विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मट्टानचेरि- कोचीन संस्थान, कोचीन तालुक्यांतील व्यापाराचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सुमारें २० हजार. हें गांव व्यापाऱ्याच्या आयातीचें व निर्गतीचें केन्द्र असून येथील व्यापार मुंबई इलाख्यांतील बनिये व कच्छी मेमन लोकांच्या हातांत आहे. येथें तेलाया गिरण्या आहेत. पूर्वी हें कोचीन संस्थानची राजधानी असून त्यावेळीं बांधलेला राजवाडा येथें आहे. याच्या एका भागांत ज्यू लोक राहतात. १६ व्या शतकांत डच लोकांनीं क्रांगनूरमधून त्यांस हांकून लावल्यामुळें ते येथें आले हे लोक ज्या भागांत राहातात त्याला ज्यू लोकांचें गांव असें म्हणतात.