विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंगरूळ, ता लु का.- वऱ्हाड, अकोला जिल्हा. साधारण लांबी व रुंदी २५ मैल. क्षेत्रफळ ६३० चौ. मैल आहे. या तालुक्यांत एकंदर १ शहर व २०६ खेडीं आहेत. बागाईत फारसें नाहीं. ज्वारी, कापूस हीं महत्त्वाचीं पिकें आहेत. या तालुक्यांतून रेल्वे जात नाहीं, पण तालुक्यास जवळचें सोयीचें स्टेशन मूर्तिजापूर आहे. लोकसंख्या (१९११) ९५१३०.
गां व.- हें तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. हा गांव अकोल्याच्या आग्नेयीस ३९ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें दहा हजार आहे. फार पूर्वीपासून हें परगण्याचें मुख्य ठिकाणी होतं. हल्लीं येथें म्युनिसिपालिटी नाहीं. गांव अगदीं बाजूला असल्यामुळें यास व्यापारी महत्व वगैरे फार कमी आहे. येथें फक्त एक सरकी काढण्याचा कारखाना आहे. येथें कांहीं दरगे असल्यामुळें यास मंगरूळपीर म्हणतात.