विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंख (सुमारें ११२०-११७०)- काश्मीरस्थ संस्कृत कवि. श्रीकण्ठचरित नांवाच्या २५ सर्गाच्या महाकाव्यांत त्यानें स्वतःविषयीं जी माहिती दिली आहे तीवरून काश्मीरचा राजा जयसिंह (११२७-११४९) याच्या काळीं ता होता असें निश्चितपणें म्हणतां येतें. याच्या बापाचें नांव विश्र्ववर्त असें होतें. याचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे श्रीकण्ठचरित होय; हा हल्लीं छापून प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथांत त्रिपुरवधाची हकीकत आली आहे. याशिवाय मंखानें मंखकोश म्हणून एक शब्दकोशहि केला असून त्याचा उल्लेख हेमचंद्रानें आपल्या कोशांत केलेला आहे.