विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मधान- पंजबा, केओंथल संस्थानांतील एक जहागीर. क्षेत्रफळ ९ चौरस मैल. हिची लोकसंख्या १९२१ सालीं ३७२९ होती. जहागिरीचें वार्षिक उत्पन्न ५५०० रुपये आहे. २५० रुपये खंडणी केओंथल संस्थानला द्यावी लागते. सध्याचे ठाकूर रणधीरचंद आहेत.