विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मकरंद- एक भारतीय ज्योतिषी. यानें पंचांगसाधन फार सुलभ रीतीनें कारतां येण्यासारखा मकरंद नांवाचा सारणीग्रंथ रचला. वरील ग्रंथ सूर्यसिद्धांतानुसार आहे. मकरंद ज्योतिषी काशी येथें राहणारा होता. या ग्रंथावर टीका दिवाकर या विद्वानानें केली असून तिचें नांव मकरंदविवरण असें आहे. सांप्रत उत्तर हिंदुस्थानांत काशी व ग्वाल्हेर येथें या ग्रंथावरून पंचांगें तयार करतात. हा ग्रंथ काशी येथें छापलेला आहे. शके १६८८ मध्यें गोकुळनाथ दैवज्ञानें यांतील सारण्याची उपपत्ति लिहिली आहे, तीहि छापली आहे. (भार. ज्योतिःशास्त्र)