विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोनगीर- निजामच्या राज्यांतील नलगोंडा जिल्ह्यांतील वायव्येकडील एक तालुका. क्षेत्रफळ १२८५ चौरस मैल व लोकसंख्या सुमारें २०५१५९. यांत २४२ खेडीं असून त्यांपैकीं १२३ जहागिरीदाखल आहेत. एरंडी व नागवेली यांची येथें पुष्कळ लागवड केली जाते. भोनगीर हें या जिल्ह्याचें मुख्य गाव. (लोकसंख्या सुमारें पांच हजार) आहे. हें गांव किल्ल्याच्या पायथ्याशीं आहे. हें व्यापाराचें ठाणें असून मातीच्या भांड्याबद्दल प्रसिद्ध आहे.