विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मढी- मुंबई अहमदनगर जिल्हा, शेवगांव तालुका हें एक कान्होबानाथाच्या यात्रेचें ठिकाण आहे. कान्होबाला मुसुलमान शहा रमझान महीसवार असें नांव देऊन आपला संत समजतात. हिंदु लोक त्याची कान्होबानाथ (नऊ नाथांपैकीं एक) म्हणून उपासना करतात. या ठिकाणीं बरीच ऐतिहासिक स्थळें आहेत.