विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मतिआरी- मुंबई, सिंध-हैदराबाद जिल्ह्याच्या हाला तालुक्यांतलें गांव. लोकसंख्या सुमारें सोळा हजार. येथें खाद्य धान्ये, गळिताचीं धान्यें, रेशीम कापड व साखर या जिन्नसांचा व्यापार चालतो. हें गांव इ. स. १३३२ मध्यें वसलें असूनयेथें इ. स. १८०३ मध्यें बांधलेली जाम मशीद आहे. इ. स. १८५८ मध्यें येथें म्युनिसिपालिटी स्थापन करण्यांत आली.