विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मणिहार- किंवा मणियार. यांची सर्वांत अधिक वस्ती संयुक्त प्रांतांत (७५०००) आहे. एकंदर लोकसंख्या सुमारें ९५००० आहे. हे मुसुलमान लोक मणी, बांगडया, कागद, लखोटे, साबू, लहान आरसे व पेटया, टिकल्या वगैरे जिन्नस विकत फिरतात. यांची आतां एक निराळी जात बनली आहे. बऱ्याच हिंदु चाली यांच्यांत कायम आहेत. विधवेला धाकटया दिराबरोबर लग्न करतां येतें. प्रेतें उत्तरेकडे डोकें करून पुरतात. हे लोक डुकराचें व गाईचें मांस सोडून इतर सर्व प्रकारचें मांस खातात. हे लोक कोणासहि जातींत घेतात.