विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदुरांतकम्- मद्रास, चिंगलपट्टम् जिल्ह्यांतील एक तालुका. हा बंगालच्या उपसागरावराजवळ आहे. क्षेत्रफळ ५३० चौरस मैल लोकसंख्या १९२१ सालीं २३५९५७ होती. तालुक्यांत मोठी शहरें मदुरांतकम्, उत्तरामेवूर व वत्रेवूर असून खेडीं ५२४ आहेत. १९२१-२२ सालीं काळीचें उत्पन्न सुमारें ४१७००० होतें. पालार व किलीवर या दोन नद्या वहात असून जमीन सुपीक आहे. तालुक्याचा पृष्ठभाग उंचसखल असून थोडासा भाग समुद्रांत शिरला आहे. त्या बेटासारख्या भागाला इदैकली नाडु असें नांव आहे. या बेटावर नारळाचीं झाडें असून नारळांपासून चांगलें उत्पन्न येतें. मदुरांतकम् गांवीं एक मोठा तलाव आहे.