विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मद्दगिरिदुर्ग- म्हैसूर, तुमकूर जिल्ह्यांतील एक तटबंदी डोंगरी किल्ला. उंची ३९३५ फूट असून या टेंकडीवर जाण्याला फक्त उत्तरेकडून एकच मार्ग आहे. १६७८ साली म्हैसूर दरबारानें हा किल्ला येथील मांडलिक राजापासून काबीज केला. हैदरनें याचा विस्तार बराच वाढविला. १७६३ सालीं बेदूनरची राणी या ठिकाणीं अटकेंत होती. १७६७ सालीं मराठयांनीं तिची मुक्तता केली. किल्ल्यावर पाण्याचे झरे असून धान्याचीं मोठी कोठारेंहि आहेत.