५० मिनिटांच्या अंतरानें उगवतो, आणि चंद्र मध्यावर आला असतांना भरती आणि अस्ताच्या वेळीं ओहोटी असल्यामुळें समुद्राच्या भरती ओहोटीचा चंद्राशीं कांहीं तरी संबंध असावा असें लोकांनां वाटलें व तेंच गणितानें व शास्त्रानें खरें आहे असें सिद्ध झालें आहे.

पृथ्वी आणि चंद्र एका रेषेंत असल्यास व पृथ्वीवर सगळीकडे पाणी आहे असें समजल्यास पृथ्वीवरील जो भाग चंद्राला जवळ असतो त्यावरील पाणी चंद्राला जवळ असल्यामुळें जमिनीपेक्षां चंद्राकडे जास्त आकर्षिलें जाईल म्हणून त्या ठिकाणीं पाणी सांठून त्या जागीं भरती येईल. त्याचप्रमाणें त्याच्या विरूद्ध ठिकाणीं पाण्यापेक्षां जमीन जवळ असल्यामुळें  ती पाण्यापेक्षां जास्त आकर्षिली जाईल म्हणून त्या जागीं सुद्धां पाणी अधिक सांठून भरती येईल, आतां या दोन ठिकाणीं भरती आली असतांना यांच्याशीं काटकोनांत असणा-या दुस-या दोन परस्परविरूद्ध ठिकाणीं ओहोटी असावयाचीच. आतां या चारहि स्थितींतून पृथ्वीवरील प्रत्येक भाग रोज जात असल्यामुळें रोज (२४ तास ५० मिनिटांत) दोनदां भरती व दोनदां ओहोटी येते.

उधान आणि लहान भरतीः- दर पंधरा दिवसांनीं एकदां उधान किंवा सर्वांत जास्त भरती येते. आणि या दोन दिवसांच्या दरम्यान येणारी रोजची भरती या मानानें कमी असते. उधानाचें कारण असें आहे कीं या दिवशीं चंद्र आणि सूर्य या दोघांच्या आकर्षणाचा परिणाम एकच होतो. व समुद्राचें पाणी एकाच दिशेला ओढलें जातें. पृथ्वीभोंवतीं चंद्र माहिन्यांतील चार आठवड्यांत चार ठिकाणीं असतो. अमावस्या व पौर्णिमा या दोन दिवशीं सूर्य आणि चंद्र एका बाजूस अथवा उलट बाजूस आल्यामुळें उधान किंवा मोठी भरती येते. इतर दिवशीं चंद्र व सूर्य यांच्या आकर्षणाचा जितका जास्त मिलाफ असेल तितकी जास्त भरती असते.

पृथ्वीच्या दक्षिणार्धांतील बहुतेक भाग समुद्रांनीं व्यापिला असल्यामुळें भरतीची लाट रोज दोनदां दक्षिण पॅसिफीक मध्यें दक्षिण अमेरिकेच्या कॅलॅओपाशीं निघून पॅसिफीक महासागंरात पसरते. अर्थातच लाटेमुळें प्रत्यक्ष पाणी न वाहातां फक्त लाटेचा हेलकावा वहात जातो. लाटेचा वेग समुद्राच्या खोलीवर अवलंबून असतो, पॅसिफिकमधील लाट ताशीं ८५० मैलांच्या वेगानें दहा तासांत कामश्चाटकाला जाऊन पोंचते. दक्षिण आणि पश्चिमेच्या बाजूस समुद्र कमी खोल असल्यामुळें लाटेचा वेग ४८० ते ६०० मैल असतो आणि म्हणून न्यूझीलंडला पोहोचण्यास या लाटेस १२ तास लागतात. ही लाट तेथून ऑस्ट्रियाच्या पलीकडे जाऊन तेथें हिंदी महासागरांतील लाटेस मिळते व २९ तासांनीं केप ऑफ गुडहोपला जाऊन अटलांटिकमध्यें शिरते (लेखक द .ल. सहस्त्रबुद्धे)

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .