विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंजटाबाद- म्हैसूर. हसन जिल्ह्याचा पश्र्चिम तालुका. क्षेत्रफळ ४५५ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ५५८९. यांत सक्केशपूर नांवाचें एक गांव व २७७ खेडीं आहेत. यांतील प्रदेश डोंगराळ असून त्यांतून हेमावती नांवाची नदी वहाते. येथील मुख्य उत्पन्न भाताचें आहे, तरी कोठें कोठें कॉफी (बुंद) व रागी हीं पिकें होतात.